Blase Pascal Information in Marathi – ब्लेझ पास्कल बद्दल माहिती मराठीत

हॅलो वाचकांनो आज मी तुम्हाला Blase Pascal Information in Marathi – ब्लेझ पास्कल बद्दल माहिती मराठीत देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – लुई पाश्चर

Blase Pascal Information in Marathi - ब्लेझ पास्कल बद्दल माहिती मराठीत

माहिती – Blase Pascal Information in Marathi

ब्लेझचा जन्म १९ जून, १६२३ रोजी फ्रान्समधील क्लेरमॉण्ट येथे झाला. तो तीन वर्षांचा असताना त्याची आई वारली. त्याचे वडील स्थानिक न्यायालयात न्यायाधीश होते.

त्यांना गणित आणि शास्त्र या विषयात रस होता. त्यांच्याकडूनच ब्लेझने या विषयांतील गतीचा वारसा मिळविला असे म्हणण्यास हरकत नाही. लहानपणापासूनच तो अतिशय बुद्धिमान होता.

त्याच्या दोन बहिणीही अभ्यासात हुशार होत्या. ब्लेझच्या वडिलांनी दुसरे लग्न न करता मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले.

वयाच्या केवळ अकराव्या वर्षी त्याने कंप पावणाऱ्या वस्तूंपासून निर्माण होणारा ध्वनी’ यांवर एक प्रबंध लिहिला. त्याच्या वडिलांनी त्याला गणित व शास्त्र या विषयांचा अभ्यास करायला बंदी घातली.

कारण त्याचे लॅटिन व ग्रीक या विषयांकडे दुर्लक्ष होईल म्हणून. पण नंतरच्या वर्षी मात्र त्यांनी त्यांचा हा निर्णय बदलला. ‘त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज दोन काटकोनांइतकी असते.

या प्रमेयाची स्वतंत्र सिद्धाच ब्लेझने कोळशाच्या साहाय्याने भिंतीवर लिहून काढली होती. ते पाहून वडिलांनी त्याला युक्लिडच्या भूमितीचा अभ्यास करायला मोठ्या आनंदाने अनुमती दिली.

इतकेच नव्हे तर मोठमोठ्या गणिततज्ज्ञांच्या आणि शास्त्रज्ञांच्या परिषदांत आणि बैठकांतही उपस्थित राहण्याची संधी उपलब्ध करून दिली. वयाच्या सोळाव्या वर्षी त्याने शंक्वाकृतीच्या आडव्या छेदाच्या गुणधर्माविषयी असलेले एक प्रमेय लिहिले.

ते प्रमेय त्याच्या सिद्धतेसह त्याने त्या काळचा प्रसिद्ध गणिततज्ज्ञ पिअर मेर्सेन याच्याकडे पाठवून दिले. ते वाचून भल्या भल्या गणिततज्ज्ञांचाही विश्वास बसला नाही. की हे एका सोळा वर्षांच्या कोवळ्या युवकाचे काम आहे.

वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्याने आपल्या वडिलांचे आकडेमोडीचे काम हलके व्हावे म्हणून एक यांत्रिक गणक यंत्र (Mechanical calculator) तयार केले. ते आकाराने खूप मोठे तर होतेच, पण खूप महाग होते.

अशी सुमारे पन्नास यंत्र त्याने तयार केली. परंतु ती विकत घेणे हे सामान्य लोकांना परवडण्यासारखे नव्हते. त्यामुळे असे गणकयंत्र विकत घेणे हे श्रीमंतीचे लक्षण समजले जाऊ लागले.

वायूचा दाब, निर्वात पोकळी, प्रवाही पदार्थांचे गुणधर्म या विषयांवरील त्याचे संशोधन विशेष आहे. दाबाच्या एककाला ‘पास्कल’ हे नाव त्याच्या सन्मानार्थ दिले गेले. प्रवाही पदार्थांच्या गुणधर्माविषयीचा त्याचा सिद्धांत प्रसिद्ध आहे.

तो सुरुवातीपासूनच नाजूक प्रकृतीचा होता. १९ ऑगस्ट १६६२ रोजी वयाच्या ३९व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. ‘देवा, माझी साथ कधीही सोडू नकोस’ हे त्याचे शेवटचे उद्गार.

काय शिकलात?

आज आपण Blase Pascal Information in Marathi – ब्लेझ पास्कल बद्दल माहिती मराठीत पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment