A P J Abdul Kalam Information in Marathi – ए. पी. जे. अब्दुल कलाम बद्दल माहिती मराठीत

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला A P J Abdul Kalam Information in Marathi – ए. पी. जे. अब्दुल कलाम बद्दल माहिती मराठीत देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – जयंत विष्णू नारळीकर

A P J Abdul Kalam Information in Marathi - ए. पी. जे. अब्दुल कलाम बद्दल माहिती मराठीत

माहिती – A P J Abdul Kalam Information in Marathi

मुलांनो, तुम्हाला माहितीच आहे की भारताने चंद्रावर चांद्रयान पाठवून मोजक्याच प्रगत देशांत महत्त्वाचे स्थान पटकावले आहे. या उज्ज्वल यशामागे अनेक तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञांचे कठोर परिश्रम कारणीभूत आहेत.

अशा शास्त्रज्ञांत डॉ. अब्दुल कलाम यांचे नाव खूप आदराने घेतले जाते. डॉ.अब्दुल कलाम हे ‘मिसाईल मॅन’ म्हणूनच भारतात ओळखले जातात.

त्यांनी अग्नी व पृथ्वी ही क्षेपणास्त्रे तसेच उपग्रह प्रक्षेपणासाठी वापरण्यात येणारे अग्रीबाण विकसित करण्यात मोलाचे संशोधन केले आहे. अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर, १९३१ रोजी तामिळनाडूतील रामेश्वरम येथे झाला.

चेन्नई येथूनच एअरॉनॉटिकल अभियांत्रिकीमधील पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी भारताच्या प्रक्षेपणास्त्रे व प्रक्षेपक अग्निबाण विकसन कार्यक्रमात स्वत:ला झोकून दिले.

भारत सरकारच्या संरक्षण विभागाचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांनी सुमारे सात वर्षे काम केले. त्यांच्याच कारकीर्दीत भारताने पोखरण येथे यशस्वीरित्या अणुस्फोटाची चाचणी घेतली.

त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना अनेक विद्यापीठांकडून डॉक्टरेट देऊन सम्मानित करण्यात आले. भारत सरकारनेही पद्मभूषण, पद्मविभूषण हे किताब देऊन त्यांचा गौरव केला.

१९९७ मध्ये भारतातील सर्वोच्च समजला जाणारा भारतरत्न हा किताबही त्यांना बहाल करण्यात आला. २००२ मध्ये त्यांची भारताचे राष्ट्रपती म्हणून निवड झाली. पाच वर्षे ते त्या स्थानावर होते.

२०२० सालापर्यंत भारत महासत्ता व्हावी, हे त्यांचे स्वप्न आहे. त्यासाठी त्यांनी अविरत परिश्रम घेतले. असेच परिश्रम घेऊन त्यांचे व पर्यायाने प्रत्येक भारतीयांचे स्वप्न पूर्ण करणे, हे आपले कर्तव्यच नाही काय?

काय शिकलात?

आज आपण A P J Abdul Kalam Information in Marathi – ए. पी. जे. अब्दुल कलाम बद्दल माहिती मराठीत पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment