संत श्री चोखामेळा बद्दल माहिती मराठीत – Sant Chokhamela Information in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला संत श्री चोखामेळा बद्दल माहिती मराठीत – Sant Chokhamela Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – संत श्रीपुरंदरदास

संत श्री चोखामेळा बद्दल माहिती मराठीत - Sant Chokhamela Information in Marathi

संत श्री चोखामेळा – Sant Chokhamela Information in Marathi

संत श्रीचोखामेळा (महान विठ्ठलभक्त आणि संतकवी) मृत्यू : इसवी सन १३३८ चोखामेळा हे मंगळवेढ्याचे रहिवासी होते. त्यांची राहणी सात्त्विक होती आणि ते अगदी नेमाने पंढरपूरची वारी करत असत.

चोखोबांनी अनेक अभंग लिहिले होते. त्या काळच्या संतमंडळींत चोखोबांना फार मान होता. पंढरपूर येथील विठ्ठलाच्या देवळातले बडवे मात्र चोखोबांना मंदिरात प्रवेश देत नसत. त्यांच्या विठ्ठलभक्तीबद्दल एक कथा सांगितली जाते.

चोखोबा हे विठ्ठलाचे परमभक्त असल्यामुळे एके दिवशी विठोबाने त्यांना आपल्या मंदिरात बोलावून घेतले. त्यांना दर्शन दिल्यावर विठोबाने आपल्या गळ्यातला रत्नहार स्वतःच्या हातांनी चोखोबांच्या गळ्यात घातला.

ही सारी घटना मंदिरातील बडव्यांना कळलीच नाही. चोखोबा देवळाबाहेर विश्रांती घेत असताना, विठ्ठलाच्या गळ्यातील रत्नहार नाहीसा झाला म्हणून शोधाशोध सुरू झाली.

तो हार चोखोबांकडे सापडला. त्या वेळी बडव्यांनी त्यांना खूप मारले. पण मग विठ्ठलानेच चोखोबांची सुटका केली. त्यानंतर काही दिवसांनी मंगळवेढे गावात गावकूस (गावाभोवतीचा तट) घालण्यासाठी ग्रामप्रमुखाने गावातील पुष्कळसे लोक वेठीस धरले. त्यांत चोखोबाही होते.

गावकूस घालण्याचे काम सुरू असतानाच ते बांधकाम कोसळले आणि त्याखाली सापडून काही लोक मृत्युमुखी पडले. त्यांत चोखोबाही होते. तो दिवस होता वैशाख वद्य पंचमीचा.

त्यानंतर आठ दिवसांनी विठोबाने चोखोबांच्या अस्थी आणण्यासाठी नामदेवांना पाठवले. “ज्या अस्थींतून ‘विठ्ठल विठ्ठल’ असा नामघोष ऐकू येईल, त्या अस्थी चोखोबांच्या असतील असे समज.”

असे विठ्ठलाने नामदेवांना सांगितले होते. त्याप्रमाणे नामदेवांनी चोखोबांच्या अस्थी ओळखल्या, त्या अस्थी पंढरपुरात आणल्या, विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात पुरल्या आणि त्यावर शके १२६०, वैशाख वद्य १३ रोजी संत चोखोबांची समाधी बांधली.

अशा रितीने चोखोबांना मरणानंतर विठोबाची जवळीक लाभली. चोखोबांनी अनेक अभंग व पदे लिहिली, त्यांच्या नावावर ‘विवेकदर्पण’ हे एक प्रकरणही आढळते.

त्यांच्या अभंगांतून तत्कालीन सामाजिक विषमता, अन्याय आणि सोवळेओवळे यांबाबतची व्यथा दिसते. आजही पांडुरंगाच्या दर्शनाला जाताना चोखोबांच्या समाधीचे दर्शन घेऊन मगच देवळात जाण्याचा संकेत वारकरी संप्रदायात आहे.

ऊस डोंगापरी। रस नोहे डोंगा।
काय भुललासी। वरलीया अंगा।
चोखा डोंगापरी। भाव नाही डोंगा।
काय भुललासी वरलीया सोंगा।

काय शिकलात?

आज आपण संत श्री चोखामेळा बद्दल माहिती मराठीत – Sant Chokhamela Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment