सरदार भगतसिंग बद्दल माहिती मराठीत – Bhagat Singh Information in Marathi

हॅलो वाचकांनो. आज तुम्हाला सरदार भगतसिंग बद्दल माहिती मराठीत – Bhagat Singh Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – रवींद्रनाथ टागोर

सरदार भगतसिंग बद्दल माहिती मराठीत - Bhagat Singh Information in Marathi
१]नाव –सरदार भगतसिंग
२]जन्म –२७ सप्टेंबर १९०७ ल्यालपूर, पंजाब, भारत
३]मृत्यू –२३ मार्च १९३१ लाहोर, पंजाब, ब्रिटिश भारत
४]आई –विद्यावती
५]वडील –सरदार किशनसिंग संधू
६]चळवळ –भारतीय स्वातंत्र्यलढा

भगतसिंग परिचय – Bhagat Singh Information in Marathi

भारतीय स्वातंत्र्ययुध्दाच्या वेदीवर ज्या हुताम्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यात सरदार भगतसिंगांचे नाव त्यांच्या अतुलनीय त्यागाने अजरामर झाले आहे. सर्व भारतीय त्यांना कधीही विसरु शकणार नाहीत.

सरदार भगतसिंगांचा जन्म १९०७ साली अश्विन शुध्द त्रयोदशीला क्रांतिकारकांच्या कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नांव किशनसिंह.

ब्रिटिशांच्या विरुध्द चाललेल्या आंदोनात त्यांचे काका अजितसिंह आणि सुवर्णसिंह या दोघांनी तुरुंगवास भोगला होता. त्यांचे वडीलही देशोध्दाराच्या कार्यात सहभागी झाले होते.

अशा देशप्रेमाने भारलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला असल्यामुळे त्यांच्या रक्तातच देशसेवेची भावना रुजली होती. चांगल्या मुहूर्तावर जन्म झाल्यामुळे लोक त्यांना भाग्यवान म्हणून लागले.

भगतसिंह आणि जगतसिंह अशी दोन्ही भावांना वडिलांनी प्राथमिक शाळेत घातले. पण त्यांचे मन तिथे रमत नसे. तर ते उघड्या मैदानात बसून पक्ष्यांप्रमाणे आपल्यालाही उंच असे आभाळात जाता येईल का असा विचार करीत.

नदीच्या खळाळत्या पाण्याकडे पाहत बसत. १९२० साली ते मॅट्रिक उत्तीर्ण झाले. लाला लजपतराय यांच्या कॉलेजात गेले.

विद्यार्थीदशेपासूनच त्यांनी देशसेवेचे स्वप्न पाहिले. त्यांनी मोठया उत्साहाने पंजाबच्या क्रांतिकारी संस्थेत भाग घेतला होता. त्यावेळी असहकार आंदोलन चालू होते. त्यात त्यांनी भाग घेतला.

देशसेवेने प्रेरित होऊन केलेले कार्य – Bhagat Singh Information in Marathi

इ.स. १९२८ मध्ये लाहोरमध्ये एक दुःखद घटना घडली. सायमन कमिशन भारतात आले होते. जागोजाग त्यांच्या विरोधात प्रदर्शन सुरु होते.

लाहोरमध्ये त्यांच्या विरोधात असलेले प्रदर्शन हे लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली चालू होते. त्यावेळी लालाजींनी पोलिसांचा लाठीचार्ज सहन केला. त्यात लालाजींचे निधन झाले.

लाला लजपतराय यांच्या मृत्यूची बातमी ही सर्व देशभर पसरल्यामुळे सर्व देश शोकसंतप्त झाला. ज्या व्यक्तीने मिरवणुकीवर लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला होता, त्याची व्यक्तीची हत्या करण्याचा निर्णय हा क्रांतिकारी दलाने घेतला.

ह्या कार्यासाठी सरदार भगतसिंग, चंद्रशेखर आजाद व राजगुरु यांची निवड केली गेली. त्यावेळी असिस्टंट पोलीस सुपरिटेंडेंट सँडर्स होते.

लालाजीवर जो आघाता झाला. त्या राष्ट्रीय अपमानाचा बदला घेण्याचे भगतसिंगांनी व त्यांचे सहकारी यांनी केले. ते मोटरसायकल कुठे लावतात. तेही भगतसिंगांनी पाहिले.

१७ डिसेंबर १९२८ ला संध्याकाळी ४.३० च्या सुमारास सँडर्सवर गोळी मारली. सँडर्स खाली पडला. त्यानंतर भगतसिंग, राजगुरु व चंद्रशेखर वेषांतर करुन बाहेर पडले. सर्व क्रांतिकारकांची एक सभा झाली आणि क्रांतिदलाचे नाव हिंदुस्तान सोशॉलिस्ट रिपब्लिक पार्टी असे ठेवण्यात आले.

देशात समाजवाद स्थापन करावा, याचा विचार करीत होता. ब्रिटिश सरकार भगतसिंगांना कसे पकडता येईल, याचा विचार करीत होते. त्यानंतर असेंब्लीत बॉम्ब फेकायचा आणि ब्रिटिशांची सत्ता उलथुन टाकायची, हा विचार भगतसिंगांच्या मनात कॉलेजपासूनच होता.

१९२९ साली बॉम्ब तयार केला गेला. केंद्रीय अॅसेम्बीत दोन बिले पास व्हायची होती. एक जनसुरक्षा बिल व दुसरे औद्योगिक विवाद बिल, पहिल्या बिलाव्दारा मंजुरांचा हरताळ , संपइ. अधिकारांपासून वंचित ठेवायचे होते.

अशा प्रसंगी विरोधी पक्षाकडील बाजुकडुन बॉम्बचा आवाज आला. त्यापाठोपाठ दुसरा सर्वत्र एकच कोलाहल माजला. बटुकेश्वर दत्त व भगतसिंगांनी गर्जना केली.

इनकलाब जिंदाबाद । ब्रिटिश साम्राज्यवादाचा नाश होवो नंतर भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात इन्कलाब जिंदाबाद ही राष्ट्रीय घोषणा ठरली. भगतसिंगांनी व त्यांच्या साथीदारांनी पिस्तुली फेकुन दिल्याया ! घाबरु नका ! आम्हाला अटक करा | पोलिसांसमोर त्यांनी आत्मसमर्पण केले.

त्यांना अटक केली गेली. त्यांच्यावर खटला भरला १० सप्टेंबर १९३० ते ७ ऑक्टोबर १९३० पर्यंत हा खटला चालला.भगतसिंगांचे सहकारी राजगुरु व सुखदेव यांना फाशीची शिक्षा तर काहींना काळे पाण्यावर पाठविले गेले.

भगतसिंग, राजगुरु व सुखदेव हे शेवटच्या दिवसापर्यंत अत्यंत प्रसन्न व उत्साही होते. २३ मार्च १९३१ ला भगतसिंगांना फाशी दिली गेली. त्यांची स्मृती भारतीयांना प्रेरणादायी ठरेल.

आपल्या बुध्दिकौशल्याच्या जोरावर त्यांनी ब्रिटिश सत्ताधारी लोकांना नाकी नऊ आणले. क्रांतिदलात काम करीत असतांना, ते उत्तम गातही असत. त्यांना फाशीची शिक्षा दिल्यावर, त्यांची सुटका व्हावी म्हणून बचाव कमिटीने लोकांन पैसे गोळा करा असे आवाहन केले.

पण भगतसिंगांनी सांगितले फाशी जाणाऱ्यांची चिंता तुम्ही करु नका तर हे पैसे ज्यांना आजन्म कारावासासची शिक्षा झाली आहे त्यांच्या कुटूंबासाठी वापरा केवढा आदर्श वस्तुपाठ भगतसिंगांनी दिला आहे.

सरदार भगतसिंगांचे ऐ वतन हे गीत – Bhagat Singh Information in Marathi

सह चुके हैं सितम हम बहुत गैर के,
अब करेंगे हर एक वार का सामना।
झुक सकेगा न अब सरफरोंशो का सर,
चाहे हो खुनी तलवार का सामना।
सर पे बाँधे कफन हम तो हसते हुए,
मौत को भी गले से लगा जायेंगे।
ऐ वतन, ऐ वतन।
हम रहें, ना रहें, इसका कुछ गम नही:
तेरी राहों को रोशन तो कर देंगे हम
खाकमें मिल गयी जिन्दगानी तो क्या ?
माँग तेरी सितारोसें भर देंगे हम ।
रंग अपने लहू का तुझे देंगे हम ,
तेरे गुलशन की रौनक बढा देंगे, हम ।
ऐ वतन, ऐ वतन।

काय शिकलात?

आज आपण सरदार भगतसिंग बद्दल माहिती मराठीत – Bhagat Singh Information in Marathi पहिली आहे, पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment