50+ सुविचार मराठी छोटे । Small Marathi Suvichar

हॅलो वाचकांनो कसे आहात.. आज मी तुम्हाला 50+ सुविचार मराठी छोटे । Small Marathi Suvichar देणार आहे. तर चला हुयात नवीन छोटे मराठी सुविचार. आणखी वाचा – शालेय प्रार्थना आणि परिपाठ

50+ नवीन छोटे मराठी सुविचार - 50+ New Small Marathi Suvichar 2021

सुविचार मराठी छोटे – New Small Marathi Suvichar

१. “सुख एकट्याने भोगू नये, व दुःख दुसऱ्याला वाटायला जाऊ नये.”

२. “आळस इतका सावकाश प्रवास करतो की, दारिद्र त्यास ताबडतोब गाठते.”

३. “सुखात इतरांना वाटेकरी केले तर ते वाढत राहते, दुःखात इतरांचे सहकार्य मिळाले तर ते कमी होते.”

४. “असत्य दुबळे असते. स्वतःच्या अस्तित्वासाठी त्याला सत्याचे साहाय्य घ्यावे लागते.”

५. “सत्य स्वतःमध्ये आहे. जो स्वतःमध्ये प्रवेश करतो त्यालाच सत्य सापडते.”

६. “आई, मातृभूमी यांचे श्रेष्ठत्व स्वर्गातून अधिक आहे.”

७. “सत्याचा शेवट सुख, समाधानाच्या मार्गाने जातो.”

८. “जो मनाला जिंकतो तो जगालाही जिंकू शकतो.”

९. “जिथे बुद्धीने निर्णय घेऊन शासन केले जाते, तेथे शांती आणि समृद्धीची वाढ होते.”

१०. “जेव्हा मन प्रसन्न असते तेव्हा बुद्धी स्थिर असते.”

११. “जीवनात सुख मिळवायचे असेल, तर गतकाळ विसरून जगण्याची आंतरिक्त शक्ती मिळवावी.”

१२. “पावसानंतर ऊन जसे सुखदायक असते, तसे प्रेम हे आत्माला सुख देणारे असते.”

१३. “मन अवयवांना संदेश देत आणि अवयवांकडून कार्य घडत. मन सशक्त केल्यास यशप्राप्ती होते.”

१४. “वाचनातून चिंतन-मनाचा प्रवास सुरु होतो जो ध्येय पूर्तीकडे नेणारा असतो.”

१५. “सारासार विचार करून विवेकाने प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेतल्यास यशप्राप्ती होते.”

१६. “ईश्वरावर श्रद्धा असणे म्हणजे तुमची स्वतःवर श्रद्धा असणे होय.”

१७. “ध्येयवादी वेक्तीला सुख लागत नाही. आणि सुखासीन वेक्तीजवळ ध्येय राहत नाही.”

१८. “अंतर्मनात एखादी इच्छा रुजवली, तर ती यशस्वी होते.”

१९. “ज्ञान संचयाचे आणि आत्मविकासाचे सर्वतोम साधन म्हणजे स्वाध्याय होय.”

२०. “शिक्षणामुळे ज्ञानाची दृष्टी येते, आकलनशक्ती वाढते, आत्मविश्वास आणि प्रगल्भता येते.”

२१. “संयमित मन हे कोणतीही प्रगती लवकर करते.”

२२. “जेव्हा मन व हृदय दोन्ही शांत असतात, तेव्हाच मनुष्याला खरी शांती मिळते.”

२३. “रागात असताना कोणतीही महत्वाची कृती करू नये, अथवा कोणालाही शब्द देऊ नये.”

२४. “कृतीपेक्षा शब्दाने शत्रू निर्माण होण्याची शक्यता जास्त असते.”

२५. “सहिष्णुता हि खऱ्याखुऱ्या सुसंस्कृतपणाची एक महत्वपूर्ण खूण आहे.”

२६. “एखाद्या कामातील यश हे वापरलेल्या साधनात नसते, ते प्रत्येक्ष केलेल्या पराक्रमात असते.”

२७. “मातृभाषा आणि त्याद्वारे येणारे संस्कार आपणाला अखेरपर्यंत सोबत करतात.”

२८. “समाजासाठी सेवाभाव बाळगून निस्वार्थीपणे काम करणाऱ्याच्या सेवेस सारे जग मदतीला येते.”

२९. “चांगल्या-वाईट गोष्टीचा कल तुमचे मन प्रामाणिकपणे देत असत, मनाचे चांगले मार्गदर्शक घ्यावे.”

३०. “कोणत्याही गोष्टीसाठी प्रथम ज्ञान, बुद्धी मग कल्पना, मग विचार, मग आराखडा आणि नंतर अथक प्रयत्नाने यशप्राप्ती होते.”

३१. “खरे ज्ञान हे सुंदर असते, ते प्रसन्न असते, ते सुखद असते. आनंदाचे किरण आसमंतात पसरविणारे असते.”

३२. “निराश होऊन जगण्यापेक्षा आशावादी दृष्टिकोन ठेऊन जगणेच श्रेयस्कर आणि सुखद असते.”

३३. “ग्रंथ विरहित घर हे आत्माविरहित शरीरा सामान असते.”

३४. “कृतीयुक्त दृष्टिकोन विकसित करा. समस्यांचा आधीच अंदाज घ्या. आणि त्यावरील उपाय तयार ठेवा.”

३५. “एकवेळ जग जिंकता येईल, पण मनाचे विकार जिंकता येत नाहीत. ते जो जिंकतो, तोच महावीर.”

३६. “आत्म्याचा आवाज परमात्मानपर्यंत घेऊन जाणारा संदेशवाहक म्हणजे प्रार्थना.”

३७. “कृतियुक्त दृष्टिकोन विकसित करा. समस्यांचा आधीच अंदाज घ्या आणि त्यावरील उपाय तयार ठेवा.”

३८. “ध्येर्य हे प्रेमासारखे आहे. नुसत्या आशेच्या बळावर ते वाटेल तितके वाढते. “

३९. “जोवर तुमची श्रद्धा स्वतःवर नाही, तोवर तुम्ही ईश्वरावर श्रद्धा ठेऊ शकत नाही.”

४०. “बाह्य गोष्टीत सुख शोधणे व्यर्थ आहे. सुखाचे भांडार तर तुमच्या अंतरंगातच असते.”

४१. “ज्ञान मिळवा म्हणजे धैर्य आणि आत्मविश्वास आपोआप तुमच्या मदतीला येईल.”

४२. “तुमच्या विचारांवरच तुमचे सौख्य, समाधान आणि संतोष अवलंबून असतो.”

४३. “आपले वर्तन म्हणजे विचार, उच्चार आणि आचार यांचा एकात्म आविष्कार हवा.”

४४. “मनशांती आणि आत्मिक आनंदाचे खाते शिगोशीग भरायचे असेल तर सतत ईश्वर स्मरण करावे.”

४५. “ज्या गोष्टी कोणाच्या स्वप्नातही येणार नाहीत, अश्या गोष्टी प्रार्थनेमुळे सध्या होतील.”

४६. “कोणाचे अंत:करण न दुखावता बोलणे हे वाचेचे तप समजले जाते.”

४७. “आपल्या भावनांपेक्षा आपल्या आचरणाचा प्रभाव समाजमनावर जास्त होतो.”

४८. “मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नव्हे तर कर्तृत्वावर आवलंबून असते.”

४९. “वर्तमान काळातील कर्म आणि त्याग यावर भविष्यकाळातील आपली जडण घडण होत असते.”

५०. “कोणतीही गोष्ट येणाऱ्या परिस्तितीवर आणि अडचणींवर मात केल्याशिवाय यशस्वी होत नाही.”

५१. “आपली दैनंदिन कर्तव्य रोजच्या रोज आणि वेळेवर पूर्ण करा त्यामुळे कामात सुसंबद्धता येते.”

काय शिकलात?

आज आपण 50+ सुविचार मराठी छोटे – 50+ New Small Marathi Suvichar 2021 पाहिले आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment