श्री नृसिंह जयंती माहिती, इतिहास मराठी । Narsingh Jayanti Information in Marathi

हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला श्री नृसिंह जयंती माहिती, इतिहास मराठी । Narsingh Jayanti Information in Marathi सांगणार आहे तर चला बघुयात.

श्री नृसिंह जयंती माहिती, इतिहास मराठी । Narsingh Jayanti Information in Marathi

आणखी वाचा – अक्षय्य तृतीया

नृसिंह जयंती मराठी । Narsingh Jayanti Information in Marathi

वैशाख शुद्ध चतुर्दशी या दिवशी श्री नृसिंह जयंती असते. हिरण्यकशिपू या दैत्याला ठार मारण्यासाठी भगवान विष्णूने वैशाख शुद्ध चतुर्दशी या दिवशी संध्याकाळी नारसिंह अवतार धारण केला. ज्यांचे कुलदैवत श्री नृसिंह आहे ते लोक या दिवशी उपवास करून संध्याकाळी श्री नृसिंहाची पूजा करतात. काहींच्या घरी वैशाख शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा या काळात श्री नृसिंह नवरात्र असते. पौर्णिमेलाच त्याचे पारणे करतात. कथा सत्ययुगातला आह. महषा कश्यपाला दिता नावाची पत्नी होती.

तिला हिरण्यकशिपू व हिरण्याक्ष असे दोन पुत्र झाले. दोघेही दैत्यच. देवांचे वैरी. श्री विष्णूंनी वराह अवतार धारण करून हिरण्याक्षाला ठार मारले. आपल्या भावाच्या वधामुळे हिरण्यकशिपू अत्यंत क्रुद्ध झाला. श्री विष्णूचा तो सतत द्वेष करीत असे. आपल्या भावाच्या वधाचा सूड घेण्याचा निश्चय त्याने केला. त्याने सगळ्या दैत्यांना पृथ्वीवर अनाचार करण्याची आज्ञा केली व तो स्वतः अमरत्व मिळविण्यासाठी महेंद्र पर्वतावर तपश्चर्या करण्यासाठी गेला. ही संधी साधून इंद्रादी देवांनी दैत्यांवर हल्ला केला. घाबरलेले दैत्य रसातळात पळून गेले. दैत्यकुळाचा निर्वंश करावा या विचाराने इंद्राने हिरण्यकशिपूची पत्नी कयाधू हिला ठार मारण्याचे ठरविले.

तेव्हा नारदमुनी इंद्राला म्हणाले, तू हिला ठार मारण्याचे पाप करू नकोस. ही गर्भवती आहे. हिच्या पोटी भगवान श्री हरीचा एक महान भक्त जन्मास येणार आहे. मग नारदांनी कयाधला आपल्या आश्रमात नेले व तिच्या गर्भातील बालकाला उद्देशन तिला तत्त्वज्ञानाचा उपदेश केला. भागवत कथा सांगितली. श्रीहरीच्या लीला वर्णन करून सांगितल्या. तिकडे महेंद्र पर्वतावर हिरण्यकशिपूची कठोर तपश्चर्या पाहून ब्रह्मदेव प्रसन झाले. ते हिरण्यकशिपूजवळ जाऊन त्याला म्हणाले “बाळा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे.

तुला हवा असेल तो वर मागून घे.” हिरण्यकशिपू म्हणाला “प्रभो, मला अमरत्व प्राप्त होईल असा वर द्या!” ब्रह्मदेव त्याला समजावीत म्हणाले “हे भक्तोत्तमा, हे होणे शक्य नाही. जो या जगात जन्मास आला त्याला मृत्यू आहेच. हा सृष्टीचा नियम आहे. तेव्हा तू दुसरा एखादा वर माग.” हिरण्यकशिपू म्हणाला – “प्रभो, तुम्ही दानशूर आहात. तुम्ही मला असा वर द्या की मला मनुष्य, देव, दैत्य किंवा सादी प्राणी, त्याचप्रमाणे तुम्ही निर्माण केलेला कोणताही प्राणी यापासून मरण येऊ नये. दिवसा, रात्री, घरात, घराबाहेर, शस्त्राने, अस्त्राने, पृथ्वीव.

पाताळात किंवा आकाशात मला मरण येऊ नये.” हिरण्यकशिपूने मोठ्या चातुर्याने हा वर मागितला आहे, हे ब्रह्मदेवाच्या लक्षात आले. परंतु त्यांनी त्याला तसा वर दिला. ब्रह्मदेवाकडून वर मिळताच हिरण्यकशिपू उन्मत्त झाला. तो आपल्या राजधानीत परत आला. त्याने सर्व दैत्यांना पाताळात परत बोलाविले. अत्यंत क्रुद्ध झालेल्या त्या दैत्याने अवघ्या त्रैलोक्याला अगदी त्राही भगवान् करून सोडले. याच वेळी त्याची पत्नी कयाधू प्रसूत झाली.

तिच्या पोटी एक परम भगवद्भक्त जन्मास आला. तो प्रल्हाद या नावाने प्रसिद्ध झाला. प्रल्हादाचे मोठमोठ्या आचार्यांकडे शिक्षण सुरू झाले. पण प्रल्हाद सदैव श्रीहरीचेच भजन म्हणत असे. आपल्या भावांना-मित्रांना तो भगवान विष्णूची भक्ती करण्यास शिकवीत असे. श्री नारायण नारायण हरी! ही! भवसागर हा पार करी असे भजन करीत तो आनंदाने नाचत असे. एके दिवशी हिरण्यकशिपूने प्रल्हादाला विचारले “बाळा, तू गुरुगृही काय-काय शिकलास?” तेव्हा प्रल्हादाने भगवान श्रीहरीचे माहाम्य वर्णन करीत तो भगवान विष्णू सर्वशक्तिमान, सर्वव्यापक कसा आहे ते सांगितले. हे ऐकताच हिरण्यकशिपूच्या तळपायाची आग मस्तकाला गेली.

डोळे रागाने लालेलाल झाले. तो प्रल्हादावर ओरडून म्हणाला, “खबरदार पुन्हा त्या नारायणाचे नाव घेशील तर! तुला ठार मारून टाकीन!” प्रल्हादावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्याने नारायण, नारायण, हरिनारायण हे भजन चालूच ठेवले. भगवान विष्णूशी वैर असलेल्या हिरण्यकशिपूने प्रल्हादाला ठार मारण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला; पण देव तारी त्याला कोण मारी! प्रत्येक वेळी प्रल्हाद सुखरूप राहत होता. हिरण्यकशिपूने दरडावून विचारले- “अरे दुष्ट पोरट्या, तुझा तो हरी कुठे आहे सांग! आज तुझे रक्षण तो कसे करतो तेच पाहतो.” प्रल्हाद म्हणाला- जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सगळीकडे तो श्रीहरी भरून राहिला आहे.

हिरण्यकशिपूने प्रल्हादाला एका खांबाला बांधले व विचारले “या खांबात आहे का?” “होय, या खांबातही तो श्रीहरी आहे,” असे प्रल्हादाने सांगताच हिरण्यकशिपूने अत्यंत क्रोधाने त्या खांबावर तलवारीचा घाव घातला. त्या खांबाला जोरात लाथ मारली. त्याच क्षणी कानठळ्या बसविणारा प्रचंड कडकडाट झाला. पृथ्वी डळमळू लागली. अत्यंत उग्र, भीतिदायक रूप धारण केलेला भगवान नृसिंह त्या खांबातून प्रकट झाला. त्याचे मुख सिंहाचे होते व बाकीचे शरीर माणसाचे होते. त्याच्या तोंडातून अग्निज्वाळा बाहेर पडत होत्या.

हिरण्यकशिपू हातात गदा घेऊन नृसिंहाला मारण्यासाठी धावला. त्याच क्षणी नृसिंहाने हिरण्यकशिपूला पकडून आपल्या मांडीवर घेतले व आपल्या तीक्ष्ण नखांनी त्याचे पोट फाडले. हिरण्यकशिपू तडफडून मेला. त्या वेळी सूर्य अर्धाच अस्ताला गेला होता. त्या वेळी देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली. प्रल्हादाने नृसिंहाचे स्तवन केले. प्रल्हादाला नारायणभक्तीचा उपदेश करून भगवान श्री नृसिंह अदृश्य झाले. ही घटना वैशाख शुद्ध चतुर्दशी, सूर्यास्त होत असताना झाली. याचे स्मरण म्हणून या दिवशी श्री नृसिंह जयंती साजरी केली जाते.

काय शिकलात?

आज आपण श्री नृसिंह जयंती माहिती, इतिहास मराठी । Narsingh Jayanti Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment