समर्थ रामदास स्वामी बद्दल माहिती मराठीत – Sant Ramdas Information in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला समर्थ रामदास स्वामी बद्दल माहिती मराठीत – Sant Ramdas Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – संत श्री ज्ञानेश्वर महाराज

समर्थ रामदास स्वामी बद्दल माहिती मराठीत - Sant Ramdas Information in Marathi

समर्थ रामदास स्वामी – Sant Ramdas Information in Marathi

१]नाव –संत श्री समर्थ रामदास स्वामी
२]जन्म –इसवी सन १६०८
३]आई –राणूबाई
४]वडील –सूर्याजीपंत ठोसर
५]मृत्यू –इसवी सन १६८२

संत श्रीसमर्थ रामदासस्वामी (ज्ञानी आणि कर्मयोगी संतकवी) इसवी सन १६०८ मध्ये चैत्र शुद्ध नवमी ह्या दिवशी श्रीरामाचा जन्मोत्सव सुरू असताना समर्थ रामदासस्वमींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील, अंबड ह्या तालुक्यातील जांब ह्या गावी झाला.

त्यांच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत ठोसर होते आणि आईचे नाव राणूबाई होते. समर्थांचे मूळ नाव नारायण होते. नारायण अत्यंत बुद्धिमान होता. वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत त्याने शब्दरूपावली, समासचक्र, अमरकोश, रुद्र, पवमान असे ग्रंथ पाठ केले होते.

नारायण बुद्धिमान होता, त्याप्रमाणेच तो विरक्तही होता. एकदा तो लपून बसला. अनेक ठिकाणी त्याचा शोध घेऊनही तो सापडला नाही. शेवटी त्याच्या आईला तो एका फडताळात बसलेला दिसला.

आईने त्याला विचारले, “नारायणा, इथे काय करतो आहेस?” तेव्हा त्या छोट्या नारायणाने दिलेल्या उत्तरामुळे आई चकित झाली. तो म्हणाला, “आई, मी विश्वाची चिंता करतो आहे.”

आपल्या ह्या विरक्त मुलाला वेळीच लग्नाच्या बंधनात बांधावे ह्या हेतूने नारायणाच्या आईवडिलांनी त्याचे लग्न त्याच्या मामेबहिणीशी ठरवले. सीमांतपूजन, वाङ्निश्चय असे विधी झाले.

मंगलाष्टके सुरू झाली. मंगलाष्टकांमधील ‘शुभमंगल सावधान’ हे शब्द ऐकल्यावर नारायण नेसत्या वस्त्रानिशी बोहल्यावरून पळाला. त्याने तीन कोसांवरचा नाशिक क्षेत्रातील गोदातीर गाठला.

त्याने गोदातीरावरील श्रीरामाचे दर्शन घेतले आणि तो टाकळी येथे गेला. रामदासांनी तिथे तीन वेळा गायत्री पुरश्चरण केले. आणि ‘श्रीराम जय राम जय जय राम’ ह्या त्रयोदशाक्षरी (तेरा अक्षरी) मंत्राचा १३ कोटी जप केला.

१२ वर्षांच्या दीर्घ तपश्चर्येनंतर त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. त्यानंतर त्यांनी भारताची यात्रा करून लोकस्थितीचे निरीक्षण केले. भारतभ्रमण करत असताना त्यांच्या असे लक्षात आले की,

भारतातील दीन झालेली जनता यवनांच्या जुलमाखाली अपमानीत अवस्थेत जगत होती. जनतेची मालमत्ता, बायका-मुले, धर्म, संस्कृती काहीच सुरक्षित नव्हते. ही हृदयद्रावक अवस्था पाहून रामदास अस्वस्थ झाले.

१६६४ सालच्या वैशाख महिन्यात रामदास कृष्णातीरी आले. त्यानंतर ते चाफळ येथे आले. तो परिसर त्यांना अतिशय आवडला. रामदासांनी तिथे श्रीरामाचे मंदिर बांधले. आणि तिथेच कायमचे वास्तव्य ठेवले.

अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी बलोपासना अतिशय महत्त्वाची असल्यामुळे त्यांनी कृष्णा नदीच्या परिसरात अकरा मारुतींची स्थापना केली. त्यांनी गावोगावी मठ आणि व्यायामशाळाही काढल्या.

शके १५७१च्या वैशाख महिन्यात त्यांनी शिवाजी महाराजांना उपदेश दिला. शके १६०२ मध्ये शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून ते सज्जनगड इथे राहू लागले.

मध्यम उंची, मजबूत बांधा, गौर वर्ण, तेजस्वी कांती असे समर्थांचे स्वरूप होते. अंगात कफनी, काखेस झोळी, गळ्यात जपाची माळ, हातात कुबडी ह्या वेशात समर्थ संचार करत असत. त्यांच्या कुबडीत छोटी गुप्ती असे.

ती गुप्ती त्यांना शिखांचे धर्मगुरू अर्जुनसिंग ह्यांनी स्वसंरक्षणासाठी भेट दिली होती. समाजाविषयीच्या तळमळीतून त्यांनी विपुल ग्रंथनिर्मिती केली. संसारात कार्यमग्न असणाऱ्यांना उपदेश करण्यासाठी त्यांनी दासबोधाची निर्मिती केली.

मनाच्या श्लोकांतूनही त्यांनी मार्मिक उपदेश केला आहे. करुणाष्टके आणि भीमरूपी स्तोत्र ह्यांची रचनाही समर्थांनी केली. सुखकर्ता, दुःखहर्ता ही गणपतीची आरती, लवथवती विक्राळा ही शंकराची आरती ह्यांच्या रचनाही समर्थ रामदासांनीच केलेल्या आहेत.

त्यांनी लिहिलेली अनेक पदे, अभंग, स्तोत्रे हे सारे आजही म्हटले जाते. समर्थानी सुंदर कांड आणि युद्ध कांड ह्या दोन कांडांपुरतेच रामायण लिहिले. त्यात १३००च्या वर श्लोक आहेत.

माघ वद्य नवमी शके १६०३ (इसवी सन १६८१) ह्या दिवशी समर्थ रामदास स्वामींनी सज्जनगडावर देह ठेवला. ह्याच दिवसाला दासनवमी असे म्हणतात.

काय शिकलात?

आज आपण समर्थ रामदास स्वामी बद्दल माहिती मराठीत – Sant Ramdas Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment