भुजंगासन बद्दल माहिती मराठीत – Bhujangasana Information in Marathi

हॅलो वाचकांनो आज मी तुम्हाला भुजंगासन बद्दल माहिती मराठीत – Bhujangasana Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात.

भुजंगासन बद्दल माहिती मराठीत - Bhujangasana Information in Marathi

लक्ष द्या – योगासने कारण्याआधीच्या आवश्यक सूचना आणि अवघड शब्दांचे अर्थ

भुजंगासन । Bhujangasana Information in Marathi

भुजंगासन या आसनात शरीराची आकृती फणा काढलेल्या भुजंगासारखी बनते, म्हणून याला भुजंगासन किंवा सासन म्हटले जाते.

ध्यान : विशुद्धाख्य चक्रात.

श्वास : वर उठताना पूरक, नंतर रेचक.

कृती : जमिनीवर अंथरलेल्या आसनावर पालथे पहुडा. दोन्ही पाय आणि पंजे परस्पर जुळलेले असावेत. पायांचे अंगठे मागच्या बाजूला खेचा. दोन्ही हात डोक्याकडे लांब करा. पायांचे अंगठे, नाभी, छाती, कपाळ आणि हातांचे तळवे जमिनीवर एकाच रेषेत असावेत.

(भुजंगासन किंवा सर्पासन) आता दोन्ही हात कंबरेजवळ घेऊन जा. डोके आणि कंबर वर उचलून शक्य होईल तितके मागच्या बाजूला वळवा. नाभी जमिनीला लागून रहावी. संपूर्ण शरीराचे वजन तळहातांवर येईल. शरीराची स्थिती कमानीसारखी होईल.

पाठीच्या कण्याच्या शेवटच्या टोकावर दबाव केंद्रित राहील. चित्तवृत्ती कंठात आणि दृष्टी आकाशाकडे स्थिर करा. २० सेकंद हीच स्थिती ठेवा. नंतर डोके हळूहळू खाली आणा. छाती जमिनीला टेकवा. नंतर डोकेसुद्धा जमिनीला टेकवा. आसन सिद्ध झाल्यानंतर आसन करताना श्वास घेऊन कुंभक करा. मूळ स्थितीत आल्यावर श्वास खूप हळूहळू सोडा. दररोज एकाच वेळी ८- १० वेळा हे आसन करावे.

लाभ : घेरंड संहितेत या आसनाचा लाभ सांगताना म्हटले आहे की ‘भुजंगासनाने जठराग्नी प्रदीप्त होतो, सर्व रोगांचा नाश होतो आणि कुंडलिनी जागृत होते.’ पाठीच्या कण्याच्या सर्व मणक्यांना तसेच मानेजवळील स्नायूंना अधिक प्रमाणात शुद्ध रक्त मिळते.

यामुळे नाडीतंत्र सचेत, सशक्त आणि सुदृढ बनते. विशेषतः मेंदूतून निघणारे ज्ञानतंतू मजबूत बनतात. पाठीच्या कण्याचे सर्व प्रकारचे रोग बरे होतात. पोटाचे स्नायू ताणले गेल्याने पोटातील अवयवांना शक्ती मिळते. पोटावर दाब पडल्याने मलावरोध तसेच पोटाचे इतर विकार दूर होतात. छाती आणि पोटाचा विकास होतो. गर्भाशय तसेच अंडाशय स्वस्थ बनते.

परिणामी मासिकस्राव कष्टरहित होतो. मासिक पाळीसंबंधीच्या सर्व तक्रारी दूर होतात. अति परिश्रमाने येणारा थकवा उतरतो. जेवणानंतर होणारा वायूचा त्रास दूर होतो. शरीरात स्फूर्ती येते. कफ-पित्ताच्या रुग्णांसाठी हे आसन लाभदायक आहे. भुजंगासन केल्याने हृदय मजबूत होते. मधुमेह दूर होतो. प्रदर, अति मासिकस्राव तसेच अल्प मासिकस्रावासारखे रोग दूर होतात.

या आसनाने पाठीचा कणा लवचीक बनतो. पाठीत असणाऱ्या इडा व पिंगला नाड्यांवर चांगला प्रभाव पडतो. कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी हे आसन साहाय्यक आहे. जठरातील मांसपेशींचा चांगला विकास होतो. थकव्यामुळे पाठ दुखत असेल तर फक्त एकदाच हे आसन केल्याने दुखणे थांबते. पाठीच्या कण्यातील एखादे हाड जर सरकले असेल तर भुजंगासन केल्याने ते मूळस्थानी येते.

काय शिकलात?

आज आपण भुजंगासन बद्दल माहिती मराठीत – Bhujangasana Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment