गुड फ्रायडे माहिती, इतिहास मराठी | Good Friday information in Marathi

हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला गुड फ्रायडे माहिती, इतिहास मराठी | Good Friday information in Marathi सांगणार आहे तर चला बघुयात.

गुड फ्रायडे माहिती, इतिहास मराठी | Good Friday information in Marathi

आणखी वाचा – नाताळ

गुड फ्रायडे मराठी | Good Friday information in Marathi

गुंड फ्रायडे परमेश्वराचा प्रेषित असलेल्या लोकांना खऱ्या धर्माचा उपदेश करणाऱ्या भगवान येशू ख्रिस्ताला त्याच्या विरोधकांनी क्रूसावर चढवून ठार मारले. एप्रिल महिन्याचा तिसरा शुक्रवार हा येशूच्या मृत्यूचा दिवस ‘गुड फ्रायडे’ या नावाने ओळखला जातो. येशूचा अवतार झाला त्या काळातील यहुदी लोक सुख-भोगांच्या आहारी गेलेले होते. परमेश्वराने आपल्या पूर्वजांना दिलेल्या या पृथ्वीच्या राज्याचा आपण मनसोक्त उपभोग घ्यावा, अशीच सर्वांची समजूत होती. त्या काळातील भिक्षुकांनी, धर्मपंडितांनी धर्माच्या नावावर गरीब जनतेची पिळवणूक चालविली होती.

राजसत्तेचे त्यांना पाठबळ मिळत होते. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले लोक सगळा अन्याय, जुलूम निमूटपणे सहन करीत होते. सत्ताधारी गोरगरिबांना तुच्छ मानीत होते. खऱ्या धर्मापासून लोक दूर गेले होते. अशा वाईट परिस्थितीत लोकांना समता, प्रेम, अहिंसा, त्याग, सत्कर्म, जांची ओळख करून देऊन परमेश्वराचा संदेश सांगणे, सत्यधर्माचा उपदेश करणे हे कठीण काम येशूने केले. येशू स्वतःला परमेश्वराचा पुत्र, प्रेषित, यहुद्यांचा राजा असे समजत असे. तो सगळीकडे फिरून लोकांना उपदेश करीत असे. जे नम्र, दयाशील ते धन्य. जे अंतःकरणाने पवित्र आहेत त्यांच्यावरच देव दया करतो. आपल्या शत्रूवरही प्रेम करा. परमेश्वराचे अनुकरण करा. लोकांनी आपली स्तुती करावी म्हणून दानधर्म व परोपकार करू नका.

तुमच्या उजव्या हाताने केलेले सत्कृत्य डाव्या हाताला कळता कामा नये. स्वतःसाठी धन साठवू नका. ते नाशवंत आहे. सत्कृत्ये करून स्वर्गात धनसंचय करून ठेवा. अगोदर स्वतःच्या डोळ्यातील मुसळ काढा आणि मग दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळाकडे लक्ष द्या. प्रार्थनेत फार मोठे सामर्थ्य आहे. मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोठवा म्हणजे उघडेल. महारोगी, पांगळे, आंधळे, दुःखी अशा असंख्य लोकांना येशूने आपल्या हस्तस्पर्शाने बोले गरिबांची सेवा केली. अनेक चमत्कार केले. येशूची लोकप्रियता दिवसेदिवस वाढू लागली येश हा मसीहा आहे.

परमेश्वर आहे यावर लोकांचा विश्वास बसला. परंतु येशची ही लोकप्रियता त्या काळातील भिक्षुकांना, धर्मपंडितांना जाचक होऊ लागली. येशू हा राजसत्तेला आव्हान वाटू लागला. असंख्य लोक येशूच्या भोवती गोळा होऊ लागले, त्याला असंख्य शिष्य मिळाले. मीच यहुद्यांचा राजा आहे असे येशू उघडपणे सांगू लागला. प्रचलित रूढी, धर्म, धर्ममार्तंड व त्यांना पाठबळ देणारी राजसत्ता याविरुद्ध येशूचे हे बंडच होते. यामुळे भिक्षुकांनी, धर्मपंडितांनी व राजसत्तेच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून येशूला ठार मारण्याचे ठरविले. आपले अवतारकार्य संपत आले आहे हे येशूला कळून चुकले. आपल्या शिष्यांना त्याने तसे बोलनही दाखविले. त्याने आपल्या शिष्यांना शेवटचा उपदेश केला. त्यांची सेवा केली. त्यांच्याबरोबर शेवटचे भोजन केले.

आपला निर्वाण काळ जवळ आला आहे हे ओळखून येशू एकान्तात चिंतन करीत बसला. त्या वेळी त्याच्या शरीरातून रक्तासारखे लाल धर्मबिंदू टपटप गळत होते. मध्यरात्र उलटून गेली आणि अचानक काही शिपाई तलवारी नाचवत येशूकडे धावत आले. त्यांत येशचे काही शिष्यही होते. येशला पकडण्यात आले. येशच्या अनयायांनी त्यांना विरोध केला तेव्हा येशू त्यांना थोपवून म्हणाला, ‘जे तलवारी चालवतात ते तलवारीनेच मरतात. माझी इच्छा असेल तर माझा स्वर्गातील पिता माझे रक्षण करील. परंतु मला तसे करावयाचे नाही.

हा पेला कडू असला तरी मी तो स्वीकारणार आहे.’ येशूला राजसिंहासनापुढे उभे केले. येशू हा पाखंडी, राजद्रोही आहे असा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला. त्याचा खूप छळ केला. त्याला लाथाबुक्क्यांनी मारले व त्याला क्रूसावर चढविण्याचे निश्चित केले. येशूला किरमिजी रंगाचा झगा चढवून त्याच्या डोक्यावर काटेरी मुकुट ठेवला. त्याच्या खांद्यावर अत्यंत अवजड असा क्रॉस, शूळ दिला व त्याला शिव्या देत, धक्के मारीत वध्यभूमीवर नेले. तेथे त्याला शूळावर चढवून त्याच्या हातापायांवर खिळे ठोकले.

येशूला असह्य वेदना होत होत्या पण येशूने शोक न करता प्रार्थना केलीः ‘परमेश्वरा, या लोकांना तू क्षमा कर, कारण आपण काय करतो आहोत हे त्यांना समजत नाही.’ दुपारी तीन वाजता या परमेश्वराच्या प्रेषिताचे, महान संताचे, दयेच्या सागराचे क्रूसावर प्राण गेले. तो दिवस एप्रिल महिन्यातला तिसरा शुक्रवार होता. येशूने सत्यधर्माच्या प्रचारासाठी, मानवतेसाठी आपले प्राण दिले म्हणून या दिवसाला गुड फ्रायडे म्हणतात.

दरवर्षी या शुभ शुक्रवारी सर्व ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये एकत्र जमून येशूने भोगलेल्या मरणयातनांचे भक्तिभावे स्मरण करतात. या दिवशी उपवास केला जातो. मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी रविवारी येशूचे मातून पुनरुत्थान झाले याबद्दल आनंद व्यक्त करण्यात येतो. या रविवारला ईस्टर म्हणतात. त्यानंतर ४० दिवसांनी येशूचे स्वर्गारोहण झाले. त्या दिवशी मेजवानी करतात.

काय शिकलात?

आज आपण गुड फ्रायडे माहिती, इतिहास मराठी | Good Friday information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment