हॅलो वाचकांनो.. आज मी तुम्हाला १०+ भारतीय पक्षांबद्दल माहिती मराठीत – 10+ Birds Information in Marathi देणार आहे. हि माहिती तुम्ही प्रोजेक्टसाठी वापरू शकता. चला बघुयात 10+ Birds Information in Marathi.
१. मोर पक्ष्याबद्दल माहिती मराठीत – Peacock Information in Marathi

२. पोपट पक्ष्याबद्दल माहिती मराठीत – Parrot Information in Marathi

३. चिमणी पक्ष्याबद्दल माहिती मराठीत – Sparrow Information in Marathi

४. बदक पक्ष्याबद्दल माहिती मराठीत – Grey Duck Bird Information in Marathi

५. कबुतर पक्ष्याबद्दल माहिती मराठीत – Pigeon Information in Marathi

६. गरुड पक्ष्याबद्दल माहिती मराठीत – Eagle Information in Marathi

७. रोहित पक्ष्याबद्दल माहिती मराठीत – Flamingo Bird Information in Marathi

८. घार पक्ष्याबद्दल माहिती मराठीत – Common Pariah Kite Bird Information in Marathi

९. गाय बगळा पक्ष्याबद्दल माहिती मराठीत – Cattle Egret Information in Marathi

१०. पाणकावळा पक्ष्याबद्दल माहिती मराठीत – Little Cormorant Information in Marathi

११. पाणडुबी पक्ष्याबद्दल माहिती मराठीत – Little Grebe Information in Marathi

१२. शिक्रा पक्ष्याबद्दल माहिती मराठीत – Shikra Bird Information in Marathi

१३. रंगीत करकोचा पक्ष्याबद्दल माहिती मराठीत – Painted Stork Information in Marathi

पक्ष्यांची निवासस्थानं किंवा अधिवास (Habitats of Birds)
आपलं जसं घर असतं, तसं प्रत्येक पक्ष्याचं निसर्गातलं एक घर असतं. एक विशिष्ट जागा असते. पक्षी त्याची ही जागा सहसा सोडत नाही.
उदाहरणार्थ, पाण्यातला बगळा माळरानात किंवा माळावरचा चंडोल पाण्याकडे कायमचा राहण्यासाठी येणार नाही. याचाच दुसरा अर्थ प्रत्येक पक्ष्याच्या सवयी आणि शरिराची रचना यावर त्याचं निवासस्थान अवलंबून असतं.
करकोच्याचे पाय, मान आणि चोच लांब आहे. हा पक्षी जंगलात राहू शकेल का? तळ्यावर दिसणारा करकोचा चुकून जंगलात गेला, तर त्याला जगताच येणार नाही. त्याचे पंख एवढे मोठे असतात की त्यामुळे त्याला झाडाझाडामधून उडताच येणार नाही.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या त्या निवासस्थानात पक्ष्याला आपापलं खाद्य सापडतं. तळ्यात करकोच्याला मासे, मनुष्यवस्तीच्या आसपास चिमणीला उष्टं-खरकटं, ओलसर जमिनीत हुपोला गांडुळं, जंगलात सुताराला किडे, फळबागांमध्ये पोपटाला फळं, आकाशात पाकोळीला मशकं, शेतात कवड्याला दाणे. काही पक्षी वेगवेगळ्या निवासस्थानांमध्ये राहतात.