सिद्धासन बद्दल माहिती मराठीत – Siddhasana Information in Marathi

हॅलो वाचकांनो.. आज मी तुम्हाला सिद्धासन बद्दल माहिती मराठीत – Siddhasana Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात.

लक्ष द्या – योगासने कारण्याआधीच्या आवश्यक सूचना आणि अवघड शब्दांचे अर्थ

सिद्धासन बद्दल माहिती मराठीत - Siddhasana Information in Marathi

सिद्धासन पद्मासनानंतर सिद्धासनाचे स्थान येते. हे आसन अलौकिक सिद्धी प्रदान करणारे असल्यामुळे याचे नाव सिद्धासन पडले आहे. सिद्ध योगिजनांचे हे प्रिय आसन आहे. यमांमध्ये ब्रह्मचर्य श्रेष्ठ आहे, नियमांमध्ये शौच श्रेष्ठ आहे आणि आसनांमध्ये सिद्धासन श्रेष्ठ आहे.

ध्यान : आज्ञाचक्रात,
श्वास : दीर्घ व स्वाभाविक.

कृती : आसनावर बसून पाय मोकळे सोडा. आता डाव्या पायाची टाच, गुदा आणि जननेंद्रियाच्या मध्ये ठेवा. उजव्या पायाची टाच जननेंद्रियाच्या वर अशा प्रकारे ठेवा, जेणेकरून जननेंद्रिय व अंडकोषावर दाब पडणार जाही.

पायांचा क्रम बदलू शकता. दोन्ही पायांचे तळवे जांघेच्या मध्य भागात राहावे. तळवे वरच्या बाजूस राहतील अशा (सिद्धासन) प्रकारे दोन्ही हात एकमेकांवर ठेवा किंवा दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ज्ञानमुद्रेत ठेवा.

डोळे उघडे किंवा बंद ठेवा. श्वासोच्छ्वास स्वाभाविक चालू द्या. भूमध्यात, आज्ञाचक्रात ध्यान केंद्रित करा. पाच मिनिटांपासून तीन तासांपर्यंत या आसनाचा सराव करू शकता. ध्यानाची उच्च अवस्था आल्यावर मनाची शरीरावरील पकड दूर होते.

लाभ : सिद्धासनाच्या नियमित सरावाने शरीरातील सर्व नसनाड्या शुद्ध होतात. प्राणतत्त्व स्वाभाविकपणे ऊर्ध्वगामी होते. यामुळे मन एकाग्र करणे सोपे जाते. पचनक्रिया सुरळीत होते. श्वासरोग, हृदयरोग, जीर्णज्वर, अजीर्ण, अतिसार, शुक्रदोष इ. दूर होतात.

मंदाग्नी, मुरडा, संग्रहणी, वातविकार, क्षयरोग, दमा, मधुमेह, प्लीहेची वृद्धी इ. अनेक रोगांचे निवारण होते. पद्मासनाने जे रोग दूर होतात तेच रोग सिद्धासनानेही दूर होतात. ब्रह्मचर्य पालनासाठी हे आसन विशेष साहाय्यक आहे.

विचार पवित्र होतात. मन एकाग्र होते. याचा अभ्यासक भोगविलासापासून वाचू शकतो. ७२,००० नसनाड्यांतील मल या आसनाच्या सरावाने नष्ट होतो. वीर्याचे रक्षण होते. स्वप्नदोषाने ग्रस्त व्यक्तीने हे आसन अवश्य केले पाहिजे.

योगिजन सिद्धासनाच्या अभ्यासाने वीर्याचे रक्षण करून प्राणायामाद्वारे ते डोक्याकडे घेऊन जातात. यामुळे वीर्य ओज व मेधाशक्तीत परिणत होऊन दिव्यतेचा अनुभव करविते, मानसिक शक्तींचा विकास होतो. सिद्धासनात बसून केलेले वाचन चांगल्या प्रकारे लक्षात राहते.

विद्यार्थ्यांसाठी हे आसन विशेष लाभदायक आहे. या आसनाने जठराग्नी प्रदीप्त होतो, चित्त स्थिर राहते व स्मरणशक्तीचा विकास होतो. आत्म्याचे ध्यान करणाऱ्या योग्याने जर मिताहारी राहून बारा वर्षे सिद्धासनाचा अभ्यास केला तर त्याला सिद्धी प्राप्त होतात.

सिद्धासन सिद्ध झाल्यानंतर इतर आसनांची काही गरजच राहत नाही. सिद्धासनाने केवली कुंभक सिद्ध होतो. सहा महिन्यांतही केवली कुंभक सिद्ध होऊ शकतो आणि अशा सिद्ध योग्याच्या दर्शन-पूजनाने पातके नष्ट होतात, मनोरथे पूर्ण होतात.

सिद्धासनाच्या प्रतापाने निर्बीज समाधी सिद्ध होते. मूलबंध, उड्डीयानबंध आणि जालंधरबंध आपोआप होतात. सिद्धासनासारखे दुसरे आसन नाही, केवली कुंभकासारखा प्राणायाम नाही, खेचरी मुद्रेसमान दुसरी मुद्रा नाही आणि अनाहत नादासारखा दुसरा नाद नाही. सिद्धासन महापुरुषांचे आसन आहे. सामान्य माणसाने हट्टपूर्वक याचा सराव करू नये, अन्यथा लाभाऐवजी हानी होण्याची शक्यता असते.

काय शिकलात?

आज आपण सिद्धासन बद्दल माहिती मराठीत – Siddhasana Information in Marathi पाहिली आहे, पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment