पाणकावळा बद्दल माहिती मराठीत – Little Cormorant Information in Marathi

हॅलो वाचकांनो… आज मी तुम्हाला पाणकावळा बद्दल माहिती मराठीत – Little Cormorant Information in Marathi देणार आहे. तर चला बघुयात.

पाणकावळा - Little Cormorant Information in Marathi
१.मराठी नाव :पाणकावळा
२.इंग्रजी नाव :Little Cormorant (लिटल कॉरमोरंट)
३.वजन :२.५ – ५.० किलो ग्राम
४.आकार :५१ सेंमी.

माहिती – Little Cormorant Information in Marathi

एखाद्या नदीच्या पात्रात खडकांनी पाठी वर काढल्या असतील तर एखाद्या खडकावर काळा कुळकुळीत पक्षी त्याचे पंख पसरून बसलेला दिसेल. हाच पाणकावळा.

पाणकावळा पाण्यातली मासेमारी झाली, की पंख पसरून वाळवत बसतो. पाणकावळा हा पटाईत मासेमार आहे. पाण्यात बुडी मारून तो माशांचा पाठलाग करतो आणि आपल्या लांबलचक पण चपट्या चोचीत त्यांना पकडतो.

तळ्यांवर, नद्यांवर आणि सरोवरांवर लहान-मोठ्या थव्यांमध्ये दिसणारा हा पक्षी आहे. अवाक, करकोचे, बगळे, यांसारख्या इतर पाणपक्ष्यांच्या सोबतीत पाणकावळे घरटी करतात.

त्यांची घरटी काड्याकाटक्यांपासून बनवलेली, कावळ्यांच्या घरट्यांसारखीच असतात. महाराष्ट्रात कोकणात पाणकावळे घरटी करतात.

जर योग्य झाड असेल तर ते राहत्या घरांच्या अगदी जवळ घरटी करण्यास मागेपुढे पहात नाहीत. अशा झाडांखाली त्यांची पांढरी विष्ठा, अंड्यांची टरफलं, पिसं आणि माशांचे तुकडे पडलेले दिसतात.

उत्तर भारतात जुलै ते सप्टेंबर आणि दक्षिण भारतात नोव्हेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान पाणकावळे त्यांची घरटी करतात. समुद्रातले पाणकावळे १६ मीटर खोलीपर्यंत डुबी मारतात.

पाणकावळा पाण्यात पोहताना किडकिडीत मानेच्या बदकासारखा दिसतो. पोहताना उपयोगी पडावेत म्हणून त्याच्या पायाला पडदे असतात.

जपान आणि चीन या देशांमध्ये पाणकावळे पाळतात. त्यांचा उपयोग करून मासे गोळा करतात. त्यासाठी कोंबड्या-बदकांसारखे पाकलेले पाणकावळे होडक्यांमधून तलावांवर किंवा नद्यांवर घेऊन जातात. त्यांच्या पायांना दोऱ्या बांधून ठेवतात. त्यामुळे त्यांना पळून जाता येत नाही. मात्र उडता येतं.

मग असे पाणकावळे पाण्यात सोडले, की भरभर वुड्या मारून मासे पकडायला लागतात. प्रत्येक पाणकावळ्याच्या गळ्याला फाय लावलेला असतो. त्यामुळे त्याला मासे गिळता येत नाहीत. चोच आणि गळ्याचा काही भाग भरून मासे पकडले की पक्ष्यांना दोरीनं खेचून होडक्यात मासे टाकायला लावतात.

असे बरेच मासे जमा झाले की गळ्याचा फास सैल करून काही मासे बक्षीस म्हणून खाऊ घालतात. बऱ्याचदा खडकांवर बसलेले पाणकावळे पंख पसरून अंगावर ऊन घेताना दिसतात. कारण माहितीये? काही जणांना वाटतं तुम्ही पीटी करताना जसं दोन्ही बाजूंना एका हाताचं अंतर ठेवून उभं राहता,

तसे पाणकावळे परस्परांपासून अंतर राखून उभं राहतात. त्यामुळे अचानक वेळ उडण्याची आली, तर त्यांचे पंख पंखांवर नाहीत. एकमेकांच्या आपटत कबुतरासारख्या काही पक्ष्यांना कंबरेच्या जागी मोडासारखी दिसणारी एक ग्रंथी असते.

पक्षी हातात धरून, शेपटीवरची पिसं थोडी बाजूला करून कुंकर मारली, की ही ग्रंथी दिसते. या ग्रंथीला तेल ग्रंथी (oil gland) म्हणतात. या ग्रंथीतून पाझरणारं तेल चोचीनी पिसांना लावल्यामुळे पिसं पाण्यानं थबथबत नाहीत. पिसांमध्ये पाणी जिरत नाही. ते पिसांवरून ओघळून खाली पडतं.

पाणकावळ्याला ही तेल ग्रंथी नसते. त्यामुळे पाण्यातली मासेमारी झाली, की त्याला बाहेर येऊन, खडकावर किंवा झाडाच्या फांदीवर बसून पिसं वाळवावी लागतात. म्हणून पाणकावळे पंख पसरून ते सुकवताना दिसतात.

काय शिकलात?

आज मी तुम्हाला पाणकावळा बद्दल माहिती मराठीत – Little Cormorant Information in Marathi दिली आहे. पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

पोपटाबद्दल माहिती मराठीत – Parrot Information in Marathi

Leave a Comment