महावीर जयंती बद्दल माहिती मराठीत – Mahavir Jayanti Information in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला Mahavir Jayanti Information in Marathi – महावीर जयंती बद्दल माहिती मराठीत देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – महाराष्ट्र दिन

Mahavir Jayanti Information in Marathi - महावीर जयंती बद्दल माहिती मराठीत

माहिती – Mahavir Jayanti Information in Marathi

महावीर जयंती जन्मतिथी : चैत्र शुद्ध१३, इ. स. पूर्व ५९९ जन्मस्थळ : वैशाली (बिहार) महावीराचे नाव वर्धमान. आईचे नाव त्रिशलादेवी. वडिलांचे नाव सिद्धार्थ.

आपल्या सनातन धर्मापैकी जैन धर्माचा पहिला तीर्थंकर ऋषभनाथ आणि चोविसावा तीर्थंकर महावीर हे फारच प्रसिद्ध पुरुष होऊन गेले. महावीराने जैन धर्माचा खूपच प्रसार केला.

इतर माहिती वर्धमान महावीरांचा जन्म वैशाली (बिहार) राज्यातील राजकुलात झाला. पण राजैश्वर्याच्या विलासात त्यांचे मन रमेना. संसार रुचेना. संसार सोडून ते अरण्यात गेले. त्यांनी खडतर तपश्चर्या केली.

इंद्रिये जिंकली. वासनांवर विजय मिळविला. ते जिन झाले! महावीरांनी समाजातील विषमता, जातिभेद दर केले. त्याचप्रमाणे त्यांनी अहिंसेचा प्रचार केला. त्यासाठी त्यांनी भारतभर भ्रमण केले.

यज्ञयाग आणि कर्मठपणा सोडून अहिंसा मार्गाने प्रत्येकाने ज्ञानप्राप्ती करून स्वत:चे व सर्व समाजाचे कल्याण साधावे, हा उपदेश महावीरांनी वयाच्या बहात्तराव्या वर्षांपर्यंत केला. त्यांच्या या जैन पंथाला भारतभर खूप अनुयायी मिळाले.

त्यांच्या पंचमहाव्रतांचे आचरण निष्ठेने करणारे जैनपंथीय लोक आजही भारतभर पुष्कळ आहेत. महावीरांची जयंती अनेक ठिकाणी निष्ठेने साजरी होते. भारतभर जैनांची अत्यंत सुंदर मंदिरे आहेत. तेथे थाटाने हा जयंती उत्सव साजरा होतो.

काय शिकलात?

आज आपण Mahavir Jayanti Information in Marathi – महावीर जयंती बद्दल माहिती मराठीत पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment