भीमा नदी बद्दल माहिती मराठीत – Bhima River Information in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला भीमा नदी बद्दल माहिती मराठीत – Bhima River Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – नद्यांबद्दल माहिती.

भीमा नदी बद्दल माहिती मराठीत - Bhima River Information in Marathi

भीमा नदी – Bhima River Information in Marathi

महाराष्ट्रातील प्रमुख आणि मोठ्या नद्यांमध्ये भीमा नदीचा समावेश होतो. उगमस्थान – पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर येथे भीमा नदीचा उगम होतो.

भीमाशंकर हे स्थान सह्याद्री पर्वतांच्या रांगेत येते. भीमाशंकर जंगलाने वेढलेले असून शंकराचे पवित्र स्थान आहे. भीमा नदीच्या उपनद्या – मुळा, मुठा, इंद्रायणी, माण, घोड, सीना आणि नीरा या भीमा नदीच्या उपनद्या आहेत.

या नद्या भीमा नदीला येऊन मिळतात. भीमा नदीचे खोरे – भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर इत्यादी जिल्हे येतात. इतर माहिती – भीमा नदी भीमाशंकर येथे उगम पावल्यावर ती पुढे सपाट प्रदेशातून वाहत येते.

ही नदी पूर्ववाहिनी आहे. दक्षिणेकडील महादेवाचे डोंगर व उत्तरेकडील बालाघाटाचे डोंगर यांच्यामधील प्रदेश हा भीमा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश आहे.

भीमा नदीला विविध उपनद्या येऊन मिळतात, त्यामुळे तिचे पात्र बरेचरुंद झाले आहे. भीमा नदीला इंद्रायणी नदी तुळापूरजवळ, तर मुळा व मुठा या नद्या रांजणगावाजवळ येऊन मिळतात.

यानंतर भीमा नदी पुणे जिल्ह्याच्या सीमेवरून वाहत जाते. पुढे नरसिंहपूर येथे नीरा नदी भीमेला येऊन मिळते. या ठिकाणाला नीरानरसिंहपूर असे म्हणतात. नीरानरसिंहपूर हे एक तीर्थक्षेत्र आहे.

पुढे भीमा नदी पंढरपूर येथे येते. पंढरपूरजवळ तिचे पात्र चंद्राच्या कोरीसारखे बनते म्हणून तिला चंद्रभागा’ असेही म्हणतात. या चंद्रभागेच्या तीरावर पंढरपूर येथे पांडुरंगाचे प्रसिद्ध मंदिर आहे.

पंढरपूर हे तीर्थक्षेत्र संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. भीमा नदीवर उजनी येथे विशाल धरण बांधले आहे. पूर्ण सोलापूर जिल्ह्याला या धरणातून पिण्याचे पाणी पुरविले जाते. त्याचप्रमाणे कालवे काढून या धरणातील पाणी शेतीसाठी तसेच बागायतीसाठी पुरविले जाते.

मोठमोठ्या उद्योधंद्यांनाही याच धरणातून पाणी पुरविले जाते. भीमेच्या काठावरचा संपूर्ण प्रदेश व खोरे सुपीक तसेच संपन्न आहे. त्यामुळे भीमा नदी एक वरदायिनी ठरली आहे.

काय शिकलात?

आज आपण भीमा नदी बद्दल माहिती मराठीत – Bhima River Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment