महाराष्ट्र दिन बद्दल माहिती मराठीत – Maharashtra Din Information in Marathi

हॅलो वाचकांनो आज मी तुम्हाला Maharashtra Din Information in Marathi – महाराष्ट्र दिन बद्दल माहिती मराठीत देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – गणतंत्र दिवस

Maharashtra Din Information in Marathi - महाराष्ट्र दिन बद्दल माहिती मराठीत

माहिती – Maharashtra Din Information in Marathi

आपला भारत देश १५ ऑगस्ट, १९४७ मध्ये स्वतंत्र झाला आणि २६ जानेवारी, १९५० रोजी भारताची राज्यघटना अस्तित्वात आली. या दिवसापासून भारतामध्ये लोकशाही राज्यकारभार सुरू झाला.

त्यानंतर भारतामध्ये भाषानिहाय प्रांतवार रचना करण्यात आली; त्यामुळे प्रत्येक राज्याला एका भाषेविषयी महत्त्व प्राप्त झाले. भाषेमुळे आपल्या राज्याचे विविध प्रश्न समजण्यास मदत झाली.

आपल्या देशाचा राज्यकारभार करणाऱ्या शासनाला ‘संघशासन’ असे म्हणतात. राज्यकारभाराच्या सोईसाठी संपूर्ण देशाचे काही भाग पाडले आहेत; त्यांना घटक-राज्ये म्हणतात.

घटक-राज्यपातळीवरील शासनव्यवस्थेला ‘राज्यशासन’ असे म्हणतात. संघशासन व राज्यशासन या दोन पातळ्यांवरील शासनव्यवस्थेला मिळून ‘संघराज्य पद्धती’ असे म्हणतात.

महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे, १९६० रोजी झाली. म्हणून या दिवसाला महाराष्ट्रामध्ये विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्याप्रमाणे १५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिन, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन त्याचप्रमाणे १ मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी विविध शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक संघटना झेंडावंदन करून व विविध कार्यक्रमांचे आयाजेन करून महाराष्ट्र दिन साजरा करतात.

महाराष्ट्राचा मुख्य कार्यक्रम महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदना करून साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विविध कल्याणकारी योजनांची घोषणा करतात व त्याची अंमलबजावणी करतात.

हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे कामगार वर्गही या दिनात सहभागी होतो. अशा रीतीने सर्वजण महाराष्ट्रात १ मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतात.

काय शिकलात?

आज आपण Maharashtra Din Information in Marathi – महाराष्ट्र दिन बद्दल माहिती मराठीत पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment