हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठीं गूरू वेबसाईट मध्ये आज आपण बघणार मराठी गोष्टी लहान मुलांसाठी । Marathi Story For Kids ते खालीलप्रमाणे.
01 गोष्टींचा खजिना | Marathi Story For Kids

गोष्टी ऐकण्याचा मोह सगळ्यांनाच होतो. गोष्टी ऐकताना खूपच मजा येते आणि कधी कधी तर गोष्ट ऐकताना आपण तहान, भूक आणि झोपसुद्धा विसरून जातो. गोष्टी सांगायला आणि ऐकायला कुणाला आवडत नाही? आतापर्यंत आपण किती तरी गोष्टी ऐकल्या आणि सांगितल्या असतील ना? त्या मोजता तरी येतील का?
गोष्टी किती तरी प्रकारच्या असतातझाडा-फुलांच्या, पशू-पक्षांच्या, राजा-राणीच्या, शूर वीरांच्या, जादूच्या, खूप पूर्वीच्या काळातल्या, आजी -आजोबांनी सांगितलेल्या, गमती जमतीच्या, नाही तर विचार करायला लावणा-या! या गोष्टी येतात तरी कुठून याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? मग चला तर आज आपण गोष्टीचीच गोष्ट ऐकूया.
एका गावात एक माणूस रहात होता. एक दिवशी त्याच्या मित्रानं त्याला एक गुपित सांगितलं. बरेच दिवस त्यानं हे गुपित कोणालाच सांगितलं नाही. मग त्याचे पोट रोज थोडे थोडे फुगू लागले. अखेर एक दिवस न राहवून त्याने ते गुपित आपल्या बायकोला सांगितलं. मग काय? त्याच्या बायकोचं पण पोट फुगू लागले.
तिला पण हे गुपित लपवून ठेवायला जमेना. मग बागेत जाऊन तिने एका खड्याला हे गुपित सांगितलं आणि वर माती टाकून तो खड्डा बुजवून टाकला. काही दिवसांनी त्या खड्डयातून आलं एक झाड. त्या लाकडाची कोणीतरी एक बासरी केली. बासरीने ते गुपित सगळ्या गावाला सांगितले. आता आफ्रिका देशातली आणखी एक गोष्ट ऐका.
खूप वर्षापूर्वी एक होता उंदीर. तो सगळीकडे बागडत असे. राजाच्या महालात, झोपडीत, घरात असा सगळीकडे फिरायचा. घराच्या भिंतीतल्या एका भोकात लपून तो सगळ्या गोष्टी ऐकत असे. त्या सगळ्या गोष्टी तो झाडाखालच्या एका खड्ड्यात लपवून ठेवत असे. त्याला या गोष्टी फारच आवडत असत.
उंदीर काय करतो ते एक कोल्हा लपून छपून बघत असे. एक दिवस कोल्याने तो खड्डा उकरायला सुरुवात केली. कोल्ह्याने जसा खड्डा उकरायला सुरुवात केली, तशा गोष्टी बाहेर येऊन सैरावैरा पळू लागल्या. त्या दिवसापासून आजपर्यंत या गोष्टी जगाच्या कानाकोप-यात सगळीकडे फिरताहेत. त्या तुमच्या आमच्याकडे सुद्धा आल्या आहेत. त्या थोड्याशा बदलून आपण त्या आपल्या मित्र-मैत्रिणीना सांगतो आणि मग त्या आणखी दूरवर पसरत जातात.
02 हत्ती आणि कुत्र्याची मैत्री | Marathi Story For Kids

खूप पूर्वीची गोष्ट आहे. काशीमध्ये ब्रह्मदत्त नावाचा एक राजा राज्य करत असे. त्याच्याकडे एक हत्ती होता. माहूत त्या हत्तीची प्रेमाने देखभाल करीत असे. माहूत रोज सकाळी हत्तीला आंघोळ घाली आणि मग त्याला खायला देई. माहुताचा कुत्रा पण रोज तिथे येत असे. हत्ती आणि कुत्रा रोज एकत्रच जेवायचे, थोड्याच दिवसांत हत्ती आणि कुत्र्याची छान दोस्ती जमली.
हत्ती नेहमी कुत्र्याची वाट पहायचा. कुत्रा आला नाही तर हत्ती काही खायचा नाही. कुत्रा पण हत्तीशी खूप खेळायचा. त्याच्या सोंडेवर चढून झोके घ्यायचा. एक दिवस माहुताला पैशाची फार गरज होती म्हणून त्यानं आपला कुत्रा विकून टाकला. कुत्र्याला खूप वाईट वाटलं, पण तो बिचारा काय करणार? मुकाट्याने आपल्या नव्या घरी निघून गेला.
आपला मित्र दिसत नाही म्हणून हत्तीला फार उदास वाटू लागलं. त्यानं खाणं-पिणं सोडून दिलं. आंघोळीलाही जाईना. दिवसभर नुसताच बसून राहू लागला हत्ती काही खात-पीत नसल्याची बातमी राजापर्यंत पोचली.
राजाने हत्तीची विचारपूस करायला आपल्या एका मंत्र्याला पाठवले. हत्ती नेहमी कुत्र्याची वाट पहायचा. कुत्रा आला नाही तर हत्ती काही खायचा नाही. कुत्रा पण हत्तीशी खूप खेळायचा. त्याच्या सोंडेवर चढून झोके घ्यायचा. एक दिवस माहुताला पैशाची फार गरज होती म्हणून त्यानं आपला कुत्रा विकून टाकला.
कुत्र्याला खूप वाईट वाटलं, पण तो बिचारा काय करणार? मुकाट्याने आपल्या नव्या घरी निघून गेला. आपला मित्र दिसत नाही म्हणून हत्तीला फार उदास वाटू लागलं. त्यानं खाणं-पिणं सोडून दिलं. आंघोळीलाही जाईना. दिवसभर नुसताच बसून राहू लागला हत्ती काही खात-पीत नसल्याची बातमी राजापर्यंत पोचली.
राजाने हत्तीची विचारपूस करायला आपल्या एका मंत्र्याला पाठवले. हत्तीजवळ जाऊन मंत्र्याने त्याची तपासणी केली. हत्तीला काहीच आजार नव्हता. मंत्र्याने विचार केला की याला नक्कीच कसली तरी काळजी लागली असणार. मंत्र्याने आसपासच्या लोकांकडेही चौकशी केली. लोकांनी सांगितलं की कुत्रा निघून गेल्यापासून त्या दुःखानेच हत्ती उदास आहे.
कुत्रा गेला त्या दिवसापासूनच त्याने खाणं-पिणं सोडले आहे. ही गोष्ट मंत्र्यानी राजाला सांगितली.राजाने लगेच ढोल वाजवून दवंडी पिटवली की ज्याच्याकडे माहुताचा कुत्रा असेल, त्याने त्याला लगेच सोडून द्यावं. ज्याने माहुताकडून कुत्रा विकत घेतला होता, त्याने पण हीदवंडी ऐकली. मग काय, राजाची आज्ञा ऐकल्याबरोबर त्याने कुत्र्याला बांधलेली दोरी कापून टाकली.
कुत्रा उड्या मारत, धावत पळत हत्तीकडे गेला. दोन्ही मित्र एकमेकांना पाहून अगदी खूष झाले. हत्तीने आपल्या सोंडेने कुत्र्याला उचललं आणि आपल्या डोक्यावरच बसवलं! त्याच्या डोळ्यातून आनंदाने अश्रू वाहू लागले. माहूत पळत पळत जाऊन हत्तीसाठी खाणं घेऊन आला. हत्तीने पहिल्यांदा कुत्र्याला भरवलं आणि मगच आपण खाल्लं.
03 नऊ की दहा | Marathi Story For Kids

एकदा एक व्यापारी आपले १० उंट घेउन वाळवंटातून प्रवास करत होता. तो एका उंटावर बसून पुढे जात होता, आणि बाकीचे नऊ उंट त्याच्या मागे मागे येत होते. जाता जाता व्यापा-याच्या मनात शंका आली की ‘बाकीचे सगळे उंट मागे येताहेत ना?’ त्याने मागे वळून पाहिलं आणि मोजायला सुरुवात केली, “एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ,नऊ… अरे, एक उंट कमी आहे.” व्यापारी लगेच खाली उतरला. आणि आपल्या हरवलेल्या उंटाला सगळीकडे शोधू लागला.
खूप शोधूनही उंट काही सापडेना. त्याला वाटलं, की आपली मोजताना काही तरी चूक झाली असेल. परत एकदा मोजून पाहूया. एक, दोन… असं कसं झालं? हे काय, सगळे उंट तर इथेच आहेत. आनंदाने व्यापारी परत उंटावर बसला आणि पुढे निघाला. थोड्या वेळाने त्याला परत एकदा शंका आली. मागे वळून उंट मोजले, तर ते नऊच होते.
व्यापारी गडबडीने खाली उतरला आणि हरवलेला उंट परत शोधू लागला. पण उंट कुठेच दिसेना. दमून भागून अखेर तो बाकीचे उंट उभे होते तिथे परत आला, परत एकदा उंट मोजले. ‘काय चमत्कार! दहाच्या दहा उंट इथेच उभे आहेत की। उन्हामुळे माझ्या डोक्यात काही तरी गोंधळ झालेला दिसतो’ असं स्वत:शीच पुटपुटत तो परत उंटावर बसला.
चौथ्यांदा मागे वळून त्याने परत एकदा उंट मोजले. ‘हे काय? परत नऊ उंट? दर वेळी एक उंट का कमी पडतोय? व्यापा-याला काहीच समजेना. खूप विचार करून त्यानं ठरवलं, ‘जेव्हा जेव्हा मी उंटावर बसतो, तेव्हा तेव्हा एक उंट हरवतो. आता मी त्यांच्याबरोबर चालतच जातो कसा.’
असा विचार करून व्यापारी कडक उन्हात उंटाना घेऊन चालतच निघाला. जादूची पेन्सिल 04 कासिमला चित्रं काढायला खूप आवडत असे. टोकदार दगड आणि काड्यांनी तो मऊ जमिनीवर चित्रं काढत बसायचा. पेन्सिल विकत घ्यायला त्याच्याकडे पैसे नव्हते. एकदा त्याच्या मनात विचार आला, ‘माझ्याकडे पेन्सिल असायला हवी होती.
मग मला किती छान छान चित्रं काढता आली असती।” तेवढ्यात त्याला एक म्हातारा भेटला. त्याने कासिमला एक पेन्सिल दिली. ‘या पेन्सिलीने काढलेली चित्रं फक्त गरीबांनाच दे.’ असं सांगून तो म्हातारा निघून गेला. कासिमला खूप आनंद झाला. त्यानं एक कोंबडीचं चित्र काढलं. आणि काय आश्चर्य!
एकदम त्या चित्राची खरीच कोंबडी झाली! मग त्याने एक मांजराचं चित्र काढलं.त्याचं पण खरंच मांजर झालं! अरे, ही तर जादूची पेन्सिल दिसते! मग कासीमने एक झेंडूच्या फुलाचं चित्र काढलं, ते ही खरंच फूल झालं! मग त्याने वही, भोवरा, सदरा, फुलं अशी निरनिराळी चित्रं काढली-ती सगळीच्या सगळी खरी झाली!
