गोकर्ण फुलाबद्दल माहिती मराठीत – Gokarna Flower Information in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला गोकर्ण फुलाबद्दल माहिती मराठीत – Gokarna Flower Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – कण्हेर फुलाबद्दल माहिती

गोकर्ण फुलाबद्दल माहिती मराठीत - Gokarna Flower Information in Marathi

गोकर्ण – Gokarna Flower Information in Marathi

१]मराठी नाव :गोकर्ण
२]इंग्रजी नाव :Clitoria Ternatea

गोकर्णाच्या फुलाचा आकार वेगळा असतो. फूलही सुंदर दिसते. रंग : पांढरे गोकर्ण आणि निळे गोकर्ण असे गोकर्णाचे दोन प्रकार आहेत. वर्णन : गोकर्ण ही वेलवर्गात मोडते.

पाने हिरवीगार, गोल आणि लहान असतात. त्याच्या फुलांचा आकार गाईच्या कानांप्रमाणे असतो. म्हणून गोकर्ण नाव पडले आहे. या फुलाच्या पाकळ्यांचा आकार लांबटगोल असतो.

मऊशार पाकळ्यांना कडेने खालच्या बाजूने हिरवट रंगाचे आवरण असते. या फुलांना अगदी लहान हिरवे देठ असते. याचा वेल भिंतीवर, एखाद्या झुडपावरसुद्धा वाढतो.

गोकर्ण फुलांच्या वेलाला शेंगा येतात. त्या शेंगा वाळल्यावर त्यातील बिया लावल्या म्हणजे गोकर्णाचा वेल उगवतो. उपयोग : गोकर्ण या फुलांचा उपयोग देवाला वाहण्यासाठी करतात.

विशेषतः शंकरालाही फुले वाहतात. इतर माहिती : गोकर्णाचा बीजप्रसार वाऱ्यामार्फत होतो. याला फक्त पावसाळ्यातच फुले येतात. फुलांना जरी वास नसला तरी फुले फार सुंदर व आकर्षक दिसतात. झाडावरून ही फुले तोडली की लगेच सुकतात.

काय शिकलात?

आज आपण गोकर्ण फुलाबद्दल माहिती मराठीत – Gokarna Flower Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment