रमजान ईद माहिती, इतिहास मराठी | Ramzan Eid Information in Marathi

हॅलो वाचकांनो आज मी तुम्हाला रमजान ईद माहिती, इतिहास मराठी | Ramzan Eid Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात.

Ramadan Information in Marathi - रमझान ईद बद्दल माहिती मराठीत

आणखी वाचा – ईद-ए-मिलाद

रमजान ईद मराठी | Ramzan Eid Information in Marathi

रमझान ईद धार्मिक महत्त्व मुस्लिम बांधवांच्या मोठ्या सणांपैकी एक मोठा सण म्हणजे रमजान ईद होय. मुस्लिमांचे जे वर्षाचे १२ महिने आहेत, त्यातील नववा महिना म्हणजे रमजान होय.

हा उपवासाचा महिना म्हणून ओळखला जातो. त्यास रमजान व्रत असेही म्हणतात, या व्रताची सांगता ज्या दिवशी करतात, तो दिवस म्हणजे रमजान ईद होय. ‘ईदुल फित्र’ असेही म्हणतात. इतर महत्त्व : मुस्लिम धर्मामध्ये रमजान महिना पवित्र मानला जातो.

प्रत्येक धर्मात मेल्यानंतर स्वर्ग मिळावा यासाठी विविध उपाय सांगितले आहेत. त्याप्रमाणे मुस्लीम धर्मात स्वर्गप्राप्तीसाठी रमजान व्रत करण्यास सांगितले आहे. हे व्रत महिनाभर केले जाते.

मुस्लीम धर्मात लहान-मोठे, आबाल-वृद्ध सारे लोक रमजान व्रत करतात. रमजान व्रताचे नियम : रमजान व्रत म्हणजे उपवास करणे. हे उपवास मोठे खडतर असतात. त्याचे नियम काटेकोरपणे पाळावे लागतात.

सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत मुस्लिम बांधव काहीही खात-पीत नाहीत. निर्व्यसनी राहून महिनाभर उपवास करतात. त्यास रोजा’ असे म्हणतात. रमजान या शब्दातील ‘रम्स’ या शब्दाचा अर्थ जाळणे असा होतो.

रमजान महिन्यात रोजे केले म्हणजे माणसाची सर्व पापे जळून जातात असे मानले जाते. इतर माहिती : रमजान महिन्यात जे रोजे किंवा उपवास केले जातात, त्याची सांगता रमजान ईद या सणाने होते.

या दिवशी सर्व मुस्लीम महिला-पुरुष, लहान-थोर मंडळी उत्तम पोषाख घालून गावाबाहेर असलेल्या इदगाह मैदानावर जमतात. तेथे त्यांचे स्थानिक प्रमुख धर्मगुरू खुत्बा सांगतात. यात कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक व आध्यात्मिक अशा सर्व प्रकारची कर्तव्ये सांगितली जातात.

सामूहिक प्रार्थना होते. शेवटी एकसुरात ‘आमेन’ (शांती) चा घोष करतात. प्रार्थनेनंतर प्रथम साखरयुक्त दहीभात खाल्ला जातो. या दिवशी शीर खुर्मा करतात. मुस्लीम बांधव नातेवाईक, मित्रमंडळींना आपल्या घरी शीर खुासाठी आमंत्रण देतात.

या उत्सवानिमित्त घरोघर गोडधोड केले जाते; रमजान ईदच्या दिवशी गरिबांना जकात म्हणजे दानधर्म केला जातो. भांडण-तंटे विसरून सर्व लोक एकमेकांच्या घरी जातात. या सणामुळे लोकांना सामाजिक कर्तव्य तसेच सदाचार व दानाचे महत्त्व समजते.

