जास्वंद फुलाबद्दल माहिती मराठीत – Hibiscus Information in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला जास्वंद फुलाबद्दल माहिती मराठीत – Hibiscus Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – फळाबद्दल माहिती

जास्वंद फुलाबद्दल माहिती मराठीत - Hibiscus Information in Marathi

जास्वंद – Hibiscus Information in Marathi

१]मराठी नाव –जास्वंद
२]इंगजी नाव –Hibiscus

सर्वसामान्यपणे जास्वंदीचे फूल सर्वत्र दिसते व सगळ्यांना माहीत असते. लाल जास्वंद जास्त लोकप्रिय आहे. रंग: जास्वंदाची फुले लाल, पिवळी आणि पांढरी, गुलाबी, केशरी, मिश्र रंगांची अशी विविध रंगांची असतात.

वर्णन : जास्वंदाची पाने हिरवीगार, गोलाकार, रुंद असून, पानांच्या कडेने नक्षी असते. जास्वंदाची फुले मोठी व पाकळ्या रुंद असतात. एका फुलाला चार ते पाच पाकळ्या असतात. याचे देठ हिरवे आणि फुलाच्या मानाने बारीक असते. फुलाच्या मध्ये तुरा असतो.

प्रकार : जास्वंदीचे सिंगल व डबल जास्वंद असे दोन प्रकार आहेत. उपयोग : जास्वंदाच्या फुलापासून उदबत्त्या, सेंट, सौंदर्य प्रसाधने, तसेच तेल तयार करतात.

खोबरेल तेलात जास्वंदाची वाळलेली फुले उकळवून गार झाल्यावर ते तेल डोक्याला लावल्याने केस गळायचे थांबतात. केस काळे, लांब आणि चमकदार होतात.

पांढऱ्या व पिवळ्या रंगाच्या जास्वंदाच्या फुलांपासून औषधे बनविली जातात. लाल जास्वंदाचे फूल गणपतीला फार प्रिय आहे. ही फुले बाराही महिने येतात.

लागवड : जास्वंदीचे बी नसते. एखादी फांदी जरी जमिनीत लावली तरी रोप तयार होते. प्रत्येक पान सुटे सुटे असते. वेळेवर जास्वंदीच्या झाडाची छाटणी केली तर झाडाला भरपूर फुले येतात.

सिंगल जास्वंदीचे फूल ४-५ पाकळ्यांचे तर डबल जास्वंदीला भरपूर पाकळ्या असतात. हे फूल भरगच्च दिसते. या झाडाची वाढ कुंडीतही चांगली होते.

काय शिकलात?

आज आपण जास्वंदी फुलाबद्दल माहिती मराठीत – Hibiscus Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment