संत कबीर बद्दल माहिती मराठीत – Sant Kabir Information in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला संत कबीर बद्दल माहिती मराठीत – Sant Kabir Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – समर्थ रामदास स्वामी

संत कबीर बद्दल माहिती मराठीत - Sant Kabir Information in Marathi

संत कबीर – Sant Kabir Information in Marathi

१]नाव –संत कबीर
२]जन्म –इसवी सन १३९८
३]मृत्यू –इसवी सन १५१८

संत श्रीकबीर (सत्यालाच ईश्वर मानणारा संत कवी) इसवी सन सुमारे १३९८ ते इसवी सन सुमारे १५१८ कबीर हे उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत आणि कवी होते.

त्यांच्या जन्माबद्दल पुढील कथा सांगितली जाते – एका विधवेच्या पोटी एक मुलगा जन्माला आला. त्या विधवेला त्या मुलाचे पालनपोषण उजळ माथ्याने कारणे शक्य नव्हते.

तिने त्या लहान मुलाला काशीमधील लहरतालाब नावाच्या तलावाकाठी नेऊन ठेवले. काही वेळाने काशीतला निरू नावाचा एक विणकर आपली पत्नी नीमा हिच्याबरोबर त्या ठिकाणी आला.

त्या दोघांनी तलावाकाठी ठेवलेल्या त्या लहान मुलाला पाहिले. त्यांनी त्याला आपल्या घरी नेले. त्याचे आपल्या मुलाप्रमाणे पालनपोषण केले. तोच मुलगा पुढे कबीर ह्या नावाने प्रसिद्ध झाला.

कबीर हे ज्ञानी पुरुष होते. त्यांनी हे सर्व ज्ञान सत्संगातून मिळवले होते. त्या काळात समाजात सर्वत्र धर्माचे झगडे चालू होते. कबिरांनी राम आणि रहीम हे एकच आहेत, असे सांगून हिंदू- मुसलमानांत ऐक्य साधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.

हिंदू आणि मुसलमान ह्या दोन्ही धर्माचे लोक कबिरांचे शिष्य होते. जातपात, कुलाभिमान, धर्मभेद, रूढी, व्रतवैकल्ये, कर्मकांड इत्यादींवर त्यांचा काडीमात्र विश्वास नव्हता.

कबिरांच्या काव्यात अनेक ठिकाणी ते काशीचा विणकर असल्याचे सांगतात. त्यांच्या काव्यातल्या उल्लेखांवरून ते संसारी गृहस्थ होते, असे मानले जाते. त्यांना कमाल नावाचा एक मुलगा होता.

कबिरांनी आपल्या गुरूंच्या नावाचा उल्लेख कुठेही केलेला नाही, पण ते रामानंदांचे शिष्य होते, असे मानले जाते. कबिरांचा शिष्य धर्मदास ह्याने इसवी सन १४६५ मध्ये कबिरांच्या काव्यांचा संग्रह ‘बीजक’ ह्या नावाने तयार केला.

कबिरांच्या काव्यात अद्भुत शक्ती आहे. त्यांची वाणी ओजस्वी, निर्भीड आणि स्पष्ट होती. कवी म्हणून हिंदी साहित्यात कबिरांचे स्थान श्रेष्ठ आहे.

कोणत्याही प्रचलित धर्माचे वा संप्रदायाचे अनुसरण कबिरांनी केले नाही. त्यांनी कोणताही नवीन संप्रदायही निर्माण केला नाही. त्यांनी सत्यालाच ईश्वर मानले होते.

बैरागी बिरकत भला, गिरही चित्त उदार।
दु हुं चूका रीता पहुँ, वाकू वार न पार ।।१।।
कबिर हरि के नाव सूं प्रिति रहँ इकतार।
तो मुख तँ मोती झडॅ, हीरे अन्त न फार ।।२।।

काय शिकलात?

आज आपण संत कबीर बद्दल माहिती मराठीत – Sant Kabir Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment