भेंडी फुलाबद्दल माहिती मराठीत – Lady Finger Flower Information in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला भेंडी फुलाबद्दल माहिती मराठीत – Lady Finger Flower Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा –

भेंडी फुलाबद्दल माहिती मराठीत - Lady Finger Flower Information in Marathi

भेंडी – Lady Finger Flower Information in Marathi

१]मराठी नाव :भेंडी
२]हिंदी नाव :भिंडी
३]इंग्रजी नाव :Ladies Finger Flower

सदाहरित असणारे हे झाड देवळाच्या परिसरात किंवा घराच्या परसात येते. या झाडाला येणारी फुले खूप आकर्षक असतात. रंग : भेंडीच्या झाडाला पिवळ्या रंगाची फुले येतात. त्या फुलांच्या पाकळीच्या खालच्या बाजूला लालसर ठिपके असतात.

वर्णन : भेंडी हा पानझडी वृक्ष म्हणून ओळखला जातो. या झाडाची उंची साधारणपणे १५ ते २० फूट असते. याची पाने साधी, मोठ्या देठाची असतात. या पानांचा आकार हृदयासारखा असतो.

त्या पानांवर पातळ मेणासारख्या द्रव्याचा थर असतो. याचे खोड ठिसूळ व नाजूक असते. त्याला अनेक नाजूक फोद्या फुटून वृक्षाचा आकार छत्रीसारखा मोठा डेरेदार दिसतो.

पानांच्या बगलेत एका वेळी दोन फुले एकत्र वाढतात. या झाडावर वर्षभर फुले दिसतात. झाडाला फळे मात्र एप्रिल मे मध्ये येतात. सुरुवातीला ही फळे हिरवी व लहान असतात.

पूर्ण वाढ झाल्यावर ती सफरचंदाच्या आकाराची व हिरवट काळपट रंगाची दिसतात. उपयोग : भेंडीची फुले फार आकर्षक दिसतात. या झाडाचे लाकूड टणक असल्यामुळे नावा, जहाजे बांधण्यासाठी तसेच शेतीची अवजारे बनविण्यासाठी वापरतात.

भेंडीच्या झाडांच्या मुळ्यांचा उपयोग शक्तिवर्धक म्हणून औषध निर्मितीमध्ये केला जातो. फळांचा रस कातडीच्या रोगांवर उपयोगी पडतो. भेंडीच्या झाडाची कोवळी पाने प्राणी खातात.

भेंडीच्या लाकडापासून टॅनीन व लाल रंगाचे द्रव्य काढतात. त्याचा उपयोग रंगाच्या कारखान्यात होतो. त्याच्या आंतरसालीपासून एक प्रकारचा धागा काढतात व त्यापासून दोरखंड बनवितात.

लागवड : या झाडाच्या लागवडीस हलकी, वालुकामय, क्षारयुक्त जमीन असावी लागते. या झाडाची लागवड फांदी लावून त्याचप्रमाणे बिया लावून केली जाते. समुद्र किनाऱ्यावरील जमिनीत यांची वाढ चांगली होते.

असे हे भेंडीचे झाड शेताच्या कडेने, बांधावर, रस्त्याच्या कडेने, मोकळ्या रानात, देवळाच्या आजूबाजूला, इमारतीच्या आवारात लावले तर फायद्याचे ठरते. शेतकऱ्यांनी या झाडांची लागवड केली तर त्यांना त्याचा फायदाच होतो.

काय शिकलात?

आज आपण भेंडी फुलाबद्दल माहिती मराठीत – Lady Finger Flower Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment