गणेश चतुर्थी माहिती, इतिहास मराठी । Ganesh Chaturthi Information in Marathi

हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला गणेश चतुर्थी माहिती, इतिहास मराठी । Ganesh Chaturthi Information in Marathi सांगणार आहे तर चला बघुयात.

गणेश चतुर्थी माहिती, इतिहास मराठी । Ganesh Chaturthi Information in Marathi

आणखी वाचा – गुरुपौर्णिमा

गणेश चतुर्थी मराठी । Ganesh Chaturthi Information in Marathi

भाद्रपद महिना आला की आपणास सुखकर्ता दुःखहर्ता अशा गणपतीच्या आगमनाची ओढ लागते. घरोघरी गणपतीच्या उत्सवाची तयारी जोरात सुरू होते. भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा दिवस गणेशचतुर्थी म्हणून प्रसिद्ध आहे. हिला वरदचतुर्थी असेही म्हणतात. ही चतुर्थी रविवारी किंवा मंगळवारी आल्यास ती विशेष समजली जाते. या देवतेचे नाव वरदमूर्ती श्री सिद्धिविनायक असे आहे. भारताच्या बहुतेक सर्व प्रांतांत हा गणेशचतुर्थीचा सण लहानमोठ्या प्रमाणात परंतु अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना आवडणारा असा हा सण आहे.

कोकणात तर हा एक अत्यंत महत्त्वाचा सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. या दिवशी श्री गजाननाची मातीची रंगीत मूर्ती आणून तिची मोठ्या थाटात पूजा केली जाते. त्याअगोदर घर सारवून, रंगवून गणेशस्थापनेची जागा अत्यंत सुशोभित केली जाते. या दिवशी सकाळी मातीची रंगीत गणेशमूर्ती बाजारातून वाजतगाजत आणतात. ‘मोरया! मोरया! गणपतिबाप्पा मोरया।’ असा जयघोष केला जातो. घराच्या दारावर घरातील सवासिनी स्त्री गणेशाचे स्वागत करते. मग सुशोभित केलेल्या ठिकाणी चौरंगावर, पाटावर किंवा मखरात ती गणेशमूर्ती ठेवतात.

पुरोहितां कडून गणेशाची प्राणप्रतिष्ठा करून तिची षोडशोपचारांनी पूजा करतात. गणपती म्हणजे गणांचा पती. गणांचा नायक. गणपती हा एकवीस म्हणजे नायक होता. म्हणून गणेश-उपासनेत एकवीस या संख्येला विशेष महत्त्व आहे. गणेश हा मादकप्रिय आहे. म्हणून त्याला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवतात. एकवीस दुर्वा वाहतात. याशिवाय शमीपत्रे, तांबडी फुले, सिंदूर, अष्टगंध या वस्तू गणेशाला प्रिय आहेत. म्हणून गणेशचतुर्थीच्या दिवशी पूजासाहित्यात या वस्तू असाव्याच लागतात.

गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर षोडशोपचारांनी पूजा केली जाते. त्यावेळचा ध्यानमंत्र असा आहे – एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजम् । पाशांकुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकम् ।। हा उत्सव दीड दिवसाचा असतो. तथापि काही लोक पाच, सात, नऊ किंवा दहा दिवस हा उत्सव करतात. गौरी आणि गणपती यांचे एकत्र विसर्जन करण्याची चाल काही ठिकाणी आहे. या दिवसांत सकाळ-संध्याकाळ आरती, सकाळी अथर्वशीर्षाची आवर्तने, रात्री मंत्रजागर, भजन, दिवसा गणेशपुराण किंवा गणेशकथांचे वाचन इत्यादी कार्यक्रम घरोघरी चालू असतात.

या काळात घरातले वातावरण अतिशय प्रसन्न, पवित्र, आनंददायक असते. विशेषतः खेड्यापाड्यातील अगदी गरिबांच्या घरातही आनंद ओसंडून वाहत असतो. ज्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन करावयाचे असते त्या दिवशी प्रथम गणेशाची उत्तरपूजा करतात व त्याला देव्हाऱ्यातून खाली ठेवतात. मग संध्याकाळी गणेशमूर्ती वाजतगाजत गावाच्या बाहेर जलाशयावर नेतात. तेथे आरती करून गणेशमूर्तीचे पाण्यात विसर्जन करतात. त्या वेळी ‘गणपतिबाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लौकर या.’ अशी गणपतीची प्रार्थना करतात. गणेशचतुर्थीसंबंधी अनेक कथा पुराणग्रंथांत आहेत. फार वर्षांपूर्वी सिंदुरासुर नावाचा एक दैत्य सगळ्या जगाला अतिशय त्रास देत होता. त्याने स्वर्गावर हल्ला करून सर्व देवांचा पराभव केला.

सगळे देव घाबरून लपून बसले. मग तो दैत्य पृथ्वीवर सगळ्यांना त्रास देऊ लागला. त्याने मठ-मंदिरे फोडून टाकली. यज्ञांचा विध्वंस केला. आश्रम नष्ट केले. देव-ब्राह्मणांना अगदी नकोसे केले. घाबरलेले सगळे देव, ऋषी भगवान विष्णूला शरण गेले. विष्णूला सर्वांची दया आली. विष्णू देवांना म्हणाला, ‘मी पार्वतीच्या पोटी गजाननरूपाने अवतार घेईन व सिंदुरासुराचा नाश करीन.’ मग भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला भगवान विष्णूंनी पार्वतीच्या पोटी जन्म घेतला. त्या बालकाला मस्तकच नव्हते. तेव्हा शंकरांनी गजासुराला ठार मारले व त्याचे मस्तक त्या बालकाला बसविले.

गजासुराचे मस्तक लावल्याने त्या बालकाला गजानन असे नाव मिळाले. आपल्या नाशासाठी विष्णूने गजाननाचा अवतार घेतला आहे हे समजताच सिंदुरासुर गजाननाला ठार मारण्यासाठी आला. गजानन व सिंदुरासुर यांचे मोठे युद्ध झाले. गजाननाने सिंदुरासुराला ठार मारले. स्वर्गातील देवांना व पृथ्वीवरील लोकांना खूप आनंद झाला. ही घटना भाद्रपद शुद्ध चतुर्थी या दिवशी घडली. सर्वांनी गजाननाला आपला अधिपती-गणपती केले. त्या दिवसापासून गणेशचतुर्थी सण सुरू झाला. गणेशचतुर्थीला चंद्राचे दर्शन घेत नाहीत. मात्र संकष्टीला चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडत नाहीत.

याबद्दल एक मजेशीर कथा आहे. एकदा गणपती उंदरावर बसून जात असता पडला. ते पाहून चंद्र त्याला हसला. गणपतीला त्याचा राग आला. त्याने चंद्राला शाप दिला : आजपासून तुझे तोंड कुणीही पाहणार नाही. घाबरलेला चंद्र गणेशाला शरण गेला. गणेशाला त्याची दया आली. तो चंद्राला म्हणाला, ‘फक्त भाद्रपद चतुर्थीला तुझे तोंड कुणी पाहणार नाही. कुणी पाहिले तर त्याच्यावर खोटे आळ येतील.

पण संकष्टीला माझे भक्त तुझे दर्शन घेतल्यावरच उपवास सोडतील.’ देवदानवांच्या यद्धात गणेश देवांचा सेनापती होता. म्हणून त्याला गणनायक किंवा गणपती म्हणतात. तो आपल्या भक्तांची दुःखे, संकटे दूर करतो, म्हणून त्याला विघ्नहर्ता म्हणतात. कोणत्याही शुभकार्याच्या प्रारंभी गणेशाला वंदन करावे लागते. चौदा विद्या, चौसष्ट कलांचा तो स्वामी आहे, म्हणून तो विद्यादेवता आहे. म्हणूनच शाळेत प्रथम शिकवितात- ‘श्री गणेशाय नमः। महाराष्ट्रात गणेशोत्सवाचे महत्त्व फार आहे. पारतंत्र्याच्या काळात लोकमान्यांनी गणेशचतुथी हा सण राष्ट्रीय सण केला.

सार्वजनिक गणेशाची स्थापना केली. या उत्सवात व्याख्यान, कथाकीर्तने, मेळे सुरू केले. त्यामुळे लोकांच्यात देशभक्तीची भावना निर्माण झाली. लोक भेदाभेद विसरून संघटित झाले. स्वातंत्र्यलढ्यासाठी सिद्ध झाले. तेव्हापासून महाराष्ट्रात गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जाऊ लागला. मंबई. पणे. सांगली इत्यादा अनेक शहरांत आजकाल असंख्य मंडळांतर्फे सार्वजनिक गणेशोत्सव दहा दिवस म्हणज अनंतचतुर्दशीपर्यंत फार. मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. असा आहे हा सुखकर्ता, दुःखहर्ता गणेशचतुर्थीचा सण!

काय शिकलात?

आज आपण गणेश चतुर्थी माहिती, इतिहास मराठी । Ganesh Chaturthi Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment