कोयना नदी बद्दल माहिती मराठी – Koyna River Information in Marathi

हॅलो मित्रानो आज मी तुम्हाला कोयना नदी बद्दल माहिती मराठी – Koyna River Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – गोदावरी नदी

कोयना नदी बद्दल माहिती मराठी - Koyna River Information in Marathi

कोयना नदी – Koyna River Information in Marathi

महाराष्ट्राच्या कोकण विभागातील प्रमुख नद्यांमध्ये कोयना नदीचा समावेश आहे. उगमस्थान – सह्याद्री पर्वताच्या पश्चिम उतारावर महाबळेश्वर येथे ४००० फूट उंचीवर कोयना नदीचा उगम होतो.

कोयना नदीच्या उपनद्या -सोळशी, कांदाही, केरा, मोरणा आणि रांगा या कोयना नदीच्या उपनद्या आहेत. या नद्या कोयना नदीला ठिकठिकाणी मिळतात.

कोयना नदीचे खोरे – कोयना नदीच्या खोऱ्यामध्ये सातारा, रत्नागिरी इत्यादी जिल्हे येतात. तसेच बामणोली डोंगर व वासोटा किल्ला यांच्या परिसरातील प्रदेश कोयनेच्या खोऱ्यात येतो.

इतर माहिती – महाबळेश्वरजवळ उगम पावणारी कोयना नदी प्रथमपासूनच रुंद व विशाल आहे. प्रथम दक्षिण दिशेला वाहत जाऊन नंतर हेलवाक या गावाजवळ पूर्व वाहिनी होते. त्यानंतर कहाडजवळ ती कृष्णा नदीला जाऊन मिळते.

या नद्यांच्या संगमावरच क-हाड शहर वसले आहे. कृष्णा आणि कोयनेच्या या संगमाला प्रीतिसंगम असे म्हणतात. उगमापासून कृष्णा नदीच्या संगमापर्यंत कोयना नदीची लांबी सुमारे १०० कि.मी. आहे.

महाबळेश्वर येथे उगम पावणारी कोयना नदी जावळी आणि पाण्ण तालुक्यातून वाहत जाते. या नदीवर हेळवाक येथे एक मोठे धरण बांधले आहे. या धरणाला कोयना धरण’ असे म्हणतात.

या धरणातील प्रचंड जलाशयाला ‘शिवसागर’ असे नाव देण्यात आले आहे. या जलाशयातील पाणी पश्चिमेकडे वळवून सह्याद्रीच्या बोगद्यातून चिपळूणजवळच्या पोफळी येथील जलविद्युत केंद्रातील जमिनीवर सोडले आहे.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती होते. कोयना नदीवरील धरणामुळे महाराष्ट्राचे भाग्यच जणू उदयाला आले आहे. पोफळी येथील जलविद्युत केंद्रामुळे निर्माण झालेल्या वीजेवर महाराष्ट्रातील मोठमोठे कारखाने व उद्योगधंदे चालतात.

पूर्व, पश्चिम महाराष्ट्राला याच वीजकेंद्रातून वीज पुरवठा होतो. त्यामुळे कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हटले जाते. या वीजप्रकल्पातून निर्माण होणारी वीज घरगुती वापरासाठी त्याचप्रमाणे शेती, उद्योग, कारखाने यासाठी वापरली जाते.

कोयना नदीमुळे महाराष्ट्राच्या विकासात तसेच भरभराटीत भरच पडली आहे. धरणाच्या पाण्याचा उपयोग बारमाही शेती व बागायतीसाठी केला जातो. कोयना नदीवरच्या वीजप्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या वैभवात भरच पडली आहे.

काय शिकलात?

आज आपण कोयना नदी बद्दल माहिती मराठी – Koyna River Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment