दानाचं मोल

‘हस्तस्य भूषणम् दान।’ हे संस्कृतवचन तर तुम्हाला ठाऊक आहेच ना? त्याचा अर्थ असा की, हाताने उत्तम दान देणे, हेच हाताचे खरे भूषण आहे. दान हे एक उत्तम कर्म असून, दान करणे, हे एक पुण्यकर्म आहे. दानाला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अन्नदान हे सर्व दानांमधले श्रेष्ठ असे दान आहे. दानाचे महत्त्व सांगणारी, ही एक त्रेतायुगामधली गोष्ट. त्रेतायुग म्हणजे भगवान महाविष्णूंच्या श्रीराम अवताराचे युग. प्रभू श्रीराम हे खऱ्या अर्थाने अयोध्यानगरीत रामराज्य करीत असताना एक दिवस अगस्तीऋषी दरबारात आले.

प्रभू श्रीरामांनी लगेच पुढे होऊन त्यांचे प्रेमळ स्वागत केले. ऋषींना आसनावर बसवून, त्यांचे पादप्रक्षालन केले. विनम्र भावे त्यांना वंदन करून त्याचा मंगल आशीवाद घेतले. त्या वेळी श्रीरामांच्या त्या आदरातिथ्यावर प्रसन्न झालेले अगस्तीऋषी श्रीरामाला म्हणाले, “श्रीरामा, मी तुझ्यावर अति प्रसन्न झालो आहे. आज मी तुला एक खास आभूषण देण्यासाठी आलो आहे. श्रीरामा, तू सर्व संपन्न आहेस. तुझ्याकडे काय नाही असे असतानाही मला तुला हे आभूषण द्यावे, असे वाटते आहे; कारण जेव्हा आपल्या मालकीची एखादी वस्तू निरपेक्षपणाने जेव्हा दुसऱ्याला दान देता; तेव्हाच दानाचे पुण्य पदरी पडते.

तेव्हा श्रीरामा, हे जे आभूषण मला मिळाले आहे, ते तुला दान करून मला त्या दानाचे पुण्य गाठी जोडू दे.” अगस्तीमुनी असं म्हणताच श्रीरामांनी ते आभूषण स्वीकारले अन् त्यांना दानाचा आनंद अन् पुण्याचे मानकरी बनविले. वनाश्रमात राहणाऱ्या एका ऋषीकडे हे दिव्य-मौलिक आभषण कसे आले. हा प्रश्न मात्र रामांच्या मनात जागत होताच. तेव्हा श्रीरामांच्या मनोविचारांचा वेध घेत अगस्ती मुनी म्हणाले, “प्रभ श्रीरामा, ह पण मला राजा श्वेत ह्याने मोठ्या कृतज्ञतापूर्वक भेट म्हणन दिले होते.”

तेव्हा तो सर्व कथा भाग श्रीरामांना निवेदन करताना अगस्तीऋषी म्हणाले, “श्रीरामा, एकदा माँ मारवा आश्रमाजवळच्या एका फिरत असताना मला एका वृक्षाखाली एक प्रेत पडलेले दिसले. ‘अरे, ह्या घोर वनात हे प्रेत कुणाचे?’ असा मी विचार करात असतानाच आकाशमागाने एक दिव्य मनुष्य खाली आला. तो काही तरी शोधत होता. त्याच्या नजरेला ते झाडाखालचे प्रेत दिसले. आणि कित्येक दिवसांचा उपाशी असल्याप्रमाणे तो दिव्यपुरुष धावतच पुढे आला आणि त्या प्रेताजवळ बसून त्याचे मांस खाऊ लागला. मला मोठे आश्चर्य वाटले.

एवढा दिव्य पुरुष अन् त्याने असे मांस का खावे? ‘हे महापुरुषा! तू कुणीतरी स्वर्गस्थ दिव्य आत्मा दिसतोस; तरी पण तुझ्यावर ही अशी मांस खाऊन भूक भागवण्याची वेळ का अन् कशामुळे आली?’ मी त्याला विचारलं. तेव्हा तो सांगू लागला. ‘ऋषीवर, मी विदर्भ देशीचा राजा वसुदेव ह्याचा पुत्र श्वेत. माझ्या धाकट्या भावाचे नाव सुरथ. मी वडिलांचे मागे विदर्भदेशाचे राज्य सांभाळत होतो. अनेक वर्षे राज्यपद उपभोगल्यानंतर माझ्या मनात वानप्रस्थाश्रमात जाण्याचे विचार येऊ लागले.

पुढे तोच विचार मनी पक्का करून मी धाकट्या भावाकडे सर्व राज्यकारभार सोपवून वनांत गेलो. तेथे कठोर तपसाधना केल्यावर परमेश्वरकृपेने मला ब्रह्मलोकाची प्राप्ती झाली. मात्र, मला त्या ब्रह्मलोकात अन्न-उदक काहीच मिळेना. ‘मी सतत अन्न-पाण्यावाचन तळमळत असताना मला जर ह्या ब्रह्मलाकात स्थान मिळाले, तर मला इथं अबोट माग का नाही?’ असे विचारले. तेव्हा मला ब्रह्मदेव म्हणाले, “हे श्वेत राजा! तू ह्या ब्रह्मलोकात येऊनही साध्या अन्नोदकासाठी तळमळतो आहेस.

त्याला कारण म्हणजे तुझ्या पदरी नसणार दानाचे पुण्य! हे राजा, तू भूलोकी असताना, एक राजा असूनसुद्धा तू कधी कुणा भुकेल्या माणसाला अन्न दिले नाहीस. कुणा तहानलेल्या जीवाला तू पाणी दिले नाहीस. तुझ्याकडे अपार धनसंपत्ती असताना, अन्नधान्य असतानासुद्धा तू कुणा भिकाऱ्याला साधी भाजीभाकरीही खाऊ घातली नाहीस; त्यामुळेच तुला इथे उपासमार सहन करावी लागत आहे. “तुझी भूक भागवण्याचा एकच उपाय आहे. तो म्हणजे, तू पृथ्वीवर जा. तिथे वनात एका वृक्षाखाली तुझे मृत शरीर पडलेले आहे.

तू तिथं जा अन् त्या शरीराचे मांस खाऊन ये.” “श्रीरामा, मला श्वेतराजाची ती कहाणी ऐकून दया आली. मी त्याला त्या नीच आहारापासून मुक्त केले. माझे मंत्रोदक अंगावर पडताच त्याचा उद्धार झाला, तेव्हा त्या राजाने मला दिलेले ते दिव्य आभूषण हेच. प्रभू, ह्याचा स्वीकार करा.” श्रीरामांनी त्या आभूषणाच्या दानाचा स्वीकार केला.

तात्पर्य : प्रत्येकानेच दानधर्म करून दानाचे दिव्य पुण्य गाठीला अवश्य जोडून घ्यावे. दानासारखे दुसरे थोर पुण्य नाही.

Leave a Comment