पावन खिंडीतील रणसंग्राम

शिवाजी महाराज पन्हाळगडावर सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकले होते. तीन महिने झाले. आषाढ सुरू झाला. धुवाधार पाऊस सुरू झाला, पण वेढा जराही सैल होण्याचे लक्षण दिसेना. जौहरने वेढा अधिकच बळकट केला. मुंगीला सुद्धा आत बाहेर जाता येत नव्हते. शिवाजी महाराज मोठ्या काळजीत पडले. त्यांना वेढ्यातून बाहेर पडायचे होते. पण कसे? जौहरशी प्रत्यक्ष युद्ध करणे शक्य नव्हते, कारण जौहरची ताकद फार मोठी होती. आता काय करावे? याचा महाराज विचार करू लागले आणि सुचला… महाराजांना उपाय सुचला! उपाय भयंकर होता. प्रसंगी जिवावर बेतणारा होता. महाराजांनी ठरविले.

शत्रूच्या वेढ्यातून बाहेर पडायचे, पळून जायचे. महाराजांनी पलायनाची सगळी योजना मनाशी पक्की केली व बाजीप्रभू देशपांडे इत्यादी खासे खासे सहकाऱ्यांना एकांतात आपला बेत सांगितला. महाराजांचे हेर अंधाऱ्या रात्री काळे कपडे घालून गुपचूप गडाखाली उतरले. ज्या बाजूला शत्रूचा वेढा नव्हता, जेथे कुणाचीही जा-ये नव्हती अशी एक अडचणीची वाट शोधून काढली. मग महाराजांनी सिद्दी जौहरला बेमालूम थापांचे एक पत्र पाठविले, ‘खरे म्हणजे आम्ही यापूर्वीच आपणास शरण येऊन, आपली कृपा संपादन करून संकटमुक्त व्हावयास हवे होते; पण आम्ही आपणास विनाकारण त्रास दिला याबद्दल क्षमा असावी.

आता आपण आमच्या सरक्षिततेची हमी देत असाल, तर उद्याच रात्री आम्ही आमच्या निवडक सहकाऱ्यांसह आपणास शरण येऊन आपल्या सेवेस रुज होऊगड आपल्या ताब्यात देऊ व आपल्याबरोबर विजापूर दरबारी येऊन खाविंदांची इमाने इतबारे जन्मभर सेवाचाकरी करू. माझ्या हातून झालेल्या अपराधांची मला क्षमा करावी. मी माझी सर्व दामदौलत हजरत बादशहाच्या नावाने आपल्या ताब्यात देण्यास तयार आहे.’ पत्र वाचून जौहर खूश झाला. उद्या रात्री शिवाजी शरण येतो आहे या कल्पनेने स्वतः जौहर व वेढ्यातील सैनिक बेसावध राहिले. शिवाजी महाराजांनी याचा पूर्ण फायदा उठविला. महाराज एका पालखीत बसले. सहाशे मावळे पालखी घेऊन अगदी गुपचूप गडावरून खाली उतरले व वेढ्यातून बाहेर पडले. त्या दिवशी आषाढ पौर्णिमा होती, पण आकाश ढगांनी भरल्याने काळाकुट्ट अंधार होता.

तशा अंधारातच सर्व जण वेढ्यातून बाहेर पडले व विशाळगडाच्या रोखाने धावत सुटले. त्यांना लवकरात लवकर विशाळगड गाठायचा होता. शिवाजी महाराजांची पालखी घेऊन मावळे अत्यंत वेगाने धावत होते, परंतु ‘घात झाला. शिवाजी लष्कराच्या वेढ्यातून निसटला व पळून गेला.’ हे जौहरला हेरांकडून समजताच मसूद प्रचंड फौज घेऊन शिवाजीचा पाठलाग करू लागला. शत्रू पाठलाग करीत येणार याची महाराजांना कल्पना होतीच. शत्रू जवळ येण्याच्या आत महाराजांना विशाळगडावर जायचे होते आणि उजाडता उजाडता महाराज मावळ्यांसह गजापूरच्या खिंडीशी आले. सर्व जण एकवीस तास धावत होते. सर्व जण खूप दमले होते. ऐवढ्यात मसूद सैन्यासह जवळ येत असलेला दिसू लागला.

बाजीप्रभूना पुढे काय घडणार याची कल्पना आली. ते महाराजांना म्हणाले, “महाराज, माझी आपणास विनंती आहे. नव्हे, आज्ञा आहे असे समजा फार तर. आपण ताबडतोब विशाळगडाची वाट धरा. आपला जीव फार मोलाचा आहे. तुम्ही आमचा विचार करू नका. या बाजीसारखे लोक अधुनमधून जन्मास येत असतात, पण आपल्यासारखे पुरुषोत्तम युगायुगांत एकदाच जन्मास येतात. या महाराष्ट्राला, या देशाला आपली फार फार गरज आहे. आमच्यासारखे लाख मेले, तरी चालेल; पण आपल्यासारखा स्वराज्य संस्थापक युगपुरुष वाचला पाहिजे. महाराज, आपणांस मायभवानीची शपथ आहे. आपण क्षणभरही येथे थांबू नका. शत्रू फार मोठा आहे, पण मी आणि माझा भाऊ फुलाजी या खिंडीत शत्रूला रोखून धरतो. आपण गडावर सुखरूप पोहोचताच तोफांचे आवाज द्या.

तोफांचे आवाज कानावर आल्याशिवाय हा बाजी शत्रूला एक पाऊलही पुढे सरकू देणार नाही. चला! ताबडतोब येथून निघा!” बाजीप्रभूचा आग्रह महाराजांना मोडवेना. ते तीनशे मावळ्यांसह विशाळगडाच्या रोखाने वेगात धावत निघाले. इकडे तीनशे मावळ्यांसह बाजीप्रभू खिंडीच्या तोंडाशी शत्रूचा समाचार घेण्यासाठी निर्धाराने उभे राहिले. इतक्यात शत्रूची पहिली फौज खिंडीवर आदळली. बाजीप्रभू सज्जच होते शत्रूचा समाचार घ्यायला….आणि एकच रणकंदन सुरू झाले. मसूदची फौज पुढे सरकू लागली… बाजीप्रभू तिला पुढे सरकू देत नव्हते.

शिवाजी महाराज मावळ्यांसह विशाळगडावर येत आहेत हे समजताच सूर्यराव व जसवतराव महाराजांना अडवायला, मारायला, पकडायला सैन्यासह सज्ज हात. ही! ही मराठ्यांची अवलाद! घरचे वासे मोजणारे! स्वराज्यद्रोही! धर्मद्रोही! इकडे खिंडीच्या तोंडाशी मसूद मावळ्यांवर हल्ल्यावर हल्ला चढवीत होता. दोन हजार शत्रूशी तीनशे मावळे प्राणपणाने लढत होते. अनेक मावळे धारातीर्थी पडले. तीनशे पैकी केवळ पंचाहत्तर मावळे शिल्लक राहिले. इतक्यात मसूदने मारलेला एक धारदार बाण फुलाजीच्या उरात घुसला… फुलाजी जमिनीवर कोसळला… रक्ताचे थारोळे निर्माण झाले… फुलाजी शेवटची घटका मोजू लागला… तो बाजीप्रभूना म्हणाला, दादा, तुम्ही महाराजाना दिलेला शब्द मी पाळू शकलो नाही.

महाराजांना मला क्षमा करावयास सांगा. मी निघालो.” एवढे बोलून फुलाजीने प्राण सोडले… फलाजी पडताच आता आपला निभाव लागणार नाही असा विचार करून मावळे पळ लागले. त्या वेळी शत्रूशी झुजत असलेले बाजीप्रभू अत्यत रागाने पळणाऱ्या मावळ्यांना म्हणाले. “अरे भ्याडांनो, पळता कुठे? येथे तुमचा सेनानी धारातीर्थी पडला असता तुम्ही भेकडासारखे पळता? आपल्या स्वराज्याला, महाराजांच्या नरड्याला नख लावणाऱ्या सुलतानाचे तुम्ही गुलाम होणार काय?Pा आपल्या सुना-मुली यवनाच्या जनानखान्यात पाठविणार काय? काही स्वाभिमान असेल, तर शत्रूशी झुंज द्या, मारिता, मारिता मरा.” बाजीप्रभूचे हे शब्द मावळ्यांच्या काळजाला झोंबले. ते अत्यंत त्वेषाने शत्रूवर तुटून पडले.

बाजीप्रभू बेभान होऊन शत्रूशी लढत होते. त्यांचे शरीर रक्ताने लालेलाल झाले होते. त्यांच्या शरीरावर जखमा व्हावयास जागाच शिल्लक नव्हती. तिकडे शिवाजी महाराज गडावर जाण्यासाठी शत्रूशी निकराने लढत होते. अनेक मावळे ठार झाले. शेवटी महाराज गडावर सुखरूप पोहोचले. इकडे बाजीप्रभू शत्रूशी लढता लढता अगदी दमून गेले होते… त्यांच्या शरीराची अगदी चाळण झाली होती… ते तोफेच्या आवाजाची वाट पाहत होते… त्यांची ढाल तुटली… तरीही ढालीशिवायच ते लढत होते… त्यांना आपला मृत्यू दिसत होता, पण अजून तोफेचा आवाज येत नव्हता…

तेवढ्यात, मसूदने वेगाने पुढे होऊन बाजीप्रभूवर तलवारीचा घाव घातला… बाजीप्रभू जमिनीवर कोसळले… आणि त्याच क्षणी… विशाळगडावरील तोफा धडाडू लागल्या… बाजीप्रभूना तोफांचा आवाज ऐकू आला. त्यांच्या चेहऱ्यावर वचन पूर्ण केल्याचे समाधान विलसले. वोजनिक “महाराजांना माझा अखेरचा प्रणिपात सांगा.” असे सहकाऱ्यांना सांगून बाजींनी अखेर प्राण सोडले… बाजीप्रभू धारातीर्थी पडले.

उरलेल्या मावळ्यांनी माघार घेतली. ते जंगलात पसार झाले. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले. नानिमायामानानागारमा बाजीप्रभू शत्रूशी लढता लढता युद्धात कामी आले. ही दुःखद बातमी महाराजांना समजली. महाराजांचे डोळे पाणावले. महाराजांवर वज्राघात झाला. महाराजांचा एक मोती काळाने गिळला. बाजीप्रभू म्हणजे वज्रनिष्ठेचा, शौर्याचा, पराक्रमाचा मूर्तिमंत पुतळा. गजापूरच्या खिंडीत आपले पावन रक्त सांडून बाजीप्रभुंनी ती खिंड पावनखिंड’ बनविली.

Leave a Comment