पुढील दोन वर्षात रणवीर सिंग आणणार ७ नवे चित्रपट!

पुढील दोन वर्षात रणवीर सिंग आणणार ७ नवे चित्रपट!

करोनाच्या पार्श्वभूमीवर असंख्य चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर (दूरदर्शन आणि चित्रपट सामग्री इंटरनेटवर प्रदान करणे.) प्रदर्शित झाल्याचे पाहायला मिळाले. काहींनी त्यांचे चित्रपट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित न करता चित्रपटाची प्रदर्शित करण्याची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

यामध्ये बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचे एक-दोन-तीन नव्हे तर चक्क ७ चित्रपट आहेत. हे चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे रणवीरच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. रणवीरच्या ८३ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

संजीव कपूर यांच्या कॉमेडी चित्रपट ‘सर्कस’ चा रिमेक रोहित शेट्टी करत आहे. रणवीरचा हा दुसरा चित्रपट असणार आहे. सर्कसमध्ये रणवीरसोबत जॅकलिन फर्नाडिस, पूजा हेगडे आणि वरुण शर्मा दिसणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण मार्च ३१ पर्यंत संपणार आहे.

याशिवाय रणवीर यशराज फिल्म्सच्या ‘जयेशभाई जिगर’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सर्कसनंतर रणवीर पुन्हा एकदा एका रोमँटिक चित्रपटात आलिया भट्टसोबत मुख्य भुमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण एप्रिल महिन्यात सुरु करण्यात येणार आहे.

रणवीर आणखी एका चित्रपटात अली अब्बास जफरसोबत आणि झोया अख्तर सोबत काम करणार आहे. याशिवाय ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘मिस्टर इंडिया’ या संजय लीला भंसाळी प्रदर्शित रिमेकमध्येही रणवीर दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. एवढंच नव्हे तर, यशराजच्या सुपरहिट सिरींज ‘धूम’ च्या चौथ्या भागात २०२२ मध्ये रणवीर मुख्य भूमिकेत असेल अशा चर्चा आहेत.

Leave a Comment