इस्लाम धर्मातील एक प्रमुख सण म्हणजे रमजान ईद. ईद या शब्दाचा अर्थच मुळी आनंद असा आहे. त्यामुळे रमजान हा महिना अत्यंत श्रेष्ठ व पवित्र मानला जातो. रमजानचा महिना संपल्यावर शब्बाल महिन्याच्या पहिल्या तारखेला ईद हा सण साजरा करतात. या ईदला ईद-उल-फित्र असेही म्हणतात. या सणाचा व चंद्राचा घनिष्ट संबंध आहे. कारण ईदचा निर्णय चंद्रदर्शनानंतरच केला जातो. रमजान हा अत्यंत पवित्र महिना.

या महिन्यात अल्लाहने प्रत्येकावर रोजा (उपवास) अनिवार्य केला आहे. या महिन्यात सात वर्षावरील प्रत्येक स्त्री-पुरुषाने उपवास करावयाचा असतो. रोजा म्हणजे सूर्योदयापूर्वी दीड तास अगोदरपासून सूर्यास्तापर्यंत काही न खातापिता, तोंडात पाण्याचा थेंबही न घालता पाळण्यात येणारा उपवास. याशिवाय नियमित पाच वेळच्या नमाजाव्यतिरिक्त या महिन्यात रात्री तरावीहची नमाज ही पुण्यप्राप्तीची साधने सांगितली आहेत.

म्हणूनच या महिन्यात सर्व मुस्लिम बांधव वाईट कर्मापासून जास्तीत जास्त दूर राहून भक्ती व सन्मार्ग यांच्याकडे प्रवृत्त होण्याचा प्रयत्न करतात. रमजानच्या या उपवासामागे आरोग्याचा विचार तर आहेच; शिवाय वर्षभर आपले आचारविचार संयमित, पवित्र राहावेत यासाठी हे रोजे किंवा उपवास असतात. त्याचबरोबर गोरगरिबांची भूक काय असते, याची प्रत्येक मनुष्याला जाणीव असावी हाही एक हेतू या उपवासाच्या मागे असतो.

संपूर्ण महिना अधिकाधिक उपवासाच्या (रोजाच्या) पवित्र बंधनात राहून पवित्र महिन्याला निरोप देताना एक महिना सत्कर्म करण्याची संधी अल्लाहने प्राप्त करून दिली. याबद्दल त्याचे उपकार मानुन आनंद साजरा करण्यासाठी ही ईद साजरी केली जाते. रमजान महिना संपताच दुसऱ्या दिवशी ईद असते. या दिवशी मुस्लिम कुटुंबांत अत्यंत उत्साहाचे वातावरण असते. या सणाच्या अगोदरच घरे स्वच्छ केली जातात. घरांना रंगरंगोटी केली जाते. उत्तम सजावट केली जाते. घरातील सगळे वातावरण सुगंधी असते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सर्वजण नवेस्वच्छ कपडे घालतात.

या दिवशी प्रार्थना असते. त्यासाठी सर्व लोक नमाजासाठी मशिदीत जातात. प्रार्थनेला जाण्यापूर्वी प्रत्येकाने विशेषतः श्रीमंतांनी आपल्या मिळकतीचा काही भाग बाजूला काढून तो गरिबांना – गरजूंना द्यावयाचा असतो. या दिवशी अल्हाहच्या आज्ञेप्रमाणे श्रीमंत कुटुंबातील व्यक्तीकडून जकात (दान) व फित्रा (धान्यस्वरूपात) गरिबांना दिला जातो. म्हणूनच या ईदला ईद-उल-फित्र असे म्हटले जाते. प्रार्थना झाल्यावर सर्वजण एकमेकांना प्रेमाने भेटतात. घरोघरी जाऊन शुभेच्छा ( ईद मुबारक ) देतात. ईद हा सण संयम, समानता, दया, करुणा, प्रेम यांचा संदेश देणारा सण आहे. आपले कुटुंब, नातलग, मित्रपरिवार, शेजारी इत्यादींशी कसे वागावे याची शिकवण देणारा हा सण आहे.

काय शिकलात?

आज आपण रमजान ईद माहिती, इतिहास मराठी | Ramzan Eid Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment