संत श्री तुकाराम महाराज बद्दल माहिती मराठीत – Sant Tukaram Information in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला संत श्री तुकाराम महाराज बद्दल माहिती मराठीत – Sant Tukaram Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – संत श्री नामदेव

संत श्री तुकाराम महाराज बद्दल माहिती मराठीत - Sant Tukaram Information in Marathi

संत श्री तुकाराम – Sant Tukaram Information in Marathi

१]नाव –संत श्रीतुकाराम
२]जन्म –इ. स. १६०८
३]आई –कनकाई
४]वडील –बोल्होबा
५]मृत्यू –इ. स. १६५०

संत श्रीतुकाराम (महान मराठी संत आणि कवी) संत तुकारामांचा जन्म पुण्याजवळील देहू ह्या गावी इसवी सन १६०८ मध्ये झाला. त्यांचे आडनाव आंबिले होते आणि कूळ मोरे होते. त्यांचा पिढीजात व्यवसाय वाण्याचा होता.

हे घराणे देहू गावाचे महाजन होते. तुकारामांच्या वडिलांचे नाव बोल्होबा होते आणि आईचे नाव कनकाई होते. ह्या घराण्याच्या मूळ पुरुषाने, विश्वंभर ह्यांनी, घराजवळच विठ्ठलाचे मंदिर बांधले होते.

त्यामुळे त्या घरात विठ्ठलभक्तीचा वारसा चालत आला होता. अशा विठ्ठलभक्तीच्या वातावरणाचे शुभ संस्कार तुकारामांवर लहानपणापासूनच झाले होते.

घरात महाजनकी असल्यामुळे तुकाराम लहानपणी लिहायला आणि वाचायला शिकले होते. त्यांनी संस्कृतचाही परिचय करून घेतला होता. गीता आणि भागवत ह्या ग्रंथांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता.

कथा-कीर्तने आणि भजने ऐकून तुकाराम बहुश्रुत झाले होते. सदाचार न सोडता व्यवहार कसा करावा, ह्याची शिकवण त्यांना घरातूनच मिळाली होती.

संत श्री तुकाराम महाराज – Sant Tukaram Information in Marathi

तुकाराम १३ वर्षांचे झाल्यावर त्यांच्या वडिलांनी सावकारी, व्यापार आणि महाजनकी ह्यांचे व्यवहार हळूहळू त्यांच्यावर सोपवले होते. १३ व्या वर्षापासून ते १७ व्या वर्षापर्यंत तुकारामांनी घरचे सर्व व्यवहार वडिलांच्या मार्गदर्शनाखाली जबाबदारीने सांभाळले होते.

ह्या पाच वर्षांच्या काळात तुकारामांची दोन लग्ने झाली. पहिली पत्नी रखमा ही दमेकरी असल्यामुळे तिच्या हातून संसाराचा गाडा रेटला जाणार नाही, असे समजून तुकारामांच्या वडिलांनी तुकारामांचे दुसरे लग्न आवडीशी लावून दिले.

तिचे लग्नानंतरचे नाव जिजा होते. तुकाराम सतरा वर्षांचे झाल्यावर तुकारामांच्या घरात एकापाठोपाठ एक दुःखाचे प्रसंग घडले. ह्या दुःखद प्रसंगांना एकापाठोपाठ एक सामोरे जात असताना इ.स. १६३० मध्ये मोठा दुष्काळ पडला.

त्या दुष्काळामध्ये अनेक लोक देशोधडीला लागले. तुकारामांचा व्यापार कमी झाला. सावकारी संपली. देणेकरी हात झटकून मोकळे झाले आणि घेणेकरी मात्र सारख्या चकरा मारू लागले.

त्या कठीण परिस्थितीतच तुकारामांच्या पहिल्या पत्नीचे आणि तिला झालेल्या मुलाचे निधन झाले. घरातली गुरेढोरेही मेली. शेवटी नाइलाजाने तुकारामांना व्यवसायाचे दिवाळे काढावे लागले.

संत श्री तुकाराम महाराज – Sant Tukaram Information in Marathi

अशा गांजलेल्या परिस्थितीत तुकारामांचे मन अंतर्मुख झाले. त्यांच्यातील भक्तिसंस्कार जागे झाले. त्यांनी घरचे विठ्ठल मंदिर दुरुस्त केले.

विठ्ठलाच्या भक्तीमध्ये मन रमवता-रमवता त्यांना मोक्ष मिळवण्याची तीव्र इच्छा झाली. तुकारामांनी देहूजवळच्या भामनाथ पर्वतावरील एकांतात ईश्वराच्या साक्षात्कारासाठी निर्वाण मांडले.

