दसरा (विजयादशमी) माहिती, इतिहास मराठी । Dasara Information in Marathi

हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला दसरा (विजयादशमी) माहिती, इतिहास मराठी । Dasara Information in Marathi सांगणार आहे तर चला बघुयात.

आणखी वाचा – बुद्ध पौर्णिमा

दसरा (विजयादशमी) मराठी । Dasara Information in Marathi

ज्येष्ठ शुद्ध दशमी या दिवशी हस्त नक्षत्र असताना गंगा नदीचा पृथ्वीवर जन्म झाला. इक्ष्वाकुवंशातील प्रसिद्ध राजा भगीरथ याने आपल्या पितरांच्या उद्धारासाठी गंगेला पृथ्वीवर आणले. भगवान विष्णूच्या चरणांपासून निर्माण झालेली गंगा ज्येष्ठ शुद्ध दशमीला पृथ्वीवर अवतीर्ण झाली. म्हणून या दिवशी गंगास्नानाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गंगा नदीत स्नान केल्याने असत्य भाषण, कठोर भाषण, चहाडी, वृथा वल्गना, चौर्यकर्म, हिंसा, अनीतिकारक विषयभोग, परापहार, दुराग्रह व अनिष्ट चिंतन या दहा पातकांचा नाश होतो. म्हणून गंगेला ‘दशहरा’ (दहा पापे हरण करणारी) असे म्हणतात. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते दशमी असा दहा दिवसांचा दशहरा-गंगोत्सव गंगानदीच्या परिसरात गंगेच्या काठावर मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.

दहा दिवस गंगास्नान, गंगापूजन, गंगामाहात्म्यावर प्रवचन, कीर्तन इत्यादी कार्यक्रम केले जातात. गंगा म्हणजे भगवान विष्णूचे द्रवरूप शरीर. म्हणून गंगाजल अत्यंत पवित्र. गंगेचा जन्म मोठा अद्भुत. ही गंगा पृथ्वीवर केव्हा आली, कशी आली, तिला पृथ्वीवर कोणी आणले, कशासाठी आणले माहीत आहे का? फार वर्षांपूर्वीची गोष्ट. त्या वेळी अयोध्येत इक्ष्वाकू वंशातील सगर नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला साठ हजार पुत्र होते. एकदा या सगर राजाने अश्वमेध यज्ञ सुरू केला. यज्ञाचा घोडा अचानकपणे कुठे दिसेनासा झाला. यज्ञात मोठेच विघ्न आले.

घोडा मिळाल्याशिवाय यज्ञ पूर्ण होणार नव्हता. म्हणून सगर राजाने घोड्याच्या शोधासाठी आपले पुत्र पाठविले. सगरपुत्रांनी पृथ्वीवर सगळीकडे शोधाशोध केली पण घोडा सापडला नाही. मग सगरपुत्र घोड्याचा शोध करीत करीत पाताळलोकात गेले. तेथे कपिलमुनींचा आश्रम होता. त्याच आश्रमात त्यांचा तो यज्ञीय घोडा चरत होता. सगरपुत्रांना आनंद तर झालाच; पण त्यांना कपिलमुनींचा अतिशय राग आला. या कपिलांनीच आपला घोडा चोरून येथे आणला असावा, असा त्यांचा समज झाला. रागावलेल्या सगरपुत्रांनी ध्यानस्थ बसलेल्या कपिलांच्या शरीरावर माती, खडे टाकून . त्यांचा अपमान केला. तेव्हा क्रुद्ध झालेल्या कपिलांनी डोळे उघडले. त्यांनी एकाच हुंकारात सगराच्या साठ हजार पुत्रांना जाळून त्यांचे भस्म करून टाकले.

बरेच दिवस झाले तरी घोडा शोधण्यासाठी गेलेले सगरपुत्र परत आले नाहीत म्हणून त्यांचा सावत्र भाऊ अंशुमान बाहेर पडला. तोही फिरत फिरत पाताळातच कपिलांच्या आश्रमात आला. आपल्या भावांची काय अवस्था झाली ते त्याला समजले. आपले भाऊ जळून भस्म झाले आहेत हे पाहून तो अतिशय शोक करू लागला. तेव्हा कपिलमुनी त्याला म्हणाले, स्वर्गातील गंगा जर पृथ्वीवर आली व तिचे पाणी जर तुझ्या भावांच्या राखेवरून गेले तरच यांना मुक्ती मिळेल. अंशुमानाने स्वर्गातील गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी कठोर तपश्चर्या केली; पण त्याला त्यात यश आले नाही. त्यानंतर अंशुमानाचा पुत्र दिलीप यानेही गंगेसाठी तपश्चर्या केली. पण त्यालाही यश आले नाही. त्यानंतर दिलीपचा पुत्र भगीरथ याने आपल्या पितरांच्या उद्धारासाठी हिमालयात एका पायावर उभे राहून घोर तपश्चर्या केली.

तेव्हा प्रसन्न झालेले ब्रह्मदेव भगीरथाला म्हणाले, स्वर्गातली गंगा पृथ्वीवर येईल, पण तिचा प्रचंड ओघ पृथ्वी सहन करू शकणार नाही. यासाठी तू भगवान शंकरांना प्रसन्न करून घे. भगीरथाने कठोर तपश्चर्या करून शंकरांना प्रसन्न केले. त्यांना सगळी हकीकत सांगितली. शंकरांनी त्याची इच्छा मान्य केली. मग भगीरथाने गंगेला पृथ्वीवर येण्यासाठी अत्यंत भक्तिभावाने प्रार्थना केली. गंगा मोठ्या गर्वाने प्रचंड खळखळाट करीत पृथ्वीवर येऊ लागली. तेव्हा तिचे गर्वहरण करण्यासाठी शंकरांनी तिला आपल्या डोक्यावर धारण केले व आपल्या जटांत गुरफटून टाकले. मग भगीरथाच्या विनंतीनुसार तिला आपल्या जटांतून मुक्त केले.

तेथून सात प्रवाह सुरू झाले. त्यापैकी एक प्रवाह भगीरथाच्या मागे जाऊ लागला. वाटेत जढू राजाचा यज्ञ सरू होता. गंगेने तो आपल्या प्रवाहाने उध्वस्त केला. तेव्हा जढूने गंगेला पिऊन टाकले. शेवटी भगीरथाच्या विनंतीवरून तिला आपल्या कानातून सोडून दिले. म्हणून गंगेला जह्नवी म्हणतात गंगा भगीरथाच्या मागोमाग पाताळात गेली. ज्या ठिकाणी सगरपुत्रांची राख पडली होती. त्यावरून गंगेचा प्रवाह गेला व भगीरथाच्या पितरांना मुक्ती मिळाली. भगीरथाच्या तपश्चर्येने गंगा स्वर्गातन पथ्वीवर आली म्हणन तिला भागीरथी असे म्हणतात. ही घटना ज्येष्ठ शुद्ध दशमी या दिवशी घडली. गंगा पातकांचा नाश करते म्हणून तिला दशहरा असे म्हणतात. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात दहा या संख्येला फार महत्त्व आहे. या दिवशी कोणत्याही दहा वस्तूंचे दान केले जाते. या दहा दिवसांत स्नान, दान, जप, तप केले असता त्याचे फार मोठे पुण्य मिळते, अशी लोकांची श्रद्धा आहे.

काय शिकलात?

आज आपण दसरा (विजयादशमी) माहिती, इतिहास मराठी । Dasara Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment