रंगीत करकोचा बद्दल माहिती मराठीत – Painted Stork Information in Marathi

हॅलो वाचकांनो.. आज मी तुम्हाला रंगीत करकोचा – Painted Stork Information in Marathi देणार आहे. तर चला बघुयात.

रंगीत करकोचा - Painted Stork Information in Marathi
१.मराठी नाव :रंगीत करकोचा, चित्रबलाक, चामढोक.
२.इंग्रजी नाव :Painted Stork (पेंटेड स्टॉर्क)
३.वजन :३.२ किलो ग्राम.
४.आकार :९३ सेंमी.

माहिती – Painted Stork Information in Marathi

साधारण गिधाडाच्या आकाराचा हा एक पाणपक्षी आहे. तुम्हाला कावळा आणि करकोच्याची गोष्ट माहितीये नं? त्या गोष्टीतला करकोचा तो हाच. या करकोच्याची चोच चांगली लांबलचक आणि वजनदार असते.

नद्या, तलाव, आणि पाणथळ जागी करकोचे दिसतात. हा पक्षी वर्षभर भारतातच राहणार आहे. करकोचाचे पाय काटकुळे आणि मान लांब असल्यामुळे उथळ पाण्यात उतरून त्याला मासे, बेडूक किंवा पाणसाप हे त्याचं खाद्य शोधणं सोपं जातं.

हा पक्षी जेव्हा आराम करत असतो तेव्हा कुबड काढून दोन पायांवर उभा असतो. पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यात रंगीत करकोच्यांची एक वसाहत आहे.

वसाहत म्हणजे आपल्या भाषेत मंडळच म्हणा ना! या मंडळात सुमारे १५ ते २० करकोचे आहेत. हे करकोचे पावसाळ्यात इंदापुरातल्या चिंचांच्या झाडांवर काड्याकाटक्या गोळा करून घरटी करतात. या मोठ्या आकाराच्या पक्ष्याचं घरटंही असंच भलं मोठं असतं.

करकोच्याला त्याचे सुपासारखे पंख सावरून काड्यांसारख्या पायांवर झाडावर उतरता यावं म्हणून तो झाडाच्या शेंड्यावर घरटं करतो. आहे किनई आयडिया! हा करकोचा नद्या, भातखाचरं, दलदली प्रदेशात आणि तलावांचे काठ या ठिकाणी आढळतो.

पांढरी शुभ्र मान, काळं डोकं आणि काळ्या शरीराचा हा करकोचा कौरव म्हणूनही ओळखला जातो. रंगीत करकोचा रंगीत करकोच्याच्या घरट्यात साधारण ऑक्टोबर महिन्यात पिल्लं दिसायला लागतात.

हा करकोचा आपल्या पिल्लांना चोचीनं भरवत नाही. तो मासे, बेडूक, खेकडे, साप असं खाद्य गोळा करून जठराच्या वरच्या भागात साठवतो. या भागाला शास्त्रीय परिभाषेत अन्नसंचयी (crop) म्हणतात.

अन्नसंचयीमध्ये खाद्य साठवून करकोचा उडत उडत घरट्याकडे येतो आणि लाळेत लडबडलेलं खाद्य उलटवून घरट्यात टाकतो. अर्धवट पचलेला घास पिल्लांना पचायला सोपा असतो. घरट्यात पडलेलं खाद्य पिल्लं आपल्या चोचीत धरून भराभर गिळतात.

जे पिल्लू सर्वात आधी जन्माला आलेलं असतं, ते इतरांवर कुरघोडी करतं. पंखांनी त्यांना दाबून, वेळप्रसंगी चोच मारून स्वतः जास्तीत जास्त खातं. पिल्लांना भरवण्याच्या या पद्धतीमुळे करकोच्याचे कष्ट वाचतात.

कल्पना करा की प्रत्येक वेळेस पाणथळीत किंवा तलावावर जाऊन एकेक मासा पकडायचा आणि पुन्हा घरट्याकडे उडत यायचं म्हणजे बिचारा करकोचा किती थकून जाईल. जसजशी पिल्लं मोठी होतात तसतसं त्यांना जास्त खायला लागतं. म्हणजेच करकोच्याला जास्त कष्ट करावे लागतात.

कधी कधी मासे किंवा खाद्य गोळा करण्यासाठी करकोचे त्यांच्या घरटी असलेल्या जागेपासून किती लांबवर उडत जातात माहिती आहे? ३० ते ४० किलोमीटर !

काय शिकलात?

आज मी तुम्हाला रंगीत करकोचा – Painted Stork Information in Marathi दिली आहे. पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

गाय बगळा बद्दल माहिती मराठीत – Cattle Egret Information in Marathi

Leave a Comment