बदक पक्ष्याबद्दल माहिती मराठीत – Grey Duck Bird Information in Marathi

हॅलो वाचकांनो.. आज मी तुम्हाला बदक पक्ष्याबद्दल माहिती मराठीत – Grey Duck Bird Information in Marathi देणार आहे. तर चला बघुयात.

बदक - Grey Duck Bird Information in Marathi
१.मराठी नाव :प्लवा, धनवर बाड्डा, कोंबडो.
२.इंग्रजी नाव :Spot bill or Grey Duck
३.आकार :६१ सेंमी.
४.वजन :०.५ – १ किलो ग्राम.

माहिती – Grey Duck Bird Information in Marathi

‘एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख!’ ही कविता तुम्हाला माहीत असेल, हो ना? तर या कवितेतल्याच एका बदकाची आपण ओळख करून घेणार आहोत.

या बदकाचं नाव आहे प्लवा. हे बदक छोटे-मोठे तलाव आणि नद्यांवर दिसतं. फिक्कट आणि गडद तपकिरी रंग, पंखातला पांढरा चट्टा, पोट आणि छातीवरची चिलखतासारखी पिसं आणि तिरंगी चोच ही या बदकाची वैशिष्ट्यं आहेत.

पाण्याबाहेर येऊन ही बदकं जेव्हा विश्रांती घेतात किंवा त्यांचे पंख वळवत बसतात तेव्हा त्यांचे नारिंगी पाय उठून दिसतात. या बदकाच्या दोन्ही पंखांमध्ये कंबरेच्या बाजूला असलेले चमकदार हिरव्या रंगाचे पट्टे उडताना त्याची ओळख पटवतात.

पाण्यामध्ये बुचकळ्या (dabbling) मारत किंवा खाली डोकं वर पाय करत ही बदकं पाण्यातील जी वनस्पती असते ते खुडण्याचं काम करतात. या बदकामध्ये नर आणि मादी सारखेच दिसतात.

आपल्या भागात हिवाळी स्थलांतरी बदकांमध्ये प्लवा त्याच्या मोठ्या आकारामुळे वेगळं ओळखता येतं. पावसाळा सुरू झाला, की प्लवा बदकाची मादी घरट्याची तयारी करायला सुरुवात करते.

तलावाच्या कडेला वाढलेल्या वनस्पतींच्या दाटीत जागा निवडली जाते. गवत आणि पाणकाड्या एकत्र करून एक पाट तयार केला जातो. अंडी उबवत असताना किंवा सतत ऊठबस झाल्यामुळे या पाटावर एक खोलगट असा भाग तयार होतो. या खळग्यात मादी ६ ते १२ अंडी घालते.

ऑक्टोबर महिन्यात बदकी आणि तिची लोकरीच्या गोळ्यांसारखी गोजिरवाणी पिल्लं बघायला मिळतात. पाण्यात पोहणारी बदकी आणि तिच्या पाठोपाठ, तिची शेपटी धरून लुटुलुटु पोहणारी तिची बाळं हे दृश्य प्रत्येकानं पहावं असंच असतं. संपूर्ण वर्षभर हे रहिवासी बदक आपल्या देशात सहजपणे पाहता येतं.

काय शिकलात?

आज आपण बदक – Grey Duck Bird Information in Marathi घेतली आहे.पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

घार पक्ष्याबद्दल माहिती मराठीत – Common Pariah Kite Bird Information in Marathi

शिक्रा पक्ष्याबद्दल माहिती मराठीत – Shikra Bird Information in Marathi

Leave a Comment