बॅडमिंटन बद्दल माहिती मराठीत – Badminton Information in Marathi

हॅलो वाचकांनो.. आज मी तुम्हाला Badminton Information in Marathi – बॅडमिंटन बद्दल माहिती मराठीत देणार आहे तर चला बघुयात.

badminton information in marathi

माहिती – Badminton Information in Marathi

बॅडमिंटन हा खेळ आपल्या भारतात लोकप्रिय खेळ आहे. आपल्या बाग किंवा घरातील गच्चीत खेळला जातो. हा खेळ प्रकाशात खेळला जातो. कमी जागा, कमी साहित्य या कारणांमुळे हा खेळ लोकप्रिय झाला आहे.

या खेळामुळे भरपूर व्यायाम होतो. हा खेळ पूर्ण परिवाराचे मनोरंजन करतो. हा खेळ खेळल्याने मनावरील ताणतणाव दूर होतात.

खेळाचे मैदान – या खेळाच्या मैदानाला ‘कोर्ट’ म्हणतात. एकेरी खेळ खेळण्यासाठी या मैदानाची लांबी ४४ फूट व रुंदी १७ फूट असते.

दुहेरी खेळ खेळण्यासाठी या खेळाच्या मैदानाची लांबी ४४ फूट व रुंदी २० फूट असते. या कोर्टच्या मधोमध एक रेषा आखलेली असते. या कोर्टच्या पाठीमागे अडीच फूट जागा असते. दोन्ही बाजूला दीड फूट जागा असते.

खेळाचे साहित्य – हा खेळ खेळण्यासाठी बॅडमिंटन, रॅकेट आणि शटल हे साहित्य लागते.

पोशाख – हाफ पँट, टी शर्ट, पायात मोजे व कापडी बूट असा बॅडमिंटन खेळणाऱ्या खेळाडूंचा पोशाख असतो.

खेळाडूंची संख्या – हा खेळ एकेरी व दुहेरी असा खेळला जातो. एकेरी खेळात दोनच खेळाडू असतात. दुहेरी खेळात चार खेळाडू असतात. त्यांचे दोन-दोन असे संघ असतात.

खेळाचे नियम – हा खेळ सुरू होण्यापूर्वी पंचामार्फत नाणे (टॉस) उडवला जातो. टॉस जिंकणाऱ्या संघाला आपला पक्ष निवडण्याचा अधिकार असतो. जोपर्यंत समोरच्या बाजूचा खेळाडू खेळण्यासाठी तयार नसतो तोपर्यंत दुसरा खेळाडूसर्व्हिस करू शकत नाही.

या खेळात ५ मिनिटांचा मध्यंतर असतो. कोणताही खेळाडू आपल्या विरोधी पक्षातल्या खेळाडूंच्या खेळात अडचण निर्माण करू शकत नाही. जर खेळात खेळाडूने नियमांचा भंग केला तर दंडात्मक शासन केले जाते.

इतर माहिती – बॅडमिंटन खेळताना वापरली जाणारी रॅकेट ही लाकडी किंवा स्टीलची असते. बाजारात वेगवेगळ्या आकाराच्या व वजनाच्या रॅकेटस् मिळू शकतात.

त्याचप्रमाणे शटल शंकूच्या किंवा फुलाच्या आकाराचे असते. कोर्टच्या मधोमध जाळी बांधण्यासाठी दोन लाकडी किंवा लोखंडी खांब उभे करतात.

भारतीय बॅडमिंटन खेळाडू – Indian Badminton Players

  • साइन नेहवाल
  • पी. व्ही. सिंधू
  • पुल्लेला गोपीचंद
  • श्रीकांथ किदाम्बी
  • बी. साई प्रणित

काय शिकलात?

आज मी तुम्हाला Badminton Information in Marathi – बॅडमिंटन बद्दल माहिती मराठीत दिली आहे. पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Hockey Information in Marathi – हॉकी बद्दल माहिती मराठीत

Leave a Comment