गरीबांनी जे काही मागितलं, त्या सगळ्याची कासीमने त्यांना चित्रं काढून दिली. लवकरच ही बातमी राजापर्यंत पोचली. राजाने कासिमला बोलावलं आणि त्याला सोन्याच्या नाण्यांनी गच्च भरलेलं झाड काढून द्यायची आज्ञा केली. “महाराज, आपल्याकडे तर पुष्कळ धन-संपत्ती आहे.
मी फक्त गरिबांसाठीच चित्र काढतो” असं म्हणून कासिमने चित्र काढायला नकार दिला. राजाला याचा फारच राग आला. त्याने नोकरांना आज्ञा केली, “याला तुरुंगात नेऊन टाका.” पण कासिम तुरुंगात स्वस्थ थोडाच बसणार होता? तो तर हुशारच होता. त्याने आपली जादूची पेन्सिल घेतली आणि किल्लीचं चित्र काढलं. वा! आता ती खरी किल्ली झाली. त्यानं किल्लीनं लगेच तुरुंगाचं कुलूप उघडलं आणि पळून गेला.
04 माकडं झाली माळी | Marathi Story For Kids

खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका राजाने आनंदाच्या प्रसंगी खूष होऊन आपल्या सगळ्या नोकरांना सुट्टी दिली. सर्वजण आनंदाने आपापल्या घरी निघून गेले. पण राजाच्या महालातला माळी मात्र गेला नाही. माळी विचारात पडला, ‘जर मी निघून गेलो तर बिचारी झाडं-झुडुपं वाळून जातील.
आता काय करावं? थोडा वेळ विचार करून तो बागेत राहणा-या माकडाकडे गेला. त्याने माकडाच्या टोळीच्या मुख्याला म्हटले, “तुम्ही सगळे बागेत आनंदात राहता. फळं, दाणे हवे तितके खाता. झाडांवर झोके घेता, उड्या मारता, खेळता. मग आज मला थोडी मदत कराल का?” मुख्य माकडाने लगेच म्हटले, “हो तर, नक्कीच करू की! काय करायचं सांग.”
माळ्यानं उत्तर दिलं, “तुम्ही सगळ्यानी मिळून इथल्या सगळ्या झाडांना पाणी घालायचं. संध्याकाळी उन्हें कमी झाल्यावर पाणी घाला.” माळ्यानं त्यांना परत एकदा सांगितलं, “नीट लक्ष ठेवा. जरूर तेवढंच पाणी घाला. उगाच जास्त नको.” मग तो निर्धास्त होउन आपल्या गावी गेला.
संध्याकाळ होताच सगळी माकडं उत्साहाने कामाला लागली. त्यांच्या प्रमुखानं त्यांना आठवण करून दिली, “प्रत्येक झाडाला योग्य तितकंच पाणी घाला.” एका माकडाने विचारलं, “पण प्रत्येक झाडाला किती पाणी हवंय आपल्याला कसं कळेल?” आता प्रमुखही विचारात पडला.
मग म्हणाला, “प्रत्येक झाडाची मुळं पहा. मूळ लांब असेल, तर जास्त पाणी घाला. आणि मूळ लहान असेल, तर कमी पाणी.” हे ऐकून माकडानी एक एक करत सगळ्या झाडांची मुळं तपासली आणि मगच पाणी घातलं. दुस-या दिवशी माळी कामावर परत आला, तर काय…अरे बापरे…सगळी झाडं जमिनीवर पडलेली। ज्याचं काम त्यानंच करावं, दुस-यानं केलं तर सत्यानाशा!
05 अर्धं तुझं, अर्धं माझं | Marathi Story For Kids

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका शेतक-याला भुईमुगाचं पीक घ्यायचं होतं. जंगलाजवळची जमीन रिकामीच पडलेली होती. शेतक-यानं जमीन नांगरली, बी पेरलं आणि पिकाची वाट पाहू लागला. दूर उभे राहून एक अस्वल रोज त्याच्याकडे पहात असे. एक दिवस अस्वल त्याच्याजवळ आलं आणि त्याला धमकी देउन म्हणालं, “ए शेतक-या, मी तुला खाऊन टाकेन.”
शेतकरी तर भीतीने कापायलाच लागला. मग धीर करून तो म्हणाला, “अस्वलदादा, मला खाऊ नकोस रे। एकदा भुईमुगाच्या शेंगांचं पीक आलं ना, की आपण दोघे ते अर्ध अर्ध वाटून घेऊया. मुळाकडचा भाग मी घेईन आणि जमिनीवरचा भाग तू घे.” अस्वलाला शेतक-याचं म्हणणं पसंत पडलं.
शेतक-याने शेतात खूप कष्ट केले. भुईमुगाचं पीक खूप छान आलं. आता पीक कापण्याचा दिवस उगवला. अस्वलही आपला हिस्सा मागायला आलं. अगोदर ठरल्याप्रमाणे शेतक-याने जमिनीच्या वरचा भाग अस्वलाला दिला. मग आपल्या हिश्याचा मुळाकडचा भाग गाडीत भरून तो निघाला. “थांब!” अस्वल जोरात ओरडलं. “मला मुळाकडचा भाग चाखून बघायचा आहे.”
अस्वलानं मुळाकडचा काही भाग खाऊन पहिला. रागाने तो जोरातच ओरडला, “तू मला फसवलं आहेस. मुळाच्या बाजूलाच छान चव आहे. फांद्या आणि पानांना काहीच चव नाही. आता परत कधीही या बाजूला येऊ नकोस.” शेतक-याने अस्वलाची समजूत काढत म्हटलं, “रागावू नकोसरे अस्वलादादा! पुढच्या वेळेस तू मुळाकडची बाजू घे, मी फांदीची बाजू घेईन.
मग तर झालं?” पुढल्या वेळेस शेतक-याने त्याच जागी मक्याचं पीक घेतलं. या वेळी देखील भरघोस पीक आलं. मग कापणीचा दिवस आला. अस्वल आपला हिस्सा मागायला आलं. शेतक-याने मुळाकडची बाजू अस्वलाला दिली आणि कणसं गाडीत भरून घाईघाईने निघून गेला.
अस्वलाने मूळ खाऊन पाहिलं. “शी! शी! याला तर काहीच चव नाही. असं होय! म्हणजे शेतक-यानं मला परत एकदा फसवलंय तर! आता येऊ दे त्याला, म्हणजे चांगला धडा शिकवतो.” रागावून अस्वल शेतक-याची वाट पहात बसलं. पण शेतकरी थोडाच आता परत येणार होता!
06 घर बदला बघू | Marathi Story For Kids

एका गावात धनीराम नावाचा एक श्रीमंत माणूस रहात होता. त्याच्या घराच्या डाव्या बाजूला एक लोहाराचं घर होतं आणि उजव्या बाजूला रहात होता एक सुतार दिवसभर लोहाराच्या घरातून येणारा घणाचा आवाज ऐकून धनीरामचे कान किटून जायचे. दुस-या बाजूने सुताराच्या घरातून लाकूड कापण्याचा आवाज.
धनीरामला याचा फारच त्रास व्हायचा. आवाजाने त्याला काहीच सुचायचं नाही आणि धड झोपही यायची नाही. “काय बरं करावं?” धनीरामने बरेच दिवस विचार केला. मग एक दिवस त्याने लोहाराला आणि सुताराला बोलावलं आणि सांगितलं, “तुमच्या घरातून इतका आवाज येतो, की मला झोप सुद्धा येत नाही.
तुम्ही दोघांनी आपली घरं बदला पाहू. त्याच्या बदल्यात मी तुम्हाला हवे तेवढे पैसे देईन.” “ठीक आहे, आम्ही तसेच करू” असं म्हणून दोघेही तिथून निघून गेले. थोड्याच वेळात त्यांनी आपलं सामान गाडीत भरलं. त्यांना तिथून निघालेले पाहून धनीराम अगदी खूष झाला. “बरं झालं! दोघांनी घरं रिकामी केली!
आता तरी मला चांगली झोप घेता येईल असा विचार करून तो झोपायला गेला. दुस-या दिवशी सकाळी धनीरामच्या घराच्या डावीकडून आणि उजवीकडून परत तसेच आवाज यायला लागले. धनीरामला काहीच समजेना. त्याने आपल्या नोकराला काय चाललंय ते बघायला पाठवलं. परत येऊन नोकराने सांगितलं, “साहेब, दोघांनीही आपापली घरं बदलली आहेत. लोहाराच्या घरात आता सुतार राहतोय आणि सुताराच्या घरात लोहार!”
07 माकडाचं पिल्लू फळं खातं | Marathi Story For Kids

एक दिवस माकडाचं पिल्लू एका कलिंगडाच्या शेतात गेलं. त्यानं पहिल्यांदाच कलिंगड पाहिलं होतं. एक कलिंगड तोडून ते त्याचं जाड साल खाऊ लागलं. खूप प्रयत्न करून जेमतेम दोन घास खाल्यावर त्यानं ते फेकून दिलं आणि म्हणाला, “शी! कलिंगडाची चव काहीतरीच आहे.”
जवळच एक वासरू उभं होतं, ते म्हणालं, “कलिंगडाचा गर खातात, साल नाही काही.” वासराचं म्हणणं पूर्णपणे न ऐकताच पिल्लू पळायला लागलं आणि म्हणालं, “गर खायचा असतो, हे काय मला माहित नाही का?” मग पिल्लू एका खरबुजाच्या शेतात गेलं. त्यानं एक खरबूज तोडलं, आणि त्याच्या बिया खाऊ लागला.
गाढवाचं एक पिल्लू त्याच्याजवळ आलं, आणि म्हणालं, “अरे बाबा, सालीच्या आत जो मऊगर असतो ना, तो खायचा असतो. बिया नाही.” माकडानं तोंडातला घास थुकून टाकला आणि म्हणाला, “ते तर मला आधीपासूनच माहित होतं.” मग माकडाचं पिल्लू बदामाच्या झाडावर चढलं.
त्यानं एक बदाम तोडला आणि खायला लागला. तेवढ्यात एक नीलकंठ पक्षी उडत उडत तिथे आला आणि म्हणाला, “अरे, बदामाचा बाहेरचा भाग नसतो खायचा…” छोट्या माकडानं त्याचं म्हणणं अर्ध्यावर तोडलं आणि म्हणाला, “मला सगळं माहित आहे.” त्यानं बदामाच्या आतल्या कवचात दात घुसवला. “आई आई गं! माझा दातच पडला!” आणि माकडानं झाडावरून एकदम खाली उडीच मारली.
नीलकंठानं त्याला परत समजावलं, “अरे, बदामाचं आतलं कवच नसतं खायचं, त्याच्या आतली बी खायची असते.” मग छोटं माकड एका नाशपतीच्या झाडावर चढलं. एक नाशपती तोडली आणि फांदीवर आपटून आपटून तिचा लगदा केला आणि मग त्यातली बी खाऊ लागला. “छी। छी! किती कडू आहे!” नीलकंठ परत त्याच्याकडे उडत आला आणि विचारलं, “कशी आहे चव?” माकडाच्या पिल्लाला आता तर फारच राग आला होता. त्यानं नाशपती नीलकंठाकडे फेकली आणि ओरडला, “मी आता कधीच फळं खाणार नाही.”
08 उंट आणि कोल्हा | Marathi Story For Kids

“उंटदादा, त्या नदीच्या पलीकडल्या शेताकडे पहा तरी! तिथे किती छान काकड्या आल्या आहेत. आपण आज तिकडे जाऊया का?” कोल्यानं आतुरतेनं विचारलं. उंट म्हणाला, “हो जाऊया की!” उंटानं कोल्ह्याला आपल्या पाठीवर बसवलं. दोघं नदी ओलांडून काकडीच्या शेतात घुसले आणि आनंदानं काकड्या खाऊ लागले.
काकड्या फारच चविष्ट होत्या. कोल्याचं पोट तर लहानच होतं. दोन-चार काकड्या खाल्यावर त्याचं पोट भरलं. पोट भरल्यावर तो आनंदानं इकडे तिकडे उड्या मारत फिरू लागला. उंट आपला काकड्या खाण्यातच रमला होता. “उंटदादा, तुझं अजून खाऊन झालं नाही का?” कोल्हा त्याला सारखा सारखा विचारू लागला.
उंटानं उत्तर दिलं, “माझं पोट मोलाठं आहे ना? अजून अर्ध देखील भरलं नाही. थोडा वेळ गप्प बस आणि मला जरा आरामात खाऊदे बघू!” पण कोल्ह्याला कुठला धीर निघायला! “पोट भरलं की म गप्प बसताच येत नाही.” असं म्हणून कोल्हा आकाशाकडे तोंड करून “Isssss ऊऽऽsss” असा आवाज काढायला लागला.
कोल्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या गावातले लोक काठ्या घेऊन धावतच आले. ते पाहून कोल्हा पळत सुटला आणि नदीकिनारी जाऊन थांबला. बिचारा उंट! त्याला काही पळता आलं नाही आणि तो गावक-यांच्या हातात सापडला. गावक-यांनी त्याला चांगला चोप दिला. मग उंट बिचारा रडत खडत नदीकिनारी पोचला.
कोल्यानं वाईट वाटल्याचं नाटक करत म्हटलं, “अरेरे! किती मारलं रे तुला! मला बघूनच किती वाईट वाटतंय.” उंट म्हणाला, “बरं, ते जाऊदे रे! आता लवकर माझ्या पाठीवर बस. आपण इथून निघूनच जाऊया.” दोघे नदीच्या मध्यावर येऊन पोचले. उंट अचानक थांबला आणि आपली कंबर हलवत डावीकडे-उजवीकडे डोलू लागला.
कोल्ह्यानं घाबरून विचारलं, “अरे दादा, असा का डोलतोयस? अशानं मी नदीत पडेन ना।” उंट म्हणाला, “पोटभर जेवण झालं की अशी नदीत डोलायची मला सवयच आहे. मी तरी काय करू?” असं म्हणून उंट नदीत आणखीच जोरात डोलू घेऊ लागला. बिचारा कोल्हा मात्र आता नदीत पडला!
09 पक्षी कोणाचा | Marathi Story For Kids

सकाळची वेळ होती. बागेत खूप रंगीबेरंगी फुलं उमलली होती. पक्षी किलबिल करत होते. राजकुमार सिद्धार्थ बागेत फेरफटका मारत होता. अचानक एका पक्षाची किंकाळी त्याच्या कानावर आली. सगळे पक्षी घाबरून इकडे-तिकडे उडायला लागले. हे पाहून सिद्धार्थ विचारात पडला, ‘या सगळया पक्षांना अचानक काय झालं?’
तेवढ्यात त्याच्या पायाजवळ एक हंस येऊन पडला. त्याला एक बाण लागला होता आणि दुःखाने तो विव्हळत होता. सिद्धार्थाने हंसाला अलगद उचलून घेतलं. त्याच्या शरीरात घुसलेला बाण हलक्या हाताने काळजीपूर्वक बाहेर काढला. त्याच्या जखमेवर मलम लावलं आणि प्रेमाने त्याला मांडीवर घेऊन जोजवू लागला.
तेव्हा कुठे भीतीनं कापणारा हंस थोडा शांत झाला. थोड्याच वेळात सिद्धार्थचा भाऊ देवदत्त पळत पळत तिथे आला आणि म्हणाला, “पक्षी मला दे, तो माझा आहे.” सिद्धार्थ म्हणाला, “पक्षी माझा आहे. मी त्याला वाचवलं आहे.” असं म्हणून पक्ष्याला अलगद हातात घेउन तो राजमहालाकडे जाऊ लागला.
देवदत्तही त्याच्या पाठोपाठ निघाला. दोघेही राजाकडे गेले. देवदत्ताने राजाकडे तक्रार केली, “सिद्धार्थ माझा पक्षी मला देत नाही.” सिद्धार्थ म्हणाला, “पिताश्री, देवदत्तानं बाण मारून पक्ष्याला जखमी केलं. पण मी त्याचा जीव वाचवला आहे, म्हणून हा पक्षी माझा आहे.
देवदत्त म्हणाला, “नाही पिताश्री, हा पक्षी मला सर्वात प्रथम दिसला, म्हणून तो माझा आहे.” राजा थोडा वेळ विचारात पडला. मग त्याने आपला निर्णय सांगितला, “देवदत्त, तुला पक्ष्याला मारायचं होतं, पण सिद्धार्थनं तर त्याला वाचवलं आहे. मारणा-या पेक्षा वाचवणारा अधिक श्रेष्ठ असतो, म्हणून हा पक्षी सिद्धार्थचाच आहे.”
10 जादूची पेन्सिल | Marathi Story For Kids

कासिमला चित्रं काढायला खूप आवडत असे. टोकदार दगड आणि काइयांनी तो मऊ जमिनीवर चित्र काढत बसायचा. पेन्सिल विकत घ्यायला त्याच्याकडे पैसे नव्हते. एकदा त्याच्या मनात विचार आला, ‘माझ्याकडे पेन्सिल असायला हवी होती.
मग मला किती छान छान चित्रं काढता आली असती!’ तेवढ्यात त्याला एक म्हातारा भेटला. त्याने कासिमला एक पेन्सिल दिली. या पेन्सिलीने काढलेली चित्रं फक्त गरीबांनाच दे.’ असं सांगून तो म्हातारा निघून गेला.
कासिमला खूप आनंद झाला. त्यानं एक कोंबडीचं चित्र काढलं. आणि काय आश्चर्य! एकदम त्या चित्राची खरीच कोंबडी झाली! मग त्याने एक मांजराचं चित्र काढलं.त्याचं पण खरंच मांजर झालं! अरे, ही तर जादूची पेन्सिल दिसते! मग कासीमने एक झेंडूच्या फुलाचं चित्र काढलं, ते ही खरंच फूल झालं। मग त्याने वही, भोवरा, सदरा, फुलं अशी निरनिराळी चित्रं काढली-ती सगळीच्या सगळी खरी झाली!
गरीबांनी जे काही मागितलं, त्या सगळ्याची कासीमने त्यांना चित्रं काढून दिली. लवकरच ही बातमी राजापर्यंत पोचली. राजाने कासिमला बोलावलं आणि त्याला सोन्याच्या नाण्यांनी गच्च भरलेलं झाड काढून द्यायची आज्ञा केली. “महाराज, आपल्याकडे तर पुष्कळ धन-संपत्ती आहे.
मी फक्त गरिबांसाठीच चित्र काढतो” असं म्हणून कासिमने चित्र काढायला नकार दिला. राजाला याचा फारच राग आला. त्याने नोकरांना आज्ञा केली, “याल तुरुंगात नेऊन टाका.” पण कासिम तुरुंगात स्वस्थ थोडाच बसणार होता? तो तर हुशारच होता. त्याने आपली जादूची पेन्सिल घेतली आणि किल्लीचं चित्र काढलं. वा! आता ती खरी किल्ली झाली. त्यानं किल्लीनं लगेच तुरुंगाचं कुलूप उघडलं आणि पळून गेला.
काय शिकलात?
आज आपण मराठी गोष्टी लहान मुलांसाठी । Marathi Story For Kids पाहिले आहे. गोष्टी वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.