कोजागरी पौर्णिमा माहिती, इतिहास मराठी | Kojagiri Purnima Information in Marathi

हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला कोजागरी पौर्णिमा माहिती, इतिहास मराठी | Kojagiri Purnima Information in Marathi सांगणार आहे तर चला बघुयात.

कोजागरी पौर्णिमा माहिती, इतिहास मराठी Kojagiri Purnima Information in Marathi

आणखी वाचा – स्वातंत्र्य दिन

कोजागरी पौर्णिमा मराठी | Kojagiri Purnima Information in Marathi

आश्विन पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा असे म्हणतात. हिला कौमुदी पौर्णिमा किंवा नव्याची पुनव असेही म्हणतात. शरद् ऋतूतील ही कोजागरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा, वैभवाचा, आनंदाचा उत्सव. या दिवशीचा चंद्र सर्वांत मोठा, अधिक आकर्षक वाटतो. या दिवशीचा चंद्र अधिक शांत, शीतल तर असतोच; शिवाय तो उपकारकही असतो. शेतातील धान्याला व औषधी वनस्पतींना तो पुष्ट करतो.

या व्रताला कोजागरव्रत असे म्हणतात. या दिवशी उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावतावर बसलेला इंद्र यांची पूजा करतात. आटीव दूध चंद्रप्रकाशात ठेवतात व मध्यरात्री त्याचा चंद्राला नैवेद्य दाखवून प्रसाद म्हणून सर्वजण पितात. हे दूध आरोग्यवर्धक, अमृतमय आहे असे समजले जाते. या दिवशी देव व पितर यांना नवीन पोहे व नारळाचे पाणी अर्पण करतात. या दिवशी रात्री द्यूत खेळावे. गाणी म्हणावीत. नृत्यादी कार्यक्रम करावेत. या दिवशी मध्यरात्र संपेपर्यंत कोणीही झोपू नये. कारण या दिवशी रात्री वरदा लक्ष्मी पथ्वीवर सगळीकडे संचार करीत असते व जे कोणी जागे असून बुद्धिबळ इत्यादी खेळात मग्न असतील त्यांच्यावर ती प्रसन्न होते. इंद्रसुद्धा असाच फिरत असतो व आपली पूजा कोठे चालली आहे ते पाहतो व त्या घरावर कृपा करतो, असे पुराणात सांगितले आहे. –

निशीथे वरदा लक्ष्मीः को जागर्ति इति भाषिणी।
तस्मै वित्तं प्रयच्छामि यो जागर्ति महीतले।।

म्हणजे या दिवशी मध्यरात्री लक्ष्मीदेवी विचारते, ‘कोण जागं आहे?’ – म्हणजे कोण आपल्या कर्तव्याला जागतो? कोण-कोण आपली कामं नीट करतो? शेतकरी शेतात काम करतो का? विद्यार्थी नीट अभ्यास करतात का? शिक्षक मनापासून शिकवतात का? आईवडील, पालक आपल्या मुलामुलींच्याकडे ‘नीट लक्ष देतात का? जो कोणी जागा असेल जागरुक असेल, दक्ष असेल त्याला मी द्रव्यसंपत्ती देणार आहे,’ असे म्हणत लक्ष्मी पृथ्वीवर संचार करते. ‘को जागति?’ या शब्दांवरूनच या पौर्णिमेला आणि देवीलाही कोजागरी असे नाव पडले. या दिवशी लक्ष्मीच्या स्वागतासाठी रस्ते-घरे-मंदिरे, उद्याने, नद्यांचे घाट स्वच्छ करून त्या ठिकाणी दीप लावतात.

लक्ष्मीला नीटनेटकेपणा, स्वच्छता, पावित्र्य आवडते. जेथे या गोष्टी असतात तेथेच लक्ष्मी वास्तव्य करते. या पौर्णिमेला शरत्पौर्णिमा असेही म्हणतात. कारण शरद् ऋतूची सर्व शोभा या दिवशी दिसून येते. पावसाळ्यानंतरच्या या रात्री चंद्रही पूर्ण प्रकाशित झालेला असतो. जो आपल्या कर्तव्याच्या बाबतीत सदैव जागृत असतो त्यालाच सर्व प्रकारची लक्ष्मी मिळते. आळशी, झोपाळू, कामचुकार अशा माणसावर लक्ष्मीची कृपा होत नाही. शुद्ध व पवित्र अंतःकरणाने जीवनाचा आनंद मिळवितो, कर्तव्यकर्म करतो तोच जीवनात यशस्वी होतो, हाच या कोजागरी उत्सवाचा अर्थपूर्ण संदेश आहे.

काय शिकलात?

आज आपण कोजागरी पौर्णिमा माहिती, इतिहास मराठी | Kojagiri Purnima Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment