गाय बगळा बद्दल माहिती मराठीत – Cattle Egret Information in Marathi

हॅलो वाचकांनो.. आज मी तुम्हाला गाय बगळा – Cattle Egret Information in Marathi देणार आहे. तर चला बघुयात.

गाय बगळा - Cattle Egret Information in Marathi
१.मराठी नाव :गाय बगळा, ढोर बगळा
२.इंग्रजी नाव :Cattle Egret (कॅटल इग्रेट)
३.वजन :२२० ग्राम.
४.आकार :५१ सेंमी.

माहिती – Cattle Egret Information in Marathi

डोंगरउतारावर कुठे तरी गुरं चरत असतात. त्या सहसा एकट्या नसतात. त्यांच्या पायांमधून ढांगा टाकत पांढरे शुभ्र पक्षी काही तरी टिपत फिरत असतात. हे गायबगळे.

पांढऱ्या रंगाचा आणि पिवळ्या चोचीचा गायबगळा गायरानं आणि कुरणांच्या अवतीभवती देखील दिसतो. या पक्ष्याला शेतकऱ्यांचा मित्र म्हणायचं कारण म्हणजे याच्या खाण्याच्या सवयी.

शेतांमध्ये नांगरणी चालू असताना हा नांगराच्या मागे चालत राहतो आणि जमिनीतले किडे गट्टम करतो. गाई-म्हशींच्या अंगावरच्या गोचिडी टिपून त्यांनाही मदत करतो.

रात्रीची नीज घ्यायच्या, ठरलेल्या झाडांकडे रांगा करत उडत येणारे गायबगळ्यांचे थवे तुम्ही कधी पाहिले आहेत का? नसतील, तर संध्याकाळी नदीच्या काठावर बसा आणि गायबगळ्यांची संख्या मोजण्याचा प्रयत्न करा.

या पक्ष्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो पाण्यापासून दूर माळरानं, गवती कुरणं किंवा टेकड्यांवरही आढळतो. बगळ्यांच्या इतर जाती मात्र पाण्यापासून दूर जात नाहीत.

तुम्ही जर आजूबाजूला बारकाईनं पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की साधारण जून ते सप्टेंबर या काळात देशावरच्या भागात गायबगळ्यांची संख्या एकदम कमी होते किंवा एकही गायबगळा दिसत नाही. या काळात, म्हणजेच पावसाळ्यात गायबगळे घरटी करतात.

घरटी करण्यासाठी योग्य जागेच्या शोधात ते प्रवास करतात. गायबगळ्यांची घरटी रायगड जिल्हयात, कोकणात इतरत्र आढळली आहेत. घरटी करण्याच्या काळात म्हणजेच विणीच्या हंगामात गायबगळ्यांच्या पाठींवर, डोक्यांवर आणि मानांवर पिवळसर-नारिंगी रंगांची शोभिवंत पिसं फुटतात.

ते सुंदर दिसू लागतात. गायबगळ्यांची घरटी समूहानं असतात. अनेक पक्षी एकत्र येऊन आंबा, जांभूळ अशा झाडांवर घरी करतात. अशा वसाहतींना सारंगागारं म्हणतात. अनेक पक्षी एकत्र येऊन घरटी करत असल्यामुळे भक्षकांकडून होणाऱ्या शिकारीचं प्रमाण कमी होतं. तुमच्या गावात गायबगळ्यांची वसाहत असेल तर त्याची नोंद ठेवा.

काय शिकलात?

आज मी तुम्हाला गाय बगळा – Cattle Egret Information in Marathi दिली आहे. पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

पाणकावळा बद्दल माहिती मराठीत – Little Cormorant Information in Marathi

Leave a Comment