आषाढी एकादशी माहिती, इतिहास मराठी | Ashadhi Ekadashi Information in Marathi

हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला आषाढी एकादशी माहिती, इतिहास मराठी | Ashadhi Ekadashi Information in Marathi सांगणार आहे तर चला बघुयात.

आषाढी एकादशी माहिती, इतिहास मराठी | Ashadhi Ekadashi Information in Marathi

आणखी वाचा – वटपौर्णिमा

आषाढी एकादशी मराठी | Ashadhi Ekadashi Information in Marathi

आषाढ शुद्ध एकादशी व कार्तिक शुद्ध एकादशी या दोन एकादशांना महाएकादशी असे म्हणतात. आषाढी एकादशीला शयनी एकादशी असे म्हणतात तर कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी किंवा देवोत्थान एकादशी असे म्हणतात. निदान या दोन्ही एकादशींना तरी कुणीही अन्न खाऊ नये. उपवास करावा, असे पुराणे सांगतात. खूप वर्षांपूर्वी कुंभ नावाचा एक दैत्य होता. त्याच्या मुलाचे नाव मृदुमान्य. इतर दैत्यांप्रमाणे हा मृदुमान्य सुद्धा अत्यंत क्रूर, दुष्ट होता. स्वतःच्या सामर्थ्याने तो अत्यंत उन्मत्त झालेला होता. त्या वेळी देव-दैत्यांची सतत भांडणे होत असत.

भयंकर युद्धे होत असत. कित्येक दैत्य कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून किंवा शंकराकडून वर मिळवीत असत. त्यामुळे ते अधिकच उन्मत्त होत असत. युद्धात त्यांच्यापुढे देवांचे काहीएक चालत नसे. मृदुमान्याने सुद्धा भगवान शंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतले व मला कधीही मृत्यू येऊ नये असा वर मागितला. शंकरांनी त्याला वर दिला- “तुला कोणत्याही प्राण्याकडून मृत्यू येणार नाही. परंतु एका स्त्रीच्या हातून तुला मरण येईल.” या वरामुळे मृदुमान्य अधिकच उन्मत्त झाला. त्याने सर्व देवांना जिंकले.

सगळ्यांना तो छळू लागला. सर्व देवांना जिंकल्यावर मृदुमान्य विष्णूला जिंकण्यासाठी वैकुंठास गेला. त्या युद्धात विष्णूचा पराभव झाला. विष्णू शंकराकडे गेला. पण स्वतः शंकरांनीच मृदुमान्याला वर दिला होता. त्यामुळे शंकराचेही काही चालेना. मृदुमान्याला घाबरलेले ब्रह्मा-विष्णू- महेश इतर सर्व देवांना बरोबर घेऊन त्रिकूट पर्वतावर आवळ्याच्या झाडाखाली एका गुहेत लपून बसले. त्या वेळी मुसळधार पाऊस पडत होता. सगळे देव चिंब झाले होते. पोटात अन्नाचा कण नाही. तोंडात पाण्याचा थेंब नाही. सगळ्यांना उपवास घडला. गुहेच्या बाहेर मृदुमान्य टपून बसला होता. त्यामुळे कुणाला बाहेर जाता येत नव्हते. त्या वेळी ब्रह्मा-विष्णू-महेश यांचे वास एकवटले व त्या श्वासांतून एक शक्तिदेवी निर्माण झाली.

सर्व देवांनी मृदुमान्याला ठार मारण्यासाठी त्या देवीला प्रार्थना केली. त्या शक्तिदेवीने मृदुमान्याला ठार मारले व सर्व देवांची सुटका केली. तीच एकादशी होय. ती देवांना म्हणाली, “माझे एकादशीचे व्रत जे करतील ते सर्व पापांतून मुक्त होतील. एकादशीला सर्वांनी उपास करावा. रात्री जागरण करावे. जे एकादशीला अन खातील त्यांना सर्व प्रकारची दुःखे भोगावी लागतील.” म्हणून या एकादशीच्या दिवशी उपवास करावयाचा असतो. आषाढ शुद्ध एकादशीला शयनी एकादशी किंवा ‘विष्णुशयनोत्सव’ असे म्हणतात. या दिवशी चातुर्मास सुरू होतो. या दिवशी लोक उपवास करतात.

प्रातःकाळी स्नान करून घरातील विष्णू, श्रीकृष्ण किंवा विठ्ठलाची षोडशोपचारे पूजा करतात. पुरुषसूक्ताने अभिषेक करतात. या दिवशी भगवान विष्ण शयन करतात म्हणजे झोपतात, असे पुराणांत सांगितले आहे. एकदा योगनिद्रेने तपश्चर्या करून भगवान विष्णुना प्रसन केले. प्रसन्न झालेल्या विष्णूंना योगनिद्रेने प्रार्थना केली- “भगवंता! मलासुद्धा आपल्या एखाद्या अंगावर स्थान द्या.” परंतु लक्ष्मी, शंख, गदा, पद्म, वैजयंतीमाळ, मुकुट, कर्णकुंडले, गरुड इत्यादींनी अगोदरच विष्णूच्या कोणत्या ना कोणत्या तरी अंगाचा आश्रय घेतला होता. म्हणून प्रसन्न झालेल्या विष्णूंनी योगनिद्रेला आपल्या डोळ्यांवर आश्रय दिला व ते तिला म्हणाले, “तू वर्षातून चार महिने माझ्या आश्रयाला राहशील.” हे ऐकून योगनिद्रेला अतिशय आनंद झाला.

तिने भगवान विष्णूच्या नेत्रांचा आश्रय घेतला व क्षीरसागरात योगनिद्रा धारण केली. विष्णू झोपी गेले. ही घटना आषाढ शुद्ध एकादशीला घडली म्हणून या एकादशीला शयनी महाएकादशी असे म्हणतात. या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. या काळात अनेक लोक व्रत-नियम करतात. देव झोपत असल्याने या काळात लग्न, मुंज, गृहप्रवेश इत्यादी शुभकार्य करीत नाहीत. आषाढी एकादशीला पंढरपूरला फार मोठी यात्रा भरते. पंढरपूर हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर अखिल भारताचे अत्यंत पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. याला भूलोकीचे वैकुंठ असेही म्हणतात.

आषाढी एकादशीला लाखो विठ्ठलभक्त पंढरपूरला जमतात. त्याला वारी असे म्हणतात. वारीला जाणारा तो वारकरी. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ इत्यादी संतांच्या पालख्यांबरोबर हे वारकरी पायी चालत पंढरपूरला जातात. वारकरी लोकांचे आराध्यदैवत पांडुरंग. ‘राम कृष्ण हरी’ हा या संप्रदायाचा मंत्र. वारकरी जातपात मानीत नाहीत. सगळे पंढरीचे वारकरी. वारकरी संप्रदायात अठरापगड समाज आहे. या दिवशी चंद्रभागेत स्नान, विठ्ठलाचे दर्शन, नगरप्रदक्षिणा, कीर्तन, भजन, दुसऱ्या दिवशी काल्याचे भजन-कीर्तन झाले की वारकरी परतीच्या प्रवासाला निघतात. कार्तिक शुद्ध एकादशीला प्रबोधिनी महाएकादशी असे म्हणतात. आषाढ शुद्ध एकादशीला झोपलेले भगवान विष्णू कार्तिक शुद्ध एकादशीला जागे होतात, म्हणून ही प्रबोधिनी एकादशी. भगवंताला उठविणे, जागविणे म्हणजे स्वतः आपण कर्तव्याचे भान ठेवून आळस टाकून जागे होणे.

कर्तव्यतत्पर होणे. वैष्णव लोक किंवा वारकरी लोक आषाढी एकादशीप्रमाणेच प्रबोधिनी एकादशीही श्रद्धेने करतात. ‘रात्री जागरणं कुर्यात् दिवा च हरिकीर्तनम्’ असा या दिवसाचा क्रम सांगितला आहे. आपल्या महाराष्ट्रातील भागवत पंथाचे लोक किंवा वारकरी या दिवशी उपवास करतात. शक्य झाल्यास पंढरीची वारी करतात. नाहीतर गावातील विठ्ठल मंदिरात तुकारामादींचे अभंग गात, नामसंकीर्तन करीत रात्री जागरण करतात. या दिवशी नेहमीची कामे शक्य तितकी कमी करून आळस, निद्रा यांचा त्याग करून भगवंताचे भजन, पूजन, नामस्मरण करावयाचे असते. या दिवशी आषाढी एकदशीप्रमाणे उपवास करून मुख्यतः श्री विष्णूची-पांडुरंगाची पूजा करावी व त्याला तुलसीपत्रे वाहावीत, असे सांगितले आहे. ‘उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्यवरान् निबोधत’ हा या महाएकादशीचा संदेश आहे.

काय शिकलात?

आज आपण आषाढी एकादशी माहिती, इतिहास मराठी | Ashadhi Ekadashi Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment