50 मराठी म्हणी | Marathi Mhani

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला 50 मराठी म्हणी व त्यांचे अर्थ | Marathi Mhani एकाच पोस्ट मध्ये देणार आहे तर चला बघुयात.

50 (मराठी म्हणी अर्थासहित) Marathi Mhani With Meaning

मराठी म्हणी | Marathi Mhani

Sr. No. मराठी म्हणीअर्थ
01अति तेथेमातीकोणतीही गोष्ट फार झाली म्हणजे शेवटी ती दुःखदायक होते.
02अतिरागा भीक मागाज्याला भयंकर राग येतो त्याला भीक मागण्याची पाळी येते.
03हिरा तो हिरा आणि गार ती गारमळलेला हिरा आणि स्वच्छ गुळगुळीत गार या दोघात हिरा चटकन ओळखता येतो. साधू आणि दुष्ट दोघांत साधू चटकन ओळखता येतो.
04हातच्या कांकणाला आरसा कशालासत्य गोष्टीला समजायला निराळे काही नको असते. आपले कपाळ, नाक, डोळे, जीभ आपणास आरशावाचून दिसणार नाही. आपली काकणे मात्र आपणास स्पष्ट दिसतात.
05सुंभ जळेल पण पीळ जाणार नाहीहट्टी माणसाचा हट्ट नुकसान झाले तरी कधी कमी होत नाही.
06सारी सोंगे येतात पण पैशाचे सोंग येत नाहीआपण सर्व काही गोष्टींची फसवा, फसवी करू शकतो, पण पैशाची मात्र बतावणी करता येत नाही, आणि केली तरी तो फार वेळ टिकत नाही.
07सत्तेपुढे शहाणपण नाहीज्याच्या जवळ अधिकार आहे त्याच्यापुढे शहाणपण चालत नाही.
08साखरेचा खाणार त्याला देव देणारज्याच्या नशिबी साखर आहे, त्याला ती नेहमीच मिळते. म्हणजे अशांना नेहमी सुखच मिळते, भाग्यवान माणसाला कशाचीही उणी पडत नाही.
09वारा पाहून पाठ फिरवावीआपल्याला वाऱ्याचा त्रास होणार नाही अशा रितीने आपण पाठ फिरवावी; इतर सर्व पाहूनच आपण आपले वर्तन करीत असावे.
10जितका व्याप तितका संतापजितका पसारा अधिक ठेवावा तितका त्रास अधिक होतो.
11शहाण्याला मार शब्दाचाशहाणा माणूस एका शब्दाने ताळ्यावर येतो. मूर्खाला टोणग्याचा मार दिल्याशिवाय तो सुधारत नाही.
12षट्कर्णी करणे आणि घोटाळ्यात पडणेतीन माणसे एकत्र येऊन काही ठरविल्यास ते सर्व वाया जाते.
13वाणला तितका घाणलाएखाद्याची फार स्तुती केल्याने तो फार चढून जातो. चांगला माणूस स्तुती केल्याने बिघडतो.
14लाडे लाडे केले वेडेमुलाचे जर फार लाड केले तर ते मूर्खासारखे वागते.
15राजाला दिवाळी काय माहीतज्याच्या घरी नेहमीच उत्सव, समारंभ असते त्याला रोजचीच दिवाळी असते. आणखी निराळी दिवाळी कशास हवी!
16मुलाचे (पोराचे) पाय पाळण्यात दिसतातमुलगा पुढे कसा निघेल, हे त्याच्या लहानपणीच कळते.
17मूर्ती तितक्या प्रकृतिनिरनिराळी माणसे निरनिराळ्या स्वभावाची असतात.
18मांजराचे गळ्यात घंटा कोणी बांधावीदुर्घट किंवा कठीण काम करावयास संहसा कोणी धजत नाही. इसापनितीतील एका गोष्टीवरून ही म्हण पडली आहे.
19मस्करीची होते कुस्करीथट्टेचा परिणाम पुष्कळ वेळा भयंकर होतो.
20मनी वसे ते स्वप्नी दिसेज्या गोष्टींचा आपण विचार करतो, त्याच आपणास स्वप्नात दिसतात.
21मनात मांडे पदरात धोंडेखूप मनोराज्य करायचे आणि शेवटी निराशा! जवळ पैसा नाही आणि गोष्टी मोठ्या श्रीमंतीच्या करायच्या.
22मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नयेसवलतीचा केव्हाही दुरूपयोग करू नये. त्यांचा योग्य उपयोग करावा.
23भरल्या गाड्यास सुपाचे काय ओझेफार मोठ्या कामात एखादे लहान काम अगदी सहजतेने होऊ शकते. यासाठी अक्कल मात्र हवी.
24भित्यापाठी ब्रह्मराक्षसभिणारा माणूस स्वतःवर संकटे ओढून घेतो.
25पोटात एक आणि ओठात एकलबाड व बदमाश माणसाचे विचार निराळे असतात आणि बोलणे स्वार्थीपणाचे असते. म्हणजे तो लबाडच असतो.
26बळी तो कान पिळीज्याचे जवळ पैसा, अधिकार, वशिला किंवा शारीरिक बळ असते, सामर्थ्य असते तो इतरांचे कान पिळू शकतो. म्हणजे त्याला छळतो, त्रास देतो वगैरे.
27बाप तसा बेटाबापाच्या अंगी जे गुण असतात तेच मुलाच्या अंगात उतरतात.
28पळसाला पाने तीनचकोठेही गेलात तरी मनुष्य स्वभाव सारखाच असतो. तसेच सुखदुःखे पण सारखीच असतात. यासाठी पळसाचे उदाहरण दिले आहे.
29पाचामुखी परमेश्वरपाच म्हणजे अनेक माणसे जे बोलतात ते खरेच असते. ते देवाचेच बोलणे समजतात. तसे करावयास काही हरकत नाही.
30पालथ्या घागरीवरी पाणीहल्ली कोणाला काही सांगितले तरी त्याचा उपयोग होत नाही. पालथ्या घागरीवर पाणी टाकून काही घागर भरत नाही. तसेच चांगल्या गोष्टींचे असते.
31बुगड्या गेल्या पण भोके राहिलीचांगली स्थिती गेली पण त्या स्थितीची चिन्हे मात्र राहिली, हे केव्हाही वाईटच.
32पैसा दक्षिणा आणि लक्ष प्रदक्षिणाभटाला द्यावयाचा एक पैसा आणि त्याने आपल्यासाठी लाख प्रदक्षिणा घालाव्या अशी अपेक्षा करावयाची या मूर्खपणासाठी ही म्हण वापरली जाते.
33पायीची वहाण पायीच बरीमनुष्याला त्याच्या त्याच्या दर्जाप्रमाणे वागवावे. उगीच फाजील महत्त्व देऊ नये.
34पी हळद हो गोरीहळद पिऊन कोणीही मनुष्य गोरा होत नाही. पण एखाद्याने जरी हळद घेतली तरी तो गोरा होणार नाही हे निश्चित. यासाठी उतावळेपणा नका. त्याचा फायदा नाही.
35पाची बोटे सारखी नसतातसर्व माणसे सारख्या स्वभावाची नसतात. प्रत्येकाचे वागणे व विचार निरनिराळे असतात.
36नाक धरले म्हणजे तोंड उघडतेकोणालाही पेचात पकडल्याशिवाय तो आपल्या म्हणण्यास सहसा कबूल होत नाही. नाक दाबले की त्याचे तोंड उघडले जाते व तो शेवटी सर्व मान्य करावयास तयार होतो. आपण नाकाने व तोंडानेही श्वासोच्छवास करतो.
37दिव्याखाली अंधारदिवा लोकांना प्रकाश दोतो पण त्याचेखाली अंधारच असतो! मोठा, प्रतिष्ठित, नामांकित, मनुष्य असला, तरी खुद्द त्याच्या अंगी काहीतरी दुर्गुण असतात. त्यांचा त्याला पत्ताच नसतो.
38दुरून डोंगर साजरेदुरून डोंगर सुंदर दिसतात. पण जवळ गेले असता त्याचे भयंकर स्वरूप कळून येते! त्यावर काटे, विविध प्राणी वगैरे असतात- ते आपणास त्रासच देतात.
39देश तसा वेशज्या मंडळीत आपण वावरता, राहतो. त्यांच्या चालीरिती आपण स्वीकारल्या पाहिजेत, न स्वीकारल्यास आपला उपहास होतो, टिंगलही होते.
40दृष्टी आड सृष्टीजे आपल्या देखत होणार नाही, त्याला आपण जबाबदार नसतो व त्याचा प्रतिकार करणेही फार कठीण आहे. मग काहीही होवो!
41दैव देते आणि कर्म नेतेदैव अनुकूल असल्यास, आपणांस एखादी चांगली वस्तू प्राप्त होते. परंतु कर्म अनुकूल नसल्यास, ती वस्तू आपणाजवळ टिकत नाही.
42दोन्ही घरचा पाहुणा उपाशीदोन गोष्टींच्या आधारे माणूस जर राहिला तर तो फशी पडतो. तो काहीच साधू शकत नाही. त्यामुळे त्याची फजिती होते.
4३तुरुत दान महापुण्यतुरूत म्हणजे त्वरित याच वेळी केलेले, योग्य वेळी केलेले दान. जेव्हाच्या तेव्हा दान करण्यात पुण्य आहे- मोठे पुण्य असते. योग्य वेळ निघून गेल्यावर जे दिले जाते ते फुकट असते.
4४टाकीचे घाव सोसल्यावाचून देवपण येत नाहीदगडावर टाकीचे घाव मारून मारून त्याच्यापासून देवाची मूर्ती घडविलेली असते. देवत्व प्राप्त होण्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात. त्याचप्रमाणे अपरंपरा कष्ट सोसल्यावर वैभवाची स्थिती प्राप्त होते.
4५चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचेजेव्हा सासू वैभवात असते तेव्हा ती सुनेवर अधिकार गाजवते. पुढे सून मोठी होऊन ती कर्ती सवरती झाली, म्हणजे घरात तिचा अधिकार चालतो आणि सासूचे महत्त्व कमी होते.
4६चोरावर मोरएका चारोला लुबाडणारा माणूस हा अधिक वरचढ आणि उत्तम चोर असला पाहिजे. म्हणून अशा प्रकाराला ‘चोरावर मोर’ असे म्हणतात.
4७चोराच्या हातची लंगोटीचोराने चोरी केल्यानंतर तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असतो. त्याचा पाठलाग करून, त्याला पकडून, त्याच्यापासून लंगोटी जरी हिसकावून घेतली तरी ती द्यावी, त्याला तसाच जाऊ देऊ नये, यातच आपले खरे कौशल्य आहे.
4८गर्वाचे घर खालीगर्वाने किंवा अभिमानाने कोणीही फुगून जाऊ नये- या अभिमानाचा परिणाम वाईटच होणार.
४९खाऊन माजावे, टाकून माजू नयेखूप अन्न खाल्ले म्हणजे माणसाला माज चढतो. आणि त्याची अन्नावरील वासना कमी होते आणि ते पुढे आल्यास तो ते टाकून देतो. यावरून अन्न खाऊन माजावे व अन्न टाकून माजू नये ही म्हण प्रचारात आली.

काय शिकलात?

आज आपण 50 (मराठी म्हणी अर्थासहित) Marathi Mhani With Meaning पाहिल्या आहे म्हणी म्हणजे अर्थाचा आणि सत्याचा खजिनाच असतो, पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

1 thought on “50 मराठी म्हणी | Marathi Mhani”

  1. Suupar but 1 mising words 50 onli for 49 ………………………………..t……………h……………a……………..n……….k…………..y………,….o…………u

    Reply

Leave a Comment