युद्धाचे पवित्र क्षेत्र कुरुक्षेत्र

येथेच कौरव-पांडवांत १८ दिवस भीषण युद्ध झाले. युद्धाच्या प्रथम दिवशीच कुलसंहार होऊन आप्तस्वकीय मारले जाणार म्हणून युद्ध नको, राज्य नको असे अर्जुन विमोहित होऊन म्हणू लागला. म्हणून त्याचा मोह घालविण्यासाठी व त्यानिमित्ताने सर्वांना उपयुक्त व्हावी म्हणून भगवंतांनी त्याला गीता सांगून कर्तव्य करण्याची प्रेरणा दिली. तेच हे स्थान कुरुक्षेत्र. कुरुक्षेत्र हे या जिल्ह्याचे मुख्य शहर असून १ कि. मी. वर धानेसर या ठिकाणी शहराची मुख्य वस्ती आहे.

चंदीगढ पासून कुरुक्षेत्र, १०० कि.मी. तर दिल्ली १५४ कि. मी. दूर आहे. पवित्र ‘सरस्वती’ नदी कुरुक्षेत्रातच लुप्त झाली. त्यामुळे ती जेथे लुप्त झाली, त्या कुरुक्षेत्राला तीर्थस्थानाचे महत्त्व प्राप्त झाले. येथेच श्रीकृष्णाने सारथ्य करुन अर्जुनाला कर्तव्यप्रवृत्त केले व प्राप्त कर्तव्याने स्वर्गप्राप्ती मिळते हे सिद्ध करुनही दाखवले. श्री वेदव्यासाने याच स्थानी गणपतीस आव्हान करुन ‘महाभारत’ हा ग्रंथ लिहून घेतला.

सरस्वती नदीच्या काठावर ऋषी-मुनींनी प्रथम वेदमंत्र उच्चारिले. यज्ञ केले. महर्षी वसिष्ठ व विश्वामित्र यांनी ईश्वरासंबंधी याच स्थानी ज्ञान संपादिले. कुरुक्षेत्र हे प्रमुख व पवित्र ठिकाण आहे. कुरुने येथील भूमी नांगरुन तयार केली म्हणून हिला ‘कुरुक्षेत्र’ असे नांव मिळाले. कुरु हा कौरवांचा मूळ पुरुष होय. या राजान तप केले आणि इंद्र प्रसन्न झाला. त्यावर कुरुने वर मागून घेतला की, ‘जितकी भूमा मा नांगरली आहे तितकी धर्मक्षेत्र म्हणन माझ्या नावाने प्रसिद्ध होवो.

येथे शिव आणि सर्वदवता वास करोत.’ आणि तसेच झाले. प्राचीन कुरुक्षेत्र हे एक विशाल भूक्षेत्र होते. त्यात अनेक गावे, शहरे होती. कुरुक्षेत्र ७५ कि.मी. लांब व ७५ कि.मी. रुंद असे सपाट मैदान होते. कुरुक्षेत्रावरील लढाई कौरव-पांडव या दोन पक्षातील नव्हती तर अधर्म, सत्तालालसा, भोगासक्ती, कपटनीती, हिंसाचार व उन्मत्त अहंकार यांनी पोसलेले कौरव व दैवी संपत्तीचे पांडव, या दोन प्रवृत्तीमधील लढा होता. म्हणून श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूने उभा राहिला.

इथे युद्धात जो मरण पावतो, तो स्वर्गात जातो अशी समजूत त्याकाळी होती म्हणून भारतीय युद्धासाठी ही भूमी निश्चित केली. येथे परशुरामाने स्यमंतपंचक नावाचा तलाव निर्माण केला. हे कौशिक ऋषीचे निवासस्थान होते. या क्षेत्रात यात्रेकरुला क्षौर व उपवास करावा लागत नाही. पुरुरवा-उर्वशींची वियोगानंतरची भेट येथेच झाली.

गंगेच्या नुसत्या जलाने मुक्ती व वाराणसीच्या जलात व भूमीत मुक्ती देण्याची शक्ती आहे. परंतु कुरुक्षेत्रातील जल, स्थल व वायू ही तिन्ही मुक्तिदायक आहेत. – महाभारताच्या वनपर्वात असे वर्णन आहे की, ‘मी कुरुक्षेत्रात जाईन, राहीन, असे बोलणारा सुद्धा सर्व पापांपासून मुक्त होतो.’ या क्षेत्रातील वाऱ्यामुळे उडणारी धूळ जरी पापी माणसावर पडली, तरी त्याला श्रेष्ठ गती प्राप्त होते. आणि जो श्रद्धापूर्वक कुरुक्षेत्राची यात्रा करील, त्याला अश्वमेध व राजसूय यज्ञ केल्याचे फळ मिळते असे हे पवित्र कुरुक्षेत्र आहे.

भारतीय युद्धातील महान व थोर भीष्म, द्रोण, कृपाचार्य इत्यादी महावीरांनी या पवित्र क्षेत्रांतील रणक्षेत्री देह ठेवला. या क्षेत्रात ३६० तीर्थाची गणना करतात. या क्षेत्रातील चार प्रसिद्ध सरोवरे आहेत येथील लोकांची आर्थिक स्थिती उत्तम होती. व्यापार व कला यांना राजाश्रय होता. ३ चारित्र्याची लोक राहात होती. कुरुक्षेत्र हे वैदिक संस्कृतीचे उच्चत्तम केंद्र म्हणून राहिले. १९५६ साली कुरुक्षेत्र विश्वविद्यालय स्थापन केले. येथे संस्कृत भाषेचा अभ्य केला जातो. आधुनिक सुविधांनी युक्त असे विश्वविद्यालय आहे.

Leave a Comment