गरुड बद्दल माहिती मराठीत – Eagle Information in Marathi

हॅलो वाचकांनो आज मी तुम्हाला गरुड बद्दल माहिती मराठीत – Eagle Information in Marathi देणार आहे. तर चला बघुयात.

गरुड बद्दल माहिती मराठीत - Eagle Information in Marathi
१.मराठी नाव :तुरेवाला सर्पगरूड, मोरघार, मुग्यला
२.इंग्रजी नाव :Crested Serpent Eagle (क्रेस्टेड सपँट ईगल)
३.आकार :७४ सेंमी.
४.वजन :४२०-१८०० ग्राम.

माहिती – Eagle Information in Marathi

संस्कृतात या गरूडाला पन्नगाद असं नाव आहे. पन्नगाद याचा अर्थ सापांना ठार करणारा. हा गरूड बेडूक, पाली, सरडे, उंदीर, मोर रानकोंबड्यांसारखे पक्षी यांची शिकार करण्याबरोबरच सापही पकडतो त्याच्या खाद्यात विषारी सापांचाही समावेश होतो.

हा जंगलात राहणारा पक्षी आहे. जंगलातल्या मोकळ्या जागांच्या कडेला असलेल्या झाडांवर बसून तो सरपटणाऱ्या प्राण्यांच्या हालचालींची वाट बघत असतो. त्याचं लक्ष जमिनीवर काही हलतंय का याकडे असतं.

तसूभर हालचाल दिसली तरी तो फांदीवरून झेपावतो आणि सुरीसारख्या धारदार नख्यांनी सज्ज अशा पंज्यांमध्ये भक्ष्याला जायबंदी कस्तो यापुढे त्याला फारसं काही करावं लागत नाही.

अणकुचीदार नख्या आणि बाकदार चोच या त्याच्याकडच्या चाकूसुया! पंज्यांमध्ये घट्ट दाबून धरलेल्या भक्ष्याचे तुकडे तुकडे करून गिळले जातात.

गडद तपकिरी रंगाचा हा गरूड संपूर्ण महाराष्ट्रात दिसतो. त्याची वीण डिसेंबर ते मार्च दरम्यान होते. जंगलातल्या एखाद्या उंच झाडावर काड्या-काटक्या आणि मध्यम आकाराच्या फांद्या गोळा करून घरटं केलं जातं. लांबून पाहिलं असता घरटं एखाद्या ढिगाऱ्यासारखं दिसतं.

गरूडाची मादी या घरट्यात एकच अंडं घालते. घरटं असलेलं झाड पडलं नाही किंवा तोडलं गेलं नाही तर वर्षानुवर्ष एकच घरटं वापरलं जातं. दरवर्षी घरट्यात नवीन काड्या-काटक्यांची भर घातली जाते. हा मोठा रुबाबदार पक्षी आहे.

विशेषतः त्याच्या डोक्यावरचा काळा-पांढरा तुरा मोठा झोकदार दिसतो. त्याची ऐट वाढवतो. उंच आकाशात उडणारा सर्पगरूड त्याच्या पंखांमध्ये असलेल्या पांढया पट्ट्यांवरून ओळखू येतो. उंच आकाशात घिरट्या घालत तो स्वतःच्या राज्याची देखरेख करतो आणि अधूनमधून आरोळी देतो ‘केक केक कीऽ कीऽ!’

काय शिकलात?

आज मी तुम्हाला गरुड बद्दल माहिती मराठीत – Eagle Information in Marathi दिली आहे. पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

मोराबद्दल माहिती मराठीत – Peacock Information in Marathi

कबुतर बद्दल माहिती मराठीत – Pigeon Information in Marathi

पोपटाबद्दल माहिती मराठीत – Parrot Information in Marathi

Leave a Comment