पंधरा दिवसांपर्यंत एकाग्रतेने अखंड नामस्मरण केल्यानंतर त्यांना दिव्य अनुभव आले. त्या दिव्य अनुभवांची अनुभूती इतकी विलक्षण होती की, त्यानंतर भामनाथ आणि भंडारा ह्या दोन डोंगरांवरील वृक्षवेलींच्या सहवासात चिंतन,

मनन आणि नामस्मरण करण्यात तुकाराम दिवसच्या दिवस घालवू लागले. ह्याच काळात त्यांना नामदेवांनी स्वप्नदृष्टान्त दिला आणि अभंग रचण्याची प्रेरणा दिली. तुकारामांना गुरूपदेशही स्वप्नातच मिळाला.

चैतन्यपरंपरेतील बाबाजी चैतन्य नावाच्या सत्पुरुषाने माघ शुद्ध दशमी, गुरुवार शके १५६१ (२३-१-१६४०) ह्या दिवशी तुकारामांना स्वप्नात उपदेश करून ‘रामकृष्णहरी’ हा मंत्र दिला.

संत श्री तुकाराम महाराज – Sant Tukaram Information in Marathi

तुकारामांच्या प्रगल्भ चिंतनामुळे त्यांचे अभंग प्रसन्न आणि प्रासादिक होत होते. सनातनी मंडळींना त्यांचा हेवा वाटू लागला. रामेश्वरभट्ट आणि मंबाजीबुवा हे त्या हेवादावा करणाऱ्यांत प्रमुख होते.

त्यांनी सत्तेच्या आधारे तुकारामांच्या विरुद्ध निवाडा करवला आणि तुकारामांना त्यांच्या अभंगांच्या वह्या स्वहस्ते इंद्रायणीत बुडवायला भाग पाडले.

इंद्रायणीत अभंगांच्या वह्या बुडवल्यानंतर तुकारामांना अतोनात दुःख झाले. त्यांनी तेरा दिवस देवाजवळ उपवासपूर्वक धरणे धरले. अखेर देवाने प्रसन्न होऊन त्यांच्या वह्या कोरड्या स्थितीत नदीतून वर काढल्या,

अशी कथा प्रचलित आहे. ही कथा जरी खरी नाही असे मानले, तरी तुकारामांची अभंगवाणी त्यांच्या हयातीतच साऱ्या महाराष्ट्रात पसरली होती आणि शेकडो कोस अंतरावर असलेले मराठी लोक ते अभंग मिळवून पाठ करत होते.

त्यामुळे तुकारामांच्या अभंगांच्या वह्या नदीत बुडवून त्यांची अभंगवाणी नष्ट करणे हे अशक्यच होते. वयाची ४१ वर्षे उलटल्यानंतर तुकारामांना वाटू लागले की, आपले जीवन आता सफल आणि कृतार्थ झाले आहे.

संत श्री तुकाराम महाराज – Sant Tukaram Information in Marathi

आता आपण देहत्याग करावा, असे त्यांच्या मनाने घेतले. फाल्गुन वद्य द्वितीया, शके १५७१ (९ मार्च १६५०) ह्या दिवशी सर्व लोक कीर्तनात रंगलेले असताना तुकारामांनी अतिशय प्रसन्न अशा मनःस्थितीत ह्या जगाचा निरोप घेतला.

तुकारामांची सर्व काव्यरचना अभंग छंदात आहे. त्यांचे सुमारे पाच हजार अभंग उपलब्ध आहेत. मराठी साहित्यात तुकारामांच्या अभंग-गाथेने अढळ स्थान मिळवले आहे.

संसारातील काही प्रसंग, जनात आलेले अनुभव, गोपालकृष्णाच्या बालक्रीडा, विराण्या, ब्रह्मतत्त्वाचा साक्षात्कार ह्यांची अभंगरूप वर्णने त्यांच्या गाथेत आली आहेत. क्रीडाविषयक अनेक सुंदर अभंग तुकारामांनी रचले आहेत.

त्यांची अभंगवाणी ही अनेक सुभाषितांच्या उत्कृष्ट ठेव्याने समृद्ध झाली आहे. आधुनिक मराठी कवींना त्यातून स्फूर्ती मिळाली आहे.

भक्ती आणि समता ह्यांच्या मुशीतून भागवत धर्माने तयार केलेली सुवर्णमूर्ती म्हणजे तुकाराम. ज्ञानेश्वरांनी ज्या भागवत धर्माचा पाया घातला, त्या भागवत धर्ममंदिराचा कळस तुकाराम महाराज झाले.

काय शिकलात?

आज आपण संत श्री तुकाराम महाराज बद्दल माहिती मराठीत – Sant Tukaram Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment