महात्मा गांधी बद्दल माहिती मराठीत – Mahatma Gandhi Information in Marathi

हॅलो वाचकांनो.. आज मी तुम्हाला महात्मा गांधी बद्दल माहिती मराठीत – Mahatma Gandhi Information in Marathi त्याचबरोबर Mahatma Gandhi Marathi Quotes आणि Mahatma Gandhi Bhashan Marathi Madhe. आणखी वाचा – सावित्रीबाई फुले

महात्मा गांधी बद्दल माहिती मराठीत - Mahatma Gandhi Information in Marathi
१]पूर्ण नाव –मोहनदास करमचंद गांधी
२]जन्म –२ ऑक्टोबर इ.स. १८६९ पोरबंदर, काठियावाड, ब्रिटिश भारत.
३]मृत्यू –३० जानेवारी इ.स. १९४८ नवी दिल्ली, भारत
४]आई –पुतळीबाई
५]वडील –करमचंद

परिचय – Mahatma Gandhi Information in Marathi

गांधीजींचे संपूर्ण नाव मोहनदास कमरचंद गांधी राष्ट्रपिता म्हणून महात्मा गांधीचे नांव संपूर्ण भारतालाच नव्हे तर पूर्ण जगाला माहीत आहे. आपल्या महापुरुषांना आपण देवतुल्य मानतो. गांधीजींचा जीवनग्रंथ हा सर्वांना माहीत आहे.

२ ऑक्टोबर १८६९ मध्ये गुजरातमधील पोरबंदर येथे गांधीजींचा जन्म झाला. त्यांचा जन्मदिन म्हणजे जंयती संपूर्ण भारतात उत्साहाने साजरी केली जाते. विद्यार्थी दशेत बुध्दीची मजल जेमतेमच असणाऱ्या या माणसाने सत्यनिष्ठेच्या जोरावर अहिंसेचा मोठा मंत्र या जगाला दिला.

सत्य, शिव व सुंदर या तीन चिरंतन मूल्यांवर श्रध्दा, परमेश्वरावर निष्ठा, दलितांबद्दल प्रेम, माया, वात्सल्य देशनिष्ठा या गोष्टी महात्मा गांधींच्या जीवनातील कार्यास पायाभूत ठरल्या. हिंदू धर्मातील तत्वज्ञानावर त्यांची फार मोठी निष्ठा होती.

साधी राहणी, भोजन , मितभाषी वृत्ती या सर्वाचा तत्कालीन तरुण पिढीवर फार मोठा प्रभाव पडला होता. काहींना गांधीजींना बापू च्या स्वरुपात पाहिले, तर काहींनी महात्मा च्या तर काहींनी राजकीय नेत्याच्या तर काहीनी क्रांतिकारकाच्या स्वरुपात.

विविध क्षेत्रांतील कार्य – Mahatma Gandhi Information in Marathi

महात्मा गांधीनी सत्याची साधना के ली. अहिंसेचे आचरण के ले. ब्रह्मचर्याचे पालन केले. हरिजनांचे हित साधले. स्वराज्यासाठी युध्द केले. खादी चळवळीशी ते एकरुप झाले. हिंदू – मुस्लिम ऐक्यासाठी त्यांनी अविश्रांत प्रयत्न केले.

माझे जीवन म्हणजे एक सत्याची प्रयोगशाळा आहे असे ते म्हणत असत. टॉलस्टॉय, रस्किन यांच्या विचारांचे ग्रहण आणि भगवद्गीता व बायबल या धर्मग्रंथांच्या अध्ययनाने त्यांचे संस्कारित धार्मिक विचार अधिकच भक्कम बनले. त्या संस्कारांच्या सत्यासत्यतेचे प्रयोग दक्षिण आफ्रिकेपासून ते त्यांच्या अंतापर्यंत त्यांनी केले ! दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाचा अर्क झाला होता.

तेथे गांधीजी स्वानुभवाने खूप काही शिकले. तेथे लोक काळ्या लोकांचा स्पर्शही करुन घेत नसत. आफ्रिकेत काळा-गोरा यामधील भेद इतक्या विकोपाला गेला होता की, काळ्या लोकांना फूटपाथवरुन चालण्याची बंदी होती.

काळ्या लोकांतच हिंदुस्थानी लोकांचा समावेश असे. तेथे त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारही सहन केला. पण या शांतिदूताने अहिंसा, सत्याग्रह ही संपूर्ण मानवजातीला मुक्त करणारी संग्राम साधने स्वीकारली.

आफ्रिकेहून परत आल्यावर त्यांच्या जीवनाला वेगळेच वळण लागले. त्यानंतर त्यांनी भविष्यकाळत ब्रह्मचारी राहणे व उरलेले आयुष्य लोकसेवेत व्यतीत करणे ही दोन व्रते स्वीकारली.

महात्मा गांधी इंग्लंडला जाण्यास निघाले तेव्हा परदेशात कितीही कष्ट झाले तरी मांस-मदिरेचे सेवन मी करणार नाही अशी प्रतिज्ञा त्यांनी आपल्या मातेसमोर केली व त्यांनी ते शेवटपर्यंत पाळली. दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या कार्यात त्यांच्या पत्नी कस्तुरबा यांनीही त्यांना साथ दिली.

आफ्रिकेतील त्यांनी जो आश्रम स्थापन केला त्याचे नाव टॉलस्टॉय फार्म साबरमतीला जो आश्रम स्थापिला तो सत्याग्रह आश्रम आणि नंतर सेवाग्राम (वर्धा) येथे त्यांनी आश्रम काढला व तेथे जाऊन ते राहिले.

रौलेट अॅक्टविरुध्द ३० मार्च १९१९ ला सुरु केलेले आंदोलन, नंतरची असहकाराची चळवळ, हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी केलेला २१ दिवसांचा उपवास, हरिजन उध्दारासाठी हरिजन संघाची स्थापना, दारुबंदी, स्वदेशी मालाचा पुरस्कार, शिक्षण सुधारणा योजना इ.स.

१९३० ची दांडीयात्रा , इ.स. १९४२ ची छोडो भारत चळवळ, या महात्माजींच्या जीवनातील घटना अत्यंत महत्वपूर्ण आहेत.शरीर, मन व बुध्दीचा होणारा विकास म्हणजे शिक्षण असे सांगणारे गांधीजी शिक्षणतज्ञ होते. मूलोद्योगावर त्यांनी भर दिला.

प्रत्येक खेडे हे स्वायत्ता व स्वयंशासित झाले पाहिजे असे ते म्हणत, हातात शस्त्र न घेता, ब्रिटिश साम्राज्याशाही विरुध्द त्यांनी विजय मिळवून दाखवला. महात्मा गांधीचे सत्याचे प्रयोग हा ग्रंथ प्रसिध्द आहे. आपल्या आयुष्यात सत्य व अहिंसा या तत्वांचे त्यांनी काटेकोर पालन केले.

पण हरिजनांसाठी देशासाठी लढणाऱ्या या महात्म्याच्या शेवटी करुन अंत झाला. ३० जाने. १९४८ रोजी त्यांचा वध झाला हे राम असे ते म्हणाले. सारांश, महात्मा गांधीनी आपल्या आयुष्यात जितके कमावले, जितकी कीर्ती संपादन केली, जितके प्रेम मिळवले, तितके कोणत्याही ऐतिहासिक महापुरुषाने क्वचित मिळविले असेल!

महात्मा गांधी तथ्य – Facts About Mahatma Gandhi in Marathi

  • २ ऑक्टोबर हा त्यांचा वाढदिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून जगभर साजरा केला जातो.
  • गांधीजींचा जन्म शुक्रवारी झाला, शुक्रवारी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि गांधीजींची शुक्रवारी हत्या झाली.
  • ५ वेळा महात्मा गांधी यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते.
  • महात्मा गांधींची मातृभाषा गुजराती होती.
  • माजी बिर्ला हाऊसच्या बागेत मोहनदास करमचंद गांधी यांची हत्या करण्यात आली.

काय शिकलात?

आज आपण महात्मा गांधी बद्दल माहिती मराठीत – Mahatma Gandhi Information in Marathi पहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment