10 Chan Chan Goshti Marathi with Moral – छान छान मराठी गोष्टी वाचण्यासाठी

हॅलो वाचकांनो.. आज मी तुम्हाला 10 Chan Chan Goshti Marathi with Moral, chan chan goshti marathi book आणि chan chan goshti marathi lyrics देणार आहे तर चला बघुयात.

१. बेडूक व उंदीर । Chan Chan Goshti Marathi with Moral

३. बेडूक व उंदीर । Chan Chan Goshti Marathi with Moral

बेडूक व उंदीर दोघे मित्र होते. बेडूक तलावाकडे राहत होता. तर, उंदीर तलावाशेजारी बिळात राहत होता. एकदा उंदराने बेडकाला आपल्या घरी जेवणाचे निमंत्रण दिले.

उंदीर व बेडकाने येथेच्छ जेवण केले. बेडूक खूष झाला. त्यानेही उंदराला जेवणाचे निमंत्रण दिले. उंदीर जेवणासाठी बेडकाकडे निघाला, परंतु बेडकाचे घर पाण्यात असल्यामुळे उंदराला जाता येत नव्हते. इकडे बेडूक चिंतेत पडला.

उंदीर का आला नाही याला विचार करू लागला. पाण्याबाहेर येऊन बघतो तर उंदीर काठाजवळ बसला होता. बेडकाला मित्राची अडचण समजली. त्याला एक युक्ती सुचली.

बेडकाने आपल्या पायाला उंदराची शेपटी बांधली आणि निघाला. काय गंमत! उंदराच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागले व बिचारा उंदीर मरण पावला. बेडकाला खूप वाईट वाटले. बेडकाच्या पायाला उंदराची शेपटी बांधून असल्यामुळे बेडूक पाण्यात व पाण्यात व उंदीर तलावात तरंगू लागले.

आकाशामध्ये घार उडत होती तिचे लक्ष पाण्यात तरंगणाऱ्या उंदराकडे गेले. घारीने उंदराला चोचीत पकडले व उडून दूर निघून गेली. उंदीर बेडकाच्या पायाला असल्यामुळे बेडूकही लटकून होता. घारीने उंदीर व बेडकाला फस्त केले. बेडकालाही आपले जीव गमवावे लागले.

तात्पर्य : मित्र निवडताना योग्य अशाच मित्राची निवड करावी.

२. स्वार्थी कावळा । Chan Chan Goshti Marathi with Moral

७. स्वार्थी कावळा । Chan Chan Goshti Marathi with Moral

एका कावळ्याला एक बदाम सापडली, पण ती त्याला चोचीने फोडता येईना, ते पाहून दुसरा कावळा म्हणाला, “असे जे काम शक्तीने करता येत नाही, ते युक्तीने कर.

तू ही बदाम चोचीत धरून खूप उंच जा व तिथून खाली एका दगडावर सोडून दे. म्हणजे दगडावर आपटून ती फुटेल.” त्याचा सल्ला ऐकून कावळा उंच गेला आणि त्यान बदाम खाली टाकली खाली पडल्याबरोबर बदाम फुटली.

त्याचबरोबर तिथे बसलेल्या त्या दुसऱ्या कावळ्याने ती उचलली आणि ह्या कावळ्याला फसविल्याच्या अविर्भात पहिल्या कावळ्याकडे पाहून जोराजोराने हसू लागला. त्यामुळे त्याच्या चोचीतून बदाम खाली पडली. झाडाखाली बसलेल्या चाणाक्ष कोल्हाने बदाम उचलली.

तात्पर्य : कुणाला फसवू नये. त्यामुळे आपलेच सुकसान होते.

३. साधू आणि अस्वल । Chan Chan Goshti Marathi with Moral

९. साधू आणि अस्वल । Chan Chan Goshti Marathi with Moral

एक साधू होता आणि घनदाट अरण्यातून आपल्या पर्णकुटीकडे जात असताना वाटेत साधुला अस्वल लंगडत चालत असल्याची दिसले. तेव्हा साधू अस्वलाजवळ गेला असता अस्वलाच्या पायाला काटा रुतल्याचे दिसले.

तेव्हा साधुने अस्वलाच्या पायातील काटा काढला. पायातील काटा काढल्यामुळे अस्वलाला बरे वाटले. पायाचा त्रास कमी झाला. इकडे साधू आपल्या रस्त्याने चालू लागला. परंतु अस्वलाला साधूने केलेल्या उपकाराची आठवण झाली.

अस्वलसुद्धा साधुच्या मागे मागे चालू लागला. हे साधुला कळले तेव्हा साधू म्हणाले, मी माझे कर्तव्य केले. माझ्याबरोबर तुला येण्याची काही गरज नाही. तेव्हा अस्वल म्हणाले, मला तुमची सेवा करण्याची संधी द्या.

मी तुमची सेवा करीन, आपले उपकार फेडल्याशिवाय मला चैन पडणार नाही. पुन्हा अस्वल साधुच्या मागे चालू लागला. साधू विश्रांतीसाठी एका वृक्षाखाली थांबला व झोपी गेला.

अस्वल मात्र साधुच्या बाजूला बसून होता. तेवढ्यात एक मधमाशी साधुच्या नाकावर बसली व साधुला त्रास देऊ लागली. तेव्हा अस्वलास मधमाशीचा राग आला. अस्वाने मधमाशीला बाजूला करण्यासाठी, पंजाने मधमाशीला मारले.

मधमाशी उडून गेली आणि अस्वलाच्या पंजाने साधुचे नाक जखमी झाले. साधू खडबडून जागा झाला. अस्वल उपकार करायला गेला व अपकार करून बसला याचे अस्वलास खूप दुःख झाले.

तात्पर्य : शहाण्याचा चाकर व्हावे पण मूर्खाचा धनी होऊ नये.

४. कपटी लांडग्याची फजिती । Chan Chan Goshti Marathi with Moral

१०. कपटी लांडग्याची फजिती । Chan Chan Goshti Marathi with Moral

एक भुकेला लांडगा होता. तो शिकारीच्या शोधात निघाला असता त्याला एक धष्टपुष्ट गाढव दिसला. त्याच्या तोंडाला पाणी सुटले. तो त्या गाढवाकडे गेला व गाढवाला म्हणाला, “गाढवराव मी नामवंत वैद्य आहे.

तुझी प्रकृती तपासून का? गाढवाने लांडग्याचा दुष्ट हेतू ओळखला व लांडग्याला म्हणाला, वैद्यराज माझी प्रकृती तशी उत्तम आहे. परंतु माझ्या उजव्या पायात काटा रुतला आहे. तेवढा काढा.

‘गाढव आपल्या बोलण्याने फसले’ या खुशीत तो लांडगा त्या गाढवाला मारण्याच्या उद्देशाने त्याच्या मागच्या पायाजवळ जाताच, गाढवाने अशा दोन-चार लाथा झाडल्या की, लांडग्याचे नाक व तोंड फुटून रक्तबंबाळ झाले. ते पाहून हुशार गाढव हसू लागला. जखमी लांडगा धूम पळत सुटला.

तात्पर्य : या जगात शेराला शव्वाशेर भेटतो. तेव्हा दुसऱ्याला कमजोर समजू नये.

५. शिष्याची परीक्षा । Chan Chan Goshti Marathi with Moral

१. शिष्याची परीक्षा । Chan Chan Goshti Marathi with Moral

प्राचीन काळी गुरुकुल पद्धती होती. तेव्हा आचार्यांकडे तीन शिष्य विद्या ग्रहण करण्यासाठी आहे. आचार्यांनी आपल्या आश्रमामध्ये विद्यादानाचे कार्य सुरू केले.

विद्या ग्रहण करीत असताना आचार्यांच्या सहवासात आश्रमातील दिवस भराभर निघून गेले. शिक्षण पूर्ण झाल्यावर तीनही शिष्य गुरुदक्षिणा देण्यासाठी आचार्यांकडे गेली. तेव्हा आचार्यांनी शिष्यांची परीक्षा घ्यायचे ठरविले.

दुसऱ्या दिवशी तीनही शिष्य परीक्षेला आले. इकडे आचार्यांनी परीक्षा घेण्यासाठी रस्त्यावर काटे पसरवून ठेवले होते. आचार्यांनी शिष्यांना सांगितले की, “हा काटेरी मार्ग पार करून आश्रमामध्ये प्रवेश करायचे.’ ठरल्याप्रमाणे आचार्य आश्रमात बसून होते.

सर्वप्रथम पहिला शिष्य काटेरी मार्गावरून पायी चालत चालत आश्रमात आचार्याकडे गेला. तेव्हा शिष्याचे पाय पूर्ण रक्तबंबाळ झाले होते. त्यानंतर दुसरा शिष्य काटेरी मार्गावरून पाऊलवाटेतील काटे बाजूला सारून पायाला एकही काटा रुतू न देता आचार्यांजवळ पोहोचला.

नंतर तिसऱ्या शिष्याने हाती झाडू घेऊन रस्त्यावरील काटे झाडून रस्ता साफ केला आणि सर्व काटे जाळून टाकल्यानंतर आचार्यांजवळ आला जेव्हा आचार्यांनी तिसऱ्या शिष्याचे अभिनंदन केले; तेव्हा दोन्ही शिष्यांना आश्चर्य वाटले.

तेव्हा पहिला शिष्य आचार्यांना म्हणाला, “मी कशाचीही पर्वा न करता रक्तबंबाळ होऊन आपल्याजवळ आलो.” दुसरा शिष्य म्हणाला, “मी एकही काटा रुतू न देता सुखरूप आपल्याजवळ आलो.

तेव्हा आचार्यांनी शांतपणे उत्तर दिले, “शिष्योत्तमा, तुला काही गरज नसताना पाय रक्तबंबाळ करून आलास.” दुसऱ्या शिष्याला म्हणाले, “तू काटेरी रस्त्यावरून येताना फक्त स्वतःपुरता विचार केलास.” तर तिसऱ्या शिष्याने मात्र स्वतःचा विचार करून दुसऱ्यांचाही विचार केला. असे आचार्यांनी सांगताच दोन्ही शिष्य निरुत्तर झाले.

तात्पर्य : जीवन जगत असताना स्वतःबरोबरच दुसऱ्यांचासुद्धा विचार करावा.

६. महाराणीची कमाल । Chan Chan Goshti Marathi with Moral

२. महाराणीची कमाल । Chan Chan Goshti Marathi with Moral

एक रजपूत राजा होता. तो आपल्या दरबारात बसला होता. तेवढ्यात एक जादूगार दरबारात आला. त्याने दरबारात भली मोठी गाय उभी केली. आपल्या दोन्ही हातांनी ती उचलून दाखवली. राजा थक्क झाला व जादूगाराचे कौतुक करू लागला.

तिकडे जवळ बसलेली राणी म्हणाली, “त्यात काय विशेष, मीदेखील उचलून दाखवेन अशी एखादी गाय!” राजा म्हणाला, “काय गंमत करतेस की काय? तू एक स्त्री गाईला उचलणार? अगं जे मला शक्य नाही,

एका पहेलवानाला जे जमणार नाही, ते तू कसे काय करणार?” राणी म्हणाली, “बघा! ते मी करून दाखवते की नाही. मात्र मला सहा महिन्यांची मुदत हवी. त्यानंतर पाहा!” सहा महिने संपले.

पुन्हा दरबार भरला आणि एका लठ्ठ गायीला पुढे घेऊन आला. जो तो म्हणू लागला- ‘इतकी दांडगी गाय कशी उचलणार राणीसाहेब?’ पण खरोखरच राणीने आपल्या हातानी त्या गाईला उचलून घेतले.

राजाला आश्चर्य वाटले, अचंबित झाला. त्याने राणीला विचारले, “कसे काय जमवलेस सारे?” राणी म्हणाली, “अगदी सोपे आहे ते. मी फक्त एकच केले. ही गाय वासरू असल्यापासून तिला वर उचलायला सुरुवात केली. वासरू लहान असताना सोपे गेले नंतर प्रत्येक दिवशी त्याचे वजन वाढत गेले मी देखील त्याची सवय केली बस्स. जमलं शेवटी!”

तात्पर्य : सरावानं सर्व काही साध्य होते.

७. गर्वाचं घर खाली । Chan Chan Goshti Marathi with Moral

४. गर्वाचं घर खाली । Chan Chan Goshti Marathi with Moral

वामन पंडित या विद्वान कवीला आपल्या ज्ञानाचा भलताच गर्व झाला होता. ते गावोगाव जात व तिथल्या विद्वानांना वादविवाद करण्याचे आव्हान देत आणि पराभूत करून त्यांच्याकडून अजिंक्यपत्रे मिळवीत.

एकदा वामन पंडित समर्थ रामदास स्वामीकडे गेले व त्यांना म्हणाले, “माझ्याशी वादविवाद करा, नाहीतर मला अजिंक्यपत्र द्या.” त्यावर समर्थ म्हणाले, “अगोदर माझ्या शिष्याचा पराभव करा आणि मगच माझ्याकडे या.”

शेवटी वामन पंडित समर्थांच्या कल्याण नावाच्या शिष्याकडे गेले असता शिष्य सुपाऱ्या मोजत होते. वामन पंडित आपल्याकडे कशाला आले याची कल्पना आलेल्या त्या शिष्याने शेजारी असलेल्या सुपाऱ्यांच्या राशीतून ओंजळभर सुपाऱ्या घेऊन पंडिताला विचारले,

“पंडित, माझ्या ओंजळीत किती सुपाऱ्या आहेत?” या अनपेक्षित प्रश्नाने वामन पंडित क्षणभर गोंधळून गेले व म्हणाले, “मला सांगता येत नाही. तुम्हाला सांगता येईल काय?” कल्याण म्हणाले, “माझ्या ओंजळीत ओंजळभर सुपाऱ्या आहेत.” या उत्तराने वामन पंडित निरुत्तर झाले. म्हणून वादविवादात जय मिळवितो तो पंडित नसून, जो विधायक कार्य करतो तोच खरा पंडित.

तात्पर्य : गर्वाचे घर खाली.

८. प्रामाणिकपणा । Chan Chan Goshti Marathi with Moral

५. प्रामाणिकपणा । Chan Chan Goshti Marathi with Moral

एका शेतकऱ्याने आपले शेत गणपत नावाच्या शेतकऱ्याला विकले. गणपतरावाने शेताच्या एका कोपऱ्यात विहिरीसाठी खोदकाम सुरू केले. असता खोदकाम सुरू केले असता खोदकामात सोन्याच्या मोहरा भरलेला भला मोठा हंडा मिळाला.

गणपतराव तो हंडा घेऊन ज्यांच्याकडून शेत विकत घेतले त्यांच्याकडे गेले व म्हणाले, मी तुमचे फक्त शेत विकत घेतले होते. मला सापडलेल्या मोहरांच्या हंड्याचा ‘खरा मालक’ तुम्हीच असल्यानं या हंड्याचा स्वीकार करा.

तेव्हा तो शेतकरी म्हणाला, हा काय न्याय झाला? अरे, ज्या अर्थी मी तुम्हाला शेत विकले तेव्हा त्यात जेजे मिळेल ते सर्व तुमचेच आहे. त्यामुळे तो हंडा घेण्याचा मला अधिकार नाही.

शेताचा पूर्वीचा मालक मोहराचा हंडा घेत नाही हे पाहून गणपतराव राजाकडे गेले व त्यांच्यापुढे आपली तक्रार मांडली. राजाने पूर्वीच्या शेतकऱ्याला बोलावून घेतले व दोघांचेही विचार ऐकून घेतले. दोघांचेही म्हणणे ऐकून घेतल्यावर, राजाने ते धन दोघांना वाटून दिले व त्यांच्या प्रामाणिकपणावर खूष होऊन, दोघांना भरपूर बक्षीस दिले.

तात्पर्य : प्रामाणिक व्हा.

९. खरी देशभक्ती । Chan Chan Goshti Marathi with Moral

६. खरी देशभक्ती । Chan Chan Goshti Marathi with Moral

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात उच्च शिक्षण घेण्यासाठी वसतीगृहातील एका खोलीमध्ये भारतातील व जपान मधील युवक एकत्र राहत असत.

रविवारी सुट्टी असल्यामुळे इतर काम सुट्टीच्या दिवशी करीत होते. एका रविवारी दोघांचीही दाढी करायची असल्यामुळे ब्र ड आणण्याकरीता बाहेर पडले. भारतातील युवकाने वसतीगृहासमोर असले.

या दुकानातून ब्लेड खरेदी करून दाढी केली, परंतु जपानमधील युवक :२ वाजेपर्यंत आला नाही. शेवटी दुपारी १.०० वाजता हा युवक आला. तेव्हा भारतातील युवक म्हणाला, “एवढा वेळ तू कुठे गेला होता?” तेव्हा जपान मधोल युवक म्हणाला, “मी माझ्या देशातील उत्पादन केलेले ब्लेड शोधत होतो. त्यामुळे मला उशीर झाला.

तात्पर्य : देशाबद्दल प्रेम असावे.

१०. लोभाचे फळ । Chan Chan Goshti Marathi with Moral

८. लोभाचे फळ । Chan Chan Goshti Marathi with Moral

एक राजा होता. त्याने आपली सर्व जमीन दान करण्याचे ठरविले. त्याकरिता सर्व पंचक्रोशातील गावात दवंडी दिली. त्याप्रमाणे ठरलल्या ठिकाणी अनेक गरजू लोक एकत्र आले.

तेव्हा राजाने प्रथम आपली अट सांगितली, “सूर्यास्तापूर्वी गोलाकर धावत जाऊन गोल पूर्ण करेल त्याला तेवढी जमीन मिळणार. तेव्हा एक निर्धन धावू लागला.

सूर्यास्तापर्यंत गोल पूर्ण करायचा असल्यामुळे भरपूर जमीन मिळविण्याच्या हेतूने तो धावू लागला. सूर्यास्ताची वेळ झाली परीघ पूर्ण होण्यास लांब अंतर होते. तेव्हा गोल पूर्ण करण्यासाठी पुन्हा जोराने धावू लागला. सूर्यास्त होण्याच्या आत परीघ पूर्ण झाला खरा परंतु अतिश्रमाने तो मरण पावला.

तात्पर्य : अधिक लोभापायी आपले नुकसान होते.

आणखी वाचा – मराठी सुविचार अर्थासहित

काय शिकलात?

आज आपण 10 Chan Chan Goshti Marathi with Moral – छान छान मराठी गोष्टी वाचण्यासाठी पाहिल्या आहे, पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment