Charles Darwin Information in Marathi – चार्ल्स रॉबर्ट डार्विन बद्दल माहिती मराठीत

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला Charles Darwin Information in Marathi – चार्ल्स रॉबर्ट डार्विन बद्दल माहिती मराठीत मराठीत देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – सण

Charles Darwin Information in Marathi - चार्ल्स रॉबर्ट डार्विन बद्दल माहिती मराठीत

माहिती – Charles Darwin Information in Marathi

सर्व प्राणी हे एकाच पूर्वजापासून विकसित झालेले आहेत. हा उत्क्रांतिवादाचा महत्त्वपूर्ण सिद्धांत ज्याने मांडला, त्या शास्त्रज्ञाचे नाव आहे चार्लस्रॉबर्ट डार्विन.

त्याचा जन्म १२ फेब्रुवारी,१८०९ मध्ये इंग्लंडमध्ये झाला. त्याचे वडील डॉक्टर होते. चार्लसनेही डॉक्टर व्हावे असे त्याच्या वडिलांना वाटे. डॉक्टर होण्यासाठी त्याने युनिर्व्हसिटी ऑफ एडिनबर्ग येथे प्रवेश घेतला; परंतु या अभ्यासात त्याचे मन रमेना.

त्याऐवजी समुद्रातील पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांवर संशोधन करणे त्याने पसंत केले. त्याने वनस्पतींच्या वर्गीकरणाचा अभ्यास केला.

युरोपमधील त्या काळातील सर्वांत मोठ्या वस्तुसंग्रहालयांपैकी एक असलेल्या युनिर्व्हसिटी म्युझिअमसाठी वनस्पतींचे नमुने गोळा करण्याच्या कामात त्याने मदत केली.

या सगळ्या भानगडीत डॉक्टरीच्या अभ्यासात झालेले त्याचे दुर्लक्ष त्याच्या वडिलांना रुचले नाही. त्यांनी चार्लसला धर्मगुरू बनविण्याचे ठरविले. त्यासाठी चार्लस्ची रवानगी केंब्रिज येथील ख्राइस्ट कॉलेजमध्ये झाली;

परंतु तेथेही त्याने अभ्यासापेक्षा घोडेस्वारी आणि नेमबाजी यांसारख्या गोष्टींमध्येच लक्ष घातले. त्याचा दूरचा भाऊ फॉक्स याच्या नादामुळे डार्विनला वेगवेगळे किडे जमवण्याचा छंद लागला.

किड्यांवरील त्याचे अभ्यासपूर्ण लेख • छापून येण्यास सुरुवात झाली. त्या लेखांमुळेच त्याची वनस्पतीशास्त्रज्ञ जॉन स्टीव्हन हेन्स्ली व इतर अनेक शास्त्रज्ञाशी ओळख झाली.

याच काळात त्याने सजीवांची नैसर्गिक रचना, परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांची क्षमता इत्यादी विषयांवरील अनेक पुस्तके काळजीपूर्वक अभ्यासली.

या सर्वांचा परिपाक म्हणून एच.एम. एस. बीगल या जहाजावर कप्तान रॉबर्ट फिट्झरॉय याचा साहाय्यक म्हणून चार्लसची निवड झाली.

दक्षिण अमेरिकेच्या किनाररेषेलगत सुमारे पाच वर्षे चाललेल्या या सफरीत चार्लस्ने अनेक नमुने गोळा केले. अनेक निरीक्षणे केली व त्यांच्या नोंदी करून ठेवल्या.

सजीवांची बाह्यरचना, आंतररचना व त्याला सापडलेल्या जीवाश्म पुराव्यांवरून डार्विनने त्याचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडला. त्याने नैसर्गिक निवडीचे तत्त्व जगासमोर मांडले.

जो परिस्थितीशी जुळवून घेऊन स्वत:ची प्रगती करतो, तोच जगण्याच्या स्पर्धेत टिकतो हे तत्त्व त्याने सप्रमाण जगासमोर सिद्ध केले आणि हे जुळवून घेणारे प्राणी जेव्हा पुनरुत्पादन करतात तेव्हा, परिस्थितीशी जुळवून घेण्याचा गुण पुढच्या पिढीतही उतरतो.

अशा प्रकारे अनुकुलनातूनच उत्क्रांती होते व आज अनेक प्रकारचे प्राणी आपल्याला दिसून येतात. पण या सर्वांचे पूर्वज एकच आहेत असे डार्विनने प्रतिपादन केले होते.

१९ एप्रिल,१८८२ रोजी डार्विनचे निधन झाले. त्याचे दफन वेस्टमिन्स्टर अँबे येथे सर आयझंक न्यूटनच्या समाधीजवळच करण्यात आले.

काय शिकलात?

आज आपण Charles Darwin Information in Marathi – चार्ल्स रॉबर्ट डार्विन बद्दल माहिती मराठीत पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment