अक्षय्य तृतीया सणाबद्दल माहिती मराठी | Akshaya Tritiya Information in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला अक्षय्य तृतीया सणाबद्दल माहिती मराठी | Akshaya Tritiya Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – 15 Festivals Information in Marathi

Akshay Tritiya Information in Marathi
दिनांक :३ फेब्रुवारी २०२२
महिना :वैशाख.
तिथी :तृतीया
पक्ष :शुक्ल

धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मानुसार येणारा दुसरा महिना वैशाख. या महिन्यातील अक्षय्य तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून ओळखला जातो. या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेले दान निरंतर म्हणजे अक्षय्य टिकते; म्हणून या तिथीला अक्षय्य तृतीया म्हणतात.

दिवसाचे महत्त्व

चैत्रात बसविलेल्या चैत्रगौरीच्या व्रताचा शेवटचा दिवस. याच दिवशी परशुरामाचा जन्म झाला. (परशुरामाची जयंती). या दिवशी आपले पितर घरी पाणी पिण्यास येतात. अशी धारणा असल्याने पाण्याचे घडे दान करण्याची प्रथा आहे. या दिवशी आपल्याला जे आवडते ते दान द्यावे.

या दिवशी त्रेतायुगास आरंभ झाला. याच दिवशी पितरांचे श्राद्ध करतात. मातीचे घट एक पाण्याने, दुसरा तांदूळ-तीळ भरून, त्यांना दोरा गुंडाळून ते धान्यावर ठेवावेत. विष्णू- शिवस्वरूपात त्यांची पूजा करून दान केल्याने पितर तृप्त होतात. दक्षिण भारतापेक्षा उत्तर भारतात याचे विशेष महत्त्व आहे.

इतर माहिती

याच दिवशी शेतकरी नांगरणीस सुरुवात करतात. या दिवशी आपण जे दान देऊ ते निरपेक्ष भावनेने, निरलस मनाने करावे. कधीही नाश न पावणारे ते अक्षय्य म्हणूनच या शुभदिवशी आपण ज्या कार्याची सुरुवात करतो त्याची प्रगतीच होत जाते, त्याचा कधीही नाश होत नाही.

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा केला जातो. निसर्ग, पितर, पशु-पक्षी, भूमी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जमेल तेवढा प्रयत्न करा, असे आपल्या संस्कृतीचे सांगणे आहे.

काय शिकलात?

आज आपण अक्षय्य तृतीया सणाबद्दल माहिती मराठी | Akshaya Tritiya Information in Marathi पाहिली आहे, पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment