घार पक्ष्याबद्दल माहिती मराठीत – Common Pariah Kite Bird Information in Marathi

हॅलो वाचकांनो.. आज मी तुम्हाला घार पक्ष्याबद्दल माहिती मराठीत – Common Pariah Kite Bird Information in Marathi देणार आहे. तर चला बघुयात.

घार - Common Pariah Kite Bird Information in Marathi
१.मराठी नाव :नागरी घार, घोण
२.इंग्रजी नाव :Common Pariah Kite (कॉमन पराय काईट)
३.आकार :६० सें. मी.
४.वजन :७३० ग्राम.

माहिती – Common Pariah Kite Bird Information in Marathi

तपकिरी रंगाची, अंगावर भरपूर पिसं असणारी, अणकुचीदार चोच, आणि तीक्ष्ण डोळ्यांची घार ही शिकारी पक्ष्यांमध्ये गणली जाते.

शोधावीसुद्धा लागणार नाही अशी ही कावळ्याची जोडीदारीण मच्छीबाजार, खाटीकखाना, कचरा डेपो, बाजार या ठिकाणी दिसते. खाद्य म्हणाल तर बेडूक, उंदीर, मासे, सरडे, मटण, काहीही चालतं. पण विशेष आवडीचा प्रकार म्हणजे कोंबडीची किंवा कोणत्याही पक्ष्यांची पिल्लं.

घारीचा तिच्या पंखांवरचा ताबा इतका चांगला असतो की शहरातल्या एखाद्या गजबजलेल्या रस्त्यावर पडलेला उंदीरही ती विजेच्या तारा किंवा माणसांची गर्दी चुकवतं पाहता पाहता उचलून नेते. आकाशात उंच घिरट्या घालताना घारीच्या शेपटीतील खाच स्पष्ट दिसते.

हिचीच एक सखी म्हणजे Blackeared किंवा Large Indian Kite (हिवाळी घार). पण तिच्या शेपटीला मात्र खाच नसते. या घारीच्या पंखांखाली पांढऱ्या रंगांची झाकपिसं स्पष्ट दिसतात. हिवाळ्यात दोन्ही जाती एकत्र दिसतात. घारीचा विणीचा हंगाम साधारण ऑक्टोबर ते मार्च पर्यंत असतो.

काड्या काटक्यांचा ढिगारा म्हणजे घरटं, घरटं करताना वड, पिंपळ, काटेसावर, नारळ अशी कुठलीही झाडं चालतात पण उंची मात्र महत्त्वाची असते.

सागरी घार (Brahminy Kite) ही घार समुद्रकिनारी तर दिसतेच, परंतु ती अधूनमधून समुद्र कनाऱ्यापासून आत स्थानिक प्रवास करून येते आणि तळ्यांवर, नद्यांवर मासेमारी करत असते. तर कापशी (Blackwinged Kite) गवताळ प्रदेश आणि विरळ पानझडीच्या जंगलात दिसते.

काय शिकलात?

आज आपण घार – Common Pariah Kite Bird Information in Marathi माहिती घेतली आहे. पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

शिक्रा पक्ष्याबद्दल माहिती मराठीत – Shikra Bird Information in Marathi

रंगीत करकोचा बद्दल माहिती मराठीत – Painted Stork Information in Marathi

Leave a Comment