गिरीपुष्प फुलाबद्दल माहिती मराठीत – Gliricidia Flower Information in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला ग्लिरिसिडिया फुलाबद्दल माहिती मराठीत – Gliricidia Flower Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – गुलमोहर फुलाबद्दल माहिती

गिरीपुष्प फुलाबद्दल माहिती मराठीत - Gliricidia Flower Information in Marathi

गिरीपुष्प – Gliricidia Flower Information in Marathi

१]मराठी नाव :गिरीपुष्प
२]हिंदी नाव :ग्लिरिसिडिया
३]इंग्रजी नाव :Gliricidia

भारतात सगळीकडे आढळणारे फुलांचे झाड म्हणजे ग्लिरिसिडिया. ग्लिरिसिडिया हे लवकर वाढणारे झाड आहे. रंग : ह्याची फुले निळ्या जांभळ्या रंगाची असतात.

वर्णन : या झाडाची पाने हिरवीगार असतात. २५ ते ३० फूट उंचीचा हा वृक्ष असतो. या झाडांच्या मुळ्यांवर गाठी येतात. द्विदल वनस्पती वर्गातील हे झाड आहे. या झाडांची पाने जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये गळून पडतात.

ग्लिरिसिडिया पानझडी वृक्ष असल्यामुळे पाने गळून गेल्यानंतर फांद्यांच्या टोकांवर निळी जांभळी फुले गुच्छात येतात. फुलांनी बहरलेले ग्लिरिसिडियाचे झाड फार सुंदर दिसते.

उपयोग : ग्लिरिसिडिया या झाडाची फुले शोभेसाठी वापरली जातात. या झाडांच्या बिया उंदरांनी खाल्यास उंदीर मरतात. या झाडांच्या हिरव्या पानांपासून चांगल्या प्रकारचे कंपोस्ट खत तयार होते.

छाटणी केलेल्या झाडांच्या फांद्या वाळवून सरपणासाठी वापरतात. ग्लिासडियाच्या झाडांची लागवड शेताच्या कडेने, रस्त्याच्या बाजूला केली जाते. कारण गुरे याची पाने खात नाहीत.

या झाडांच्या फुलांपासून मधमाशांना भरपूर मध मिळतो. त्यांच्या पानांपासून मिळणान्या सेंद्रिय खतामुळे जमिनीचा कस वाढतो. म्हणून ग्लिरिसिडिया झाडांची जास्तीत जास्त लागवड करणे गरजेचे आहे.

लागवड : कलमांद्वारे आणि बियांपासून रोपे तयार करून या झाडांची लागवड करता येते. हलक्या ते मध्यम स्वरूपाची जमीन या झाडांसाठी चालते. ही झाडे पावसाच्या पाण्यावर सहज वाढतात.

काय शिकलात?

आज आपण ग्लिरिसिडिया फुलाबद्दल माहिती मराठीत – Gliricidia Flower Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment