अक्षय्य तृतीया माहिती, इतिहास मराठी | Akshaya Tritiya Information in Marathi

हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला अक्षय्य तृतीया माहिती, इतिहास मराठी | Akshaya Tritiya Information in Marathi सांगणार आहे तर चला बघुयात.

अक्षय्य तृतीया माहिती, इतिहास मराठी  Akshaya Tritiya Information in Marathi

आणखी वाचा – बैलपोळा

अक्षय्य तृतीया मराठी | Akshaya Tritiya Information in Marathi

वैशाख शुद्ध तृतीया या दिवसाला अक्षय्य तृतीया असे म्हणतात. या तिथीला केलेला जप, होम, पितृतर्पण, दान इत्यादी केलेले कोणतेही पुण्यकर्म अक्षय्य होते. म्हणजे त्याचा नाश होत नाही. म्हणून या तिथीला अक्षय्य तृतीया असे म्हणतात. कृतयुगाचा हा प्रारंभदिन. वर्षातील प्रसिद्ध साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक पूर्ण मुहूर्त. कोणत्याही शुभकार्याला हा दिवस उत्तम समजला जातो. म्हणून या दिवशी नवीन जागा, संस्था, नवीन व्यापार यांची सुरुवात करतात. या दिवशी सोमवार किंवा बुधवार आणि रोहिणी नक्षत्र असेल तर तो अतिशय श्रेष्ठ योग समजला जातो.

शक्य झाल्यास या दिवशी प्रातःकाळी गंगास्नान, समुद्रस्नान करावे किंवा आपल्या गावच्या नदीत, पवित्र तीर्थात स्नान करावे व दानधर्म करावा. भगवान विष्णूच्या प्रीत्यर्थ हा सण रूढ झाला आहे. म्हणून या दिवशी भगवान विष्णूची यथासांग पूजा करावी. या अक्षय्य तृतीयेसंबंधी एक प्राचीन कथा आहे. ती अशी – एका गावात एक व्यापारी राहत होता. तो नेहमी दानधर्म करीत असे.

देवपूजा करीत असे. मंदिरात देवदर्शनाला जात असे व तेथे साधुसंतांच्या कथा मोठ्या भक्तिभावाने ऐकत असे. काही दिवसांनी त्या व्यापाऱ्याची सगळी संपत्ती संपली. त्याला दारिद्र्य आले. एके दिवशी तो कीर्तनाला गेला असता तेथे त्याने ऐकले की बुधवारी रोहिणी नक्षत्रासह तृतीया आल्यास त्या दिवशी केलेले पुण्य अक्षय्य राहते. आणि एक दिवस तसा योग आला! वैशाखातील ती तृतीया होती. वार बुधवार होता व रोहिणी नक्षत्र होते. व्यापाऱ्याला अतिशय आनंद झाला. त्याच्याजवळ कष्ट करून साठविलेले काही पैसे होते.

त्या व्यापाऱ्याने मोठ्या भक्तिभावाने त्या दिवशी दानधर्म केला. काही दिवसांनी तो व्यापारी मरण पावला. पुढच्या जन्मी तो कुशावती नगरीचा राजा झाला. त्याने मोठे यज्ञ केले. दानधर्म केला. त्याला सर्व सुखे मिळाली. तरीसुद्धा त्याने पूर्वजन्मी केलेल्या पुण्याचा क्षय म्हणजे नाश झाला नाही. ते अक्षय्य राहिले. हीच अक्षय्य तृतीया. फार वर्षांपूर्वी ऋषभदेवाने याच तिथीला हस्तिनापूरचा राजा श्रेवांस याच्या घरी उसाचा रस प्राशन केला. त्यामुळे राजाच्या भोजनगृहातील अन्न कधीच संपले नाही.

ते अक्षय्य राहिले. म्हणून या तिथीला अक्षय्य तृतीया असे म्हणतात. वैशाख महिन्यात अत्यंत कडक उन्हाळा असतो. अशा वेळी तहानलेल्यांना पिण्यासाठी थंडगार पाणी देणे हे पुण्यकर्म समजले जाते. म्हणून अक्षय्य तृतीयेच्या दिवशी उदककुंभ दान देण्याची पद्धत आहे. यामुळे पितर तृप्त होतात व ते आपल्याला आशीर्वाद देतात, म्हणून या दिवशी उदककुंभदान करावे. उदककुंभाचे दान करताना प्रथम त्या कुंभाची पूजा करतात. नंतर पुढील प्रार्थना म्हणतात –

एष धर्मघटो दत्तो ब्रह्मविष्णुशिवात्मकः ।
अस्य प्रदानात् तृप्यन्तु पितरोपि पितामहाः ।।
गंधोदकं तिलैमिश्रं सान्नं कुंभं फलान्वितम् ।
पितृभ्यः संप्रदास्यामि ह्यक्षय्यमुपतिष्ठतु ।।

(ब्रह्मा-विष्णू-महेश यांचा जणू आत्माच असा हा धर्मकुंभ (जलकुंभ) मी दान देत आहे. याने माझे पितर संतुष्ट होवोत. गंध, तीळ, अन्न आणि फळे यांसह हा उदककुंभ मी पितरांच्या संतोषासाठी देत आहे. तो अक्षय्य त्यांच्या उपयोगी पडो.)

अक्षय्य तृतीया हा दिवस अत्यंत पवित्र व शुभ समजतात. विष्णूच्या दशावतारातील सहावा अवतार महापराक्रमी वीर परशुराम याचा जन्म याच दिवशी झाला. या दिवशी चैत्रागौरीचे विसर्जन करतात. घरोघरी हळदीकुंकू-समारंभ साजरा करतात. गुजरातमध्ये या दिवसाला ‘आखातरी’ असे म्हणतात. महाराष्ट्रात ग्रामीण भागात ‘आखिती’ या नावाने हा अक्षय्य तृतीया सण ओळखला जातो.

काय शिकलात?

आज आपण अक्षय्य तृतीया माहिती, इतिहास मराठी | Akshaya Tritiya Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment