खो-खो खेळाबद्दल माहिती मराठीत – Kho Kho Information in Marathi

हॅलो वाचकांनो आज मी तुम्हाला Kho Kho Information in Marathi – खो-खो खेळाबद्दल माहिती मराठीत देणार आहे. तर चला बघुयात. आणखी वाचा – क्रिकेट बद्दल माहिती

kho kho information in marathi

माहिती – Kho Kho Information in Marathi

आपल्या सर्वांना परिचित असलेला असा हा खो-खो खेळ फार पूर्वीपासून खेळला जातो. हा खेळ शहरात व खेड्यात गावागावांतून खेळला जातो. पूर्वी या खेळासाठी काही नियम नव्हते, परंतु आधुनिक काळात या खेळासाठी काही नियम तयार केले आहेत. हा मैदानी खेळ आहे.

खेळाचे मैदान – या खेळासाठी मैदान आयताकृती असावे लागते. या मैदानाची लांबी साधारणपणे २५ ते २७ मी. असते व मैदानाची रुंदी १३ ते १५ मी. असते. मैदानातील लांबीच्या बाजूच्या रेषेला ‘बाजू रेषा’ व रुंदीच्या बाजूच्या रेषांना अंतिम रेषा’ म्हणतात.

अंतिम रेषेपासून २.७० मी. मैदानाच्या आत दोन्ही बाजूंना दोन खांब रोवलेले असतात. मध्य रेषेची लांबी साधारणपणे २२.६० मी. असते. मध्य रेषेवर आठ क्रॉस रेषा असतात. खो-खो च्या मैदानात दोन खांबांमधील अंतर १८ मी. असते व खांबाची उंची १ मीटर असते.

खेळाचे नियम – हा खेळ दोन संघांत खेळला जातो. प्रथम पंच नाणेफेक करण्यास सांगतात. नाणेफेक जिंकणारा संघ पळती किंवा पाठलाग यांची निवड करतो. पाठलाग करणारे खेळाडू असलेल्या खेळाडूस खो’ देतात. मात्र खो हा शब्द उच्चारणे आवश्यक असते. जर एखाद्या खेळाडूने नियमभंग केला तर त्याला बाद ठरविले जाते.

खेळाडूंची संख्या – या खेळात १२ खेळाडू असतात. त्यातील ९ खेळाडू प्रत्यक्ष खेळामध्ये भाग घेतात व ३ खेळाडूराखीव असतात.

पोशाख – टी शर्ट, हॉफ पँट, पायमोजे, बूट असा हा खेळ खेळणाऱ्या खेळाडूंचा पोशाख असतो.

इतर माहिती – हा खेळ खेळण्यासाठी वयाचे बंधन नसते. महिला, पुरुष, मुले, मुली सारेजण हा खेळ खेळू शकतात. हा खेळ घरासमोरील अंगणात, बागेमध्ये वापळण्यासाठी जेथे जागा असेल तेथे हा खेळ खेळला जातो.

परंतु अलीकडे शाळा व कॉलेजमध्ये खो-खोच्या स्पर्धा घेतल्या जातात व खेळाचे राज्यस्तरीय सामने पण खेळले जातात. या खेळात दोन पंच असतात.

एक वेळ-अधिकारी असतो. दोन अधिकारी गुण लिहीत असतात. ज्या संघाचे गुण अधिक होतात तो संघ जिंकतो. अशा प्रकारे खो-खो हा खेळ खेळला जातो.

भारतीय खो खो चे काही लोकप्रिय खेळाडू

  • सतीश राय
  • सारिका काळे
  • पंकज मल्होत्रा
  • मंदाकिनी माझी
  • प्रवीण कुमार

काय शिकलात?

आज आपण Kho Kho Information in Marathi – खो-खो खेळाबद्दल माहिती मराठीत पहिली आहे. पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment