पद्मासन किंवा कमलासन बद्दल माहिती मराठीत – Padmasana Information in Marathi

हॅलो वाचकांनो आज मी तुम्हाला पद्मासन किंवा कमलासन बद्दल माहिती मराठीत – Padmasana Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात.

पद्मासन किंवा कमलासन बद्दल माहिती मराठीत - Padmasana Information in Marathi

लक्ष द्या – योगासने कारण्याआधीच्या आवश्यक सूचना आणि अवघड शब्दांचे अर्थ

पद्मासन किंवा कमलासन या आसनात पायांचा आकार पद्म अर्थात् कमळासारखा होतो, म्हणून याला पद्मासन अथवा कमलासन असे म्हणतात.

ध्यान : आज्ञाचक्र किंवा अनाहत चक्रात असावे.

श्वास : रेचक, कुंभक, दीर्घ व स्वाभाविक.

कृती : अंथरलेल्या विद्युतरोधक आसनावर शांत चित्ताने बसा. रेचक करीत-करीत उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. डावा पाय उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. (अगोदर डावा पाय व नंतर उजवा पायसुद्धा ठेवू शकता.) पायांचे तळवे वरती आणि टाचा नाभीखाली असाव्यात.

गुडघे जमिनीला टेकलेले असावेत. डोके, मान, छाती, पाठीचा कणा वगैरे संपूर्ण भाग सरळ व ताठ असावा. दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ज्ञानमुद्रेत ठेवा (अंगठा तर्जनीच्या नखाला लावून बाकीची तिन्ही बोटे सरळ ठेवल्यास ज्ञानमुद्रा होते) अथवा डावा हात मांडीवर ठेवा (तळहात वरच्या बाजूस असावा),

त्याच्यावर त्याच प्रकारे उजवा हात ठेवा. दोन्ही हातांची बोटे एकमेकांशी जुळलेली राहतील. अथवा दोन्ही हातांच्या मुठी झाकून गुडघ्यांवरही ठेवू शकता. रेचक पूर्ण झाल्यानंतर कुंभक करा.

प्रारंभी दोन्ही पाय मांडीवर ठेवू न शकल्यास एकच पाय ठेवा. पायाला मुंग्या येत असतील, त्रास होत असेल तरीही निराश न होता सराव चालू ठेवा. अशक्त वा रुग्ण व्यक्तीने जबरदस्तीने पद्मासनात बसू नये. पद्मासन सशक्त व निरोगी व्यक्तींसाठी आहे.

दर तिसऱ्या दिवसानंतर आसनाचा वेळ १ मिनिटाने वाढवून एक तासापर्यंत पोहोचले पाहिजे. दृष्टी नासाग्र किंवा भ्रूमध्यावर स्थिर करा. डोळे बंद, उघडे किंवा अर्धोन्मीलीतही ठेवू शकता. ताठ बसून स्थिर रहा. दृष्टी एकाग्र करा. भावना करा की मूलाधार चक्रातील दडलेल्या शक्तीचे भंडार उघडत आहे.

खालच्या केंद्रातील चेतना तेज व ओजात रूपांतरित होऊन ऊर्ध्वगामी होत (वर येत) आहे अथवा अनाहत चक्रात (हृदयात) चित्त एकाग्र करून भावना करा की हृदयरूपी कमळातून सुवास दरवळत आहे. संपूर्ण शरीर या सुवासाने सुगंधित होत आहे.

लाभ : प्राणायामाचा अभ्यास करीत हे आसन केल्याने नाडीतंत्र शुद्ध होऊन आसन सिद्ध होते. विशुद्ध नाडीतंत्र झालेल्या योग्याच्या विशुद्ध शरीरात व्याधीची सावलीसुद्धा राहू शकत नाही आणि तो स्वेच्छेने देहत्याग करू शकतो.

पद्मासनात बसल्याने शरीराची स्थिती अशी होते की ज्यामुळे श्वसनक्रिया, ज्ञानक्रिया आणि रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होतात. साधकाच्या जीवनात एक विशेष आभा प्रगट होते. या आसनाद्वारे योगी, संत व महापुरुष महान झाले आहेत.

पद्मासनाच्या सरावाने उत्साह वाढतो, स्वभावात प्रसन्नता येते, चेहरा तेजस्वी होतो, बुद्धीचा अलौकिक विकास होतो, चित्तात आनंद- उल्हास राहतो. चिंता, शोक, दुःख व शारीरिक विकार दूर होऊ लागतात. कुविचार नष्ट होऊन सुविचार प्रगट होऊ लागतात.

रजो व तमो गुणांमुळे अस्वस्थ झालेले चित्त शांत होते, सत्त्वगुण वाढतो. प्राणायाम, सात्त्विक मिताहार आणि सदाचाराचे पालन करून पद्मासनाचा सराव केल्यास अंतःस्रावी ग्रंथींना शुद्ध रक्त मिळते. यामुळे कार्यशक्ती वाढून भौतिक व आध्यात्मिक विकास लवकर होतो.

बौद्धिक व मानसिक कार्य करणाऱ्यांसाठी, चिंतन-मनन करणाऱ्यांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी हे आसन खूपच लाभदायक आहे. चंचल मन स्थिर करण्यासाठी तसेच वीर्यरक्षणासाठी हे आसन अद्वितीय आहे.

श्रम आणि कष्टाशिवाय तासभर पद्मासनात बसणाऱ्या व्यक्तीचे मनोबळ खूप वाढते. भांग, गांजा, चरस, अफीम, दारू, तंबाखू इ. व्यसनांनी ग्रस्त मनुष्य जर या व्यसनांतून सुटण्याच्या भावनेने दृढ निश्चयाने पद्मासनाचा अभ्यास करेल तर तो दुर्व्यसनांतून सहजगत्या आणि कायमचा सुटू शकतो.

चोरी, जुगार, व्यभिचार अथवा हस्तमैथुनासारख्या वाईट सवयी जडलेले तरुण-तरुणीही या आसनाद्वारे त्या सर्व कुसंस्कारांपासून मुक्त होऊ शकतात.

कुष्ठरोग, रक्तपित्त, पक्षाघात, मलावरोधाने उद्भवणाऱ्या व्याधी, क्षयरोग, दमा, फीट येणे, धातुक्षय, कॅन्सर, जंत, त्वचारोग, वात-कफ प्रकोप, नपुंसकत्व, वंध्यत्व इ. रोग पद्मासनाच्या सरावाने नष्ट होतात. अनिद्रेच्या व्याधीवर हे आसन रामबाण उपाय आहे.

या आसनाने स्थूलपणा कमी होतो. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या सुरक्षिततेसाठी हे आसन सर्वोत्तम आहे. पद्मासनात बसून अश्विनी मुद्रा (गुदद्वाराचे पुनःपुन्हा संकोचन- प्रसरण) केल्याने अपानवायू सुषुम्नेत प्रविष्ट होतो. यामुळे कामविकारावर विजय मिळतो.

गुड्वेंद्रियास आत खेचल्याने अर्थात् योनिमुद्रा केल्याने वीर्य ऊर्ध्वगामी होते. पद्मासनात बसून उड्डीयानबंध, जालंधरबंध तसेच कुंभक करून छाती व पोट फुगवण्याची क्रिया केल्याने वक्षशुद्धी तसेच कंठशुद्धी होते. यामुळे चांगली भूक लागते, अन्न लवकर पचते, लवकर थकवा येत नाही.

स्मरणशक्ती व आत्मबळ वाढते. यम-नियमपूर्वक दीर्घकाळ पद्मासनाचा सराव केल्याने उष्णता निर्माण होऊन मूलाधार चक्रात आंदोलने निर्माण होतात. कुंडलिनी शक्ती जागृत होण्याची भूमिका तयार होते.

जेव्हा ही शक्ती जागृत होते तेव्हा सामान्य वाटणाऱ्या या पद्मासनाचा खरा महिमा कळतो. घेरंड, शांडिल्य तसेच अन्य अनेक ऋषींनी या आसनाचा महिमा गायिला आहे. ध्यान लावण्यासाठी हे आसन खूप लाभदायक आहे.

काय शिकलात?

आज आपण पद्मासन किंवा कमलासन बद्दल माहिती मराठीत – Padmasana Information in Marathi पाहिली आहे, पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment