ख्रिसमस नाताळ बद्दल माहिती मराठीत – Christmas Natal Information in Marathi

हॅलो वाचकांनो आज मी तुम्हाला Christmas Natal Information in Marathi – ख्रिसमस नाताळ बद्दल माहिती मराठीत देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – रमझान ईद

Christmas Natal Information in Marathi - क्रिसमस नाताळ बद्दल माहिती मराठीत

माहिती – Christmas Natal Information in Marathi

दिनांक २५ डिसेंबर, भारतामध्ये विविध धर्मांचे लोक वेगवेगळे सण साजरे करतात. त्याचप्रमाणे नाताळ हा सण ख्रिस्ती समाजातील लोक साजरा करतात. दरवर्षी हा सण २५ डिसेंबर या दिवशी साजरा करतात.

धार्मिक महत्त्व : ख्रिस्ती धर्माचे संस्थापक येशू ख्रिस्त यांचा जन्म २४ डिसेंबरला मध्यरात्री झाला; म्हणून नाताळ हा सण ख्रिस्ती लोक २५ डिसेंबरला साजरा करतात. ज्याप्रमाणे हिंदू लोक दिवाळी सण साजरा करतात;

त्याप्रमाणेच ख्रिस्ती लोक या सणाच्या वेळी घरांची रंगरंगोटी करतात. घरांवर चांदणीच्या आकारांचे आकाश कंदील लावतात; लहान विजेच्या दिव्यांच्या माळा सोडतात. विविध रंगांच्या फुलांची तोरणे लावतात.

या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. २४ डिसेंबर रोजी रात्री बारा वाजता सर्व लोक एकत्रपणे चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात. २५ डिसेंबरला ख्रिस्ती समाजातील लोक इतर धर्मांतील लोकांना तसेच आपल्या नातेवाईकांना घरी बोलावतात व त्यांना फराळाचे पदार्थ,

मिष्टान्न भोजन देतात. सामाजिक महत्त्व बरीचशी मंडळी हा सण साजरा करण्याकरिता आपल्या नातेवाईकांकडे जातात व त्या ठिकाणीच हा सण साजरा करतात. जगामध्येसुद्धा हा सण विविध प्रकारे साजरा केला जातो.

ख्रिसमस सर्व जगभर साजरा केला जातो. या दिवशी रात्री सॅण्टाक्लॉज येऊन लहान-मोठ्यांसाठी भेटवस्तू ठेवून जातो. अशी समजूत आहे. पण ती एक आख्यायिका आहे. नाताळ नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापर्यंत साजरा केला जातो.

इतर महत्त्व नाताळनिमित्त घरातील लहान मुले, मोठी माणसे, गृहिणी नवीन वस्त्रे परिधान करतात. २४ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता फटाके उडवून येशू ख्रिस्तांचा जन्मदिन आनंदात साजरा करतात.

भारतामध्ये गोवा या राज्यात मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला जातो. या सणामध्ये विविध जातिजमातींतील लोक सहभागी होऊन एकमेकांस शुभेच्छा देतात. आनंदाने हा सण साजरा करतात.

काय शिकलात?

आज आपण Christmas Natal Information in Marathi – ख्रिसमस नाताळ बद्दल माहिती मराठीत पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment