कबड्डी बद्दल माहिती मराठीत – Kabaddi Information in Marathi

हॅलो वाचकांनो.. आज मी तुम्हाला Kabaddi Information in Marathi – कबड्डी बद्दल माहिती मराठीत देणार आहे, तर चला बघुयात.

Kabaddi information in marathi

माहिती – Kabaddi Information in Marathi

फार जुन्या काळापासून भारतात कबड्डी हा खेळ खेळला जातो. पूर्वी या खेळास हुतूतू हे नाव होते. पण हल्ली मात्र याला कबड्डी नावानेच ओळखले जाते.

पूर्वी खेडेगावातून सवडीच्या वेळात खेळताना या खेळाला काही नियम नव्हते. पण अलीकडे मात्र हा खेळ शहरातून खेळला जातो. या खेळाच्या राज्यस्तरीय स्पर्धाही होतात.

खेळाचे मैदान – या खेळासाठी एका नरम आणि सपाट मैदानाची गरज असते. मैदान बनविण्यासाठी लालसर रंगाची माती वापरतात. वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसाठी व मुलींसाठी तसेच महिला व पुरुषांसाठी वेगवेगळ्या आकारांचे मैदान असते.

कबड्डीच्या मैदानात मध्यभागी रेषा आखलेली असते. त्यामुळे मैदानाचे दोन भाग पडतात. मैदानाच्या दोन्ही बाजूंना त्या त्या संघाचे राखीव क्षेत्र असते.

पोशाख – कबड्डी खेळताना पुरुषांना व मुलांना हाफ पँट आणि बनियन व महिला व मुलींना टी शर्ट व हाफ पँट आणि पायात कापडी बूट असा पोशाख असतो.

खेळाचे नियम – हा खेळ खेळताना चढाई करणाऱ्या खेळाडूने तोंडाने ‘कबड्डी-कबड्डी’ असा उच्चार करणे बंधनकारक असते. प्रत्येक खेळाडूच्या बनियन व टी शर्टवर ठराविक नंबर लिहिलेला असतो. तोच पोषाख त्याला घालावा लागतो.

या खेळात १२ खेळाडू असतात. परंतु खेळण्यासाठी मैदानात सात खेळाडूच असतात. पुरुषांसाठी २०-२० मिनिटे अशा दोन सत्रांत हा खेळ खेळला जातो.

महिला व मुले-मुली यांच्यासाठी १५-१५ मिनिटे असा दोन सत्रांत हा खेळ खेळला जातो. मध्ये पाच मिनिटांचा मध्यंतर असतो.खेळाच्या शेवटी ज्या संघाचे सर्वांत जास्त गुण होतात, तो संघ विजयी ठरतो.

इतर माहिती – या खेळात दोन अम्पायर, एक रेफरी असतो. याशिवाय एक गुण सांगणारा, दोन लाईनमन, दोन जादा स्कोअरर असे अधिकारी असतात.

खेळात रेफरीचा निर्णय हा सर्वांना मान्य करावा लागतो. प्रत्यक्ष सामना खेळताना प्रथम दोन्ही संघ मिळून नाणेफेक करतात. जो संघ नाणेफेक जिंकतो त्याला चढाई किंवा अंगण सांभाळणे यांपैकी एका पर्यायाची निवड करण्याचा अधिकार असतो. अशा रीतीने कबड्डीचे राज्यस्तरीय सामने खेळले जातात.

Kabaddi Player Information in Marathi – कबड्डी खेळाडूची माहिती मराठीत

दीपक हुडा – जन्म १० जून १९९४. दीपक हुडा हा सध्याचा (२०२०) भारतीय राष्ट्रीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार आहे. प्रो कबड्डी लीगच्या सर्व हंगामातही त्याने काम केले आहे.

परदीप नरवाल – जन्म १६ फेब्रुवारी १९९७. सध्या तो व्हीओ – VIVO प्रो कबड्डी लीगमधील पटना पायरेट्स आणि भारतीय राष्ट्रीय कबड्डी संघात खेळणारा एक कबड्डीपटू आहे. परदीप हा व्हीओ प्रो कबड्डीमधील सर्वात नामांकित खेळाडू आहे आणि सध्या तो लीगच्या इतिहासातील सर्वाधिक रेड-पॉइंट धावा करणारा आहे.

अजय ठाकूर – जन्म १ मे १९८६. तो एक भारतीय सर्वत्कृष्ट कबड्डीपटू आणि भारतीय राष्ट्रीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार होता. तो २०१६ च्या कबड्डी विश्वचषक आणि २०१४ एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणार्यात राष्ट्रीय संघाचा भाग होता.

राहुल चौधरी – जन्म १६ जून १९९३. त्याने डिफेंडर म्हणून सुरुवात केली परंतु नंतर तो रायडर बनला. २०१६ च्या दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणार्याग भारतीय राष्ट्रीय कबड्डी संघाचा तो सदस्य होता.

काय शिकलात?

आज आपण Kabaddi Information in Marathi – कबड्डी बद्दल माहिती मराठीत पहिली आहे. पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Cricket Information in Marathi – क्रिकेट बद्दल माहिती मराठीत

Leave a Comment