संत श्री नामदेव बद्दल माहिती मराठीत – Sant Namdev Information in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला संत श्री नामदेव बद्दल माहिती मराठीत – Sant Namdev Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – संत श्री चक्रधर स्वामी

संत श्री नामदेव बद्दल माहिती मराठीत - Sant Namdev Information in Marathi

संत श्री नामदेव – Sant Namdev Information in Marathi

१]नाव –संत श्री नामदेव
२]जन्म –इस. स. १२७०
३]आई –गोणाई
४]वडील –दामाशेटी
५]मृत्यू –इस. स १३५०

संत श्रीनामदेव (श्रेष्ठ मराठी संतकवी) इसवी सन १२७० ते इसवी सन १३५० संत नामदेवांचा जन्म पंढरपूर येथे २६ ऑक्टोबर १२७० ह्या दिवशी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दामाशेटी होते आणि आईचे नाव गोणाई होते.

दामाशेटी हे विठ्ठलभक्त होते, त्यामुळे नामदेवांच्या मनावर विठ्ठलभक्तीचे संस्कार लहानपणापासूनच झाले. हातांमध्ये टाळ आणि वीणा घेऊन मुखाने विठ्ठलनामाचा अखंड गजर करत देवाच्या दारी नाचत राहण्याचा छंद नामदेवांना लहानपणापासूनच जडला होता. त्यांची विठ्ठलभक्ती किती उत्कट होती, हे सांगताना नामदेवांच्या लहानपणाची एक गोष्ट सांगितली जाते, ती अशी

एके दिवशी दामाशेटी काही कामासाठी परगावी गेले होते. त्यामुळे विठ्ठलास नैवेद्य दाखवायचे काम छोट्या नामदेवाकडे आले. नामदेव नैवेद्य घेऊन मंदिरात गेला.

त्याने नैवेद्याचे ताट विठ्ठलापुढे ठेवले आणि नैवेद्याचा स्वीकार करावा, अशी विनंती देवाला केली. नामदेवाने खूप वेळ वाट पाहिली पण, विठ्ठल काही नैवेद्य घेईना.

आपल्या वडिलांच्या हातून विठ्ठल नैवेद्य घेतो आणि आपल्या हातून तो नैवेद्य घेत नाही, ह्याचे छोट्या नामदेवाला खूप वाईट वाटले. शेवटी नामदेवाने देवाला सांगितले, “विठोबा, मी लहान आहे म्हणून तू माझ्या हातचा नैवेद्य घेत नाहीस का?

तू जर मी आणलेला नैवेद्य खाल्ला नाहीस, तर मी तुझ्या पायांवर डोके आपटून प्राण देईन.” त्याच्या त्या उत्कट बालहट्टापुढे विठ्ठलाचे काही चालले नाही.

त्या पाषाणाच्या मूर्तीतून साक्षात विठोबा प्रकट झाला आणि त्याने नामदेवाच्या हातून नैवेद्य स्वीकारला. विठ्ठलभक्त नामदेवांचे लग्न अवघ्या अकराव्या वर्षी गोविंदशेटी सदावर्ते ह्यांच्या राजाई नावाच्या मुलीशी झाले.

लग्न झाल्यानंतरही नामदेवांचे चित्त संसारात रमले नाही. त्यांनी आपल्या वडिलोपार्जित शिवणकामाच्या व्यवसायातही कधी लक्ष घातले नाही.

ज्ञानदेवांची कीर्ती जेव्हा नामदेवांच्या कानावर आली, तेव्हा त्यांना ज्ञानदेवांना भेटण्याची ओढ लागली. इसवी सन १२९१ मध्ये ते ज्ञानदेवांना भेटण्यासाठी आळंदी येथे गेले.

नामदेव जरी विठ्ठलभक्त असले, तरी त्यांना गुरूपदेश मिळाला नव्हता. ते गुरुहीन (निगुरा) असल्यामुळे तेथील संतमेळ्यात ते कचे ठरले.

आपल्याला साक्षात विठ्ठलाचे दर्शन होऊनही आपल्याला गुरू नाही, ह्याचे नामदेवांना खूप वाईट वाटले. ज्ञानदेवांनी त्यांना विसोबा खेचरांकडे जायला सांगितले.

विसोबांना शोधत नामदेव नागनाथाच्या मंदिरात आले. विसोबा खेचर शिवलिंगावर पाय ठेवून झोपले होते. नामदेवांना ते आवडले नाही. त्यांनी विसोबा खेचरांना तसे सांगितले.

त्यावर विसोबा खेचर नामदेवांना म्हणाले, ”मी थकलो आहे, म्हातारा झालो आहे. तूच माझे पाय उचल आणि दुसरीकडे ठेव.” नामदेवांनी विसोबांचे पाय उचलून दुसरीकडे ठेवले.

पण त्या ठिकाणीही नामदेवांना शिवलिंग दिसले. असे दोन-तीन वेळा घडले. मग मात्र नामदेव विसोबा खेचरांना शरण गेले. विसोबांनी नामदेवाला उपदेश दिला. त्या उपदेशामुळे नामदेव कृतार्थ झाले.

त्यानंतर नामदेवांनी ज्ञानदेव आणि इतर संत ह्यांच्याबरोबर तीर्थयात्रा केली. ज्ञानदेवांनी जेव्हा समाधी घेतली, तेव्हा नामदेव तिथे उपस्थित होते. त्यानंतर काही काळाने नामदेव उत्तरेकडे गेले.

ते पंजाबमध्ये वीस वर्षे राहिले आणि तिथे त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला. पंजाबमधील धोमान ह्या गावी गुरुद्वारा बाबा नामदेवजी किंवा देहुरासाहेब ह्या नावाने नामदेवांचे स्मृतिमंदिर आहे.

त्या ठिकाणी माघ शुद्ध द्वितीयेला मोठी यात्रा भरते. पंजाबमधील खूप लोक नामदेवांचे अनुयायी झाले आहेत. पंजाबातील निवासकाळात नामदेवांनी हिंदी पद्यरचना केली.

हिंदी भाषेत प्रसिद्ध असलेल्या ‘नामदेवजीकी मुखवानी’मधील नामदेवांच्या ६१ पदांचा समावेश शिखांच्या ‘ग्रंथसाहेब’ ह्या धर्मग्रंथात केला आहे.

आपल्या जीवनाची अखेर आता जवळ आली आहे, हे जाणवताच नामदेव महाराष्ट्रात परत आले. वयाच्या ८१व्या वर्षी त्यांनी पंढरपूर येथे ३ जुलै १३५० ह्या दिवशी समाधी घेतली.

काय शिकलात?

आज आपण संत श्री नामदेव बद्दल माहिती मराठीत – Sant Namdev Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment