डॉ. बाबासाहेब आंबेडकर – Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi

हॅलो वाचकांनो.. आज मी तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर – Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi मध्ये देणार आहे तर चला बघुयात.

Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi
१]पूर्ण नाव –डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (बाबासाहेब आंबेडकर)
२]जन्म –१४ एप्रिल, इ.स. १८९१ महू, मध्य प्रांत, भारत
३]मृत्यू –६ डिसेंबर, १९५६ (वय ६५) नवी दिल्ली, दिल्ली, भारत
४]आई –भीमाबाई सकपाळ
५]वडील –रामजी सकपाळ
६]निवास –राजगृह, मुंबई

माहिती – Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल, इ.स. १८९१ महू या गावी, मध्यप्रदेश येथे झाला. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भारताच्या सामाजिक व राजकीय जीवनावर आपल्या विचारांचा व कर्तृत्वाचा ठसाज्यांनी उमटविला, असे त्ववचिंतक व समाजसुधारक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्याबरोबर महात्मा गांधी यांची गणना होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांच्या चळवळीचे प्रमुख नेते होते. सामाजिक जीवनात शास्त्रशुध्द पध्दतीने व सखोल अभ्यास करुन त्यावर ते भाष्य करीत. हिंदु समाजात आमूलाग्र सुधारणा घडून आणण्यासाठी ते अत्यंत तळमळीने कार्य करीत.

शिक्षण – Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi

बालपणापासून त्यांना पुस्तके वाचण्याचा फार नाद असे. विद्यार्थीदशेत ते खूप वेळ अभ्यास करीत असत. १९१३ साली बी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर आंबेडकरांना परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची संधी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने मिळाली.

अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश मिळवून त्यांनी अर्थशास्त्र या विषयात एम.ए. व पी.एच.डी. या पदव्या संपादन केल्या. त्यांच्यावर जॉन डयुजी यांचा प्रभाव होता.

अमेरिकेतून ते भारतात परत आले. पुन्हा तीन वर्षांनी इंग्लंडमध्ये जाऊन अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व कायदा यांचा अभ्यास करुन ते बॅरिस्टर झाले व इंग्लंडमधून भारतात परत आले. १९२३ ते १९३७ या काळात ते सिडनहॅम कॉलेजात आधी प्राध्यापक व नंतर प्राचार्य होते.

राजकीय कारकीर्द – Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi

पुढे ते १९३६ नंतर त्यांनी समाजकारण व राजकारण या क्षेत्रांत कार्य सुरु केले. इ.स. १९२६ मध्ये मुंबई सरकाराने गर्व्हनरने त्यांची कायदे मंडळावर नेमणूक केली. यानंतर त्यांना १९३० मध्ये गोलमेज परिषदेचे निमंत्रण मिळाले.

या निमंत्रणास मान देऊन ते पहिल्या गोलमेज परिषदेस हजर राहिले आणि गाढा व्यासंग इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व आणि वकिली पध्दतीने आपली बाजू मांडण्याचे कौशल्य यामुळे त्यांनी आपली छाप पाडली.

परत आल्यावर १९३५ मध्ये त्यांनी धर्मातराची कल्पना येवला वेळोवेळी निर्माण होणाऱ्या प्रश्नांच्या येथे मांडली. पुन्हा १९३६ मध्ये एक परिषद भरवली. आणि दुसऱ्या कोणत्या धर्मात जाणे आवश्यक आहे. असे आपले मत माडले . पुढे दुसरे महायुध्द सुरु झाले तेव्हा त्यांनी इंग्रजांना पाठिंबा दिला.

१९३१ मध्ये गांधी – आयर्विन करार झाला. त्यापूर्वी भारतात जेव्हा भारतीय नागरिकांचे जेव्हा प्रतिनिधीत्व येईल तेव्हा कोणत्या धर्माच्या / जातीच्या समाजास किती प्रातिनिधीत्व मिळेल याबद्दल अत्यंत प्रसिध्द असा पुणे करार झाला.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नवे सरकार कशा पध्दतीने राज्य चालवेल , हे ठरविण्यासाठी घटना- समिती नेमण्यात आली. या घटना समितीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रमुख होते.

त्यांनी घटना समितीचे इतर सभासद, पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि राजगोपालचारी यांच्याशी वेळोवेळी चर्चा करुन एक आदर्श घटना तयार केली. पं

डित नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. पण पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्यांना पराभव पत्कारावा लागला. व ते मंत्रिमंडळातून बाहेर पडले याच काळात त्यांनी निरनिराळ्या धर्माचा तौलानिक अभ्यास केला.

इ.स. १९५० मध्ये त्यांनी भारतीय बौध्द जन संघ स्थापन केला. त्योच रुपांतर १९५४ मध्ये भारतीय बौध्द महासभेत केले. तसेच गौतम बुध्द व त्याचा धम्म हा ग्रंथ लिहिला.

प्रज्ञा, करुणा व समता या तत्वांचे आपण पालन केले पाहिजे. असे त्यांचे प्रतिपादन होते. १४ ऑक्टोबर १९५६ मध्ये दसरा या दिवशी आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह नागपुर येथे बौध्द धर्माची दीक्षा घेतली.

नागपुरमधील हे ठिकाण दीक्षाभूमी म्हणून प्रसिध्द आहे. या घटनेनंतर ते थोड्याच दिवसांत आजारी पडले, आणि ६ डिसेंबर, १९५६ (वय ६५) नवी दिल्ली, दिल्ली येथे त्यांचे दुःखद निधन झाले.

हा दिवस महापरिनिर्वाणदिन म्हणून प्रसिध्द आहे. त्यांच्या अंत्यसंस्कार स्थळास चैत्यभूमि म्हणतात. कारण तेथे त्यांची स्मृती म्हणून चैत्य बांधलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या कार्याबद्दल मरणोत्तर भारतरत्न ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला आहे.

प्रसिध्द ग्रंथ – Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi

भारतीय राज्यघटना, गौतम बुध्द व त्याचा धम्म, माझी आत्मकथा, डॉ. आंबेडकरांचे गाजलेले लेख व भाषणे , शुद्र कोण होते, Thoughts on Pakistan Dr. B.R. Ambedkar • His speeches in Constituent Assembly.

डॉ. आंबेडकर हे एक थोर विद्याप्रेमी होते. त्यांनी आयुष्यभर ज्ञानाची उपासना केली. ज्ञानाने मनुष्य गर्विष्ठ बनता कामानये, तर तो विनयशील बनला पाहिजे आणि माणसाने शीलही पवित्र ठेवले पाहिजे.

बाबासाहेब आंबेडकर हे भगवान बुध्द, संत कबीर आणि ज्योतिबा फुले या तिघांना आपले गुरु मानीत. त्यांनी आपल्या विचारात सामाजिक समतेचा आग्रह धरला. आपले विचार समाजात मान्य व्हावेत म्हणून डॉ. बाबासाहेबांनी कधीही हिंसाचाराचा , दडपशाहीचा मार्ग स्वीकारला नाही, हा त्यांचा विशेष होता.

बाबासाहेबांचे तथ्य जे तुम्हाला माहित असले पाहिजे – Facts About Dr. Babasaheb Ambedkar in Marathi

 • डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या पालकांचे १४ वे व शेवटचे मूल होते.
 • २००४ मध्ये कोलंबिया विद्यापीठाला २५० वर्ष पूर्ण झाले या निमित्ताने त्यांनी आजपर्यंत शिकलेल्या सर्वात बुद्धिमान अशा १०० सर्वश्रेष्ठ विद्यार्थ्यांची ‘द कोलंबियन्स अहेड ऑफ देअर टाइम’ नावाने एक यादी प्रसिद्ध केली आहे ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्थान पहिल्या क्रमांकावर आहे.
 • डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे आडनाव अंबवडेकर होते. परंतु त्यांचे शिक्षक महादेव आंबेडकर यांनी त्यांना शालेय नोंदींमध्ये आंबेडकर आडनाव दिले.
 • परदेशातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होते.
 • डॉ. आंबेडकर हे एकमेव भारतीय आहेत ज्यांचा पुतळा लंडन संग्रहालयात कार्ल मार्क्सला जोडलेला आहे.
 • भारतीय तिरंगामध्ये “अशोक चक्र” ला स्थान देण्याचे श्रेय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनाही जाते.
 • बाबासाहेबांच्या वैयक्तिक ग्रंथालय ‘राजगृह’ मध्ये ५०,००० हून अधिक पुस्तके आहेत आणि ती जगातील सर्वात मोठी खासगी लायब्ररी होती.
 • डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे ६४ विषयात मास्टर होते. त्यांना फ्रेंच, जर्मन, हिंदी, संस्कृत, पाली, इंग्रजी, मराठी, गुजराती आणि पर्शियन अशा ९ भाषांचे ज्ञान होते. या शिवाय २१ वर्षे जगातील सर्व धर्मांचा अभ्यास केला.
 • लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेबांनी केवळ २ वर्ष ३ महिन्यांत ८ वर्षेचा अभ्यास पूर्ण केले. यासाठी त्यांनी दिवसा २१ तास अभ्यास केला.
 • जगभरात, नेत्याच्या नावावर लिहिलेली सर्वाधिक गाणी आणि पुस्तके म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आहे.
 • भगवान बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले हे तीन महान पुरुष यांना ते आपले गुरु मनात असे.
 • बाबासाहेबांचा पहिला पुतळा हा १९५० मध्ये बांधला गेला आणि कोल्हापूर शहरात हा पुतळा स्थापन करण्यात आला.

काय शिकलात?

आज आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर – Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi मध्ये पहिली आहे. पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

आणखी वाचा – छत्रपती शिवाजी महाराज

Leave a